डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यानाचा विकास
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित विषयांचा सखोल आढावा घेतला. कोकणचे सुपुत्र, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या कार्याच्या स्मतीप्रित्यर्थ जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या जैवविविधता आणि वनउद्यानासाठी निधीची उणीव भासू देणार नाही. सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. निसर्गपर्यटनाचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा. प्रस्तावाची पडताळणी करुन तातडीने मान्यता देण्यात येईल. आवश्यतेनुसार टप्प्याटप्याने निधी उपलब्ध केला जाईल. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तिसे येथील केदारजननी माता देवस्थान परिसरात रोपवे
रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवे उभारणीसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेंतर्गत राज्यात कळसूबाई, हरिश्चंद्रगड, माथेरान, सिंहगड, शिवनेरी, राजगड, भीमाशंकर, लेण्याद्री, जेजुरी, निमगाव खंडोबा आदी 45 ठिकाणी रोपवे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या यादीत तिसे येथील केदारजननी माता देवस्थानचा समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा. तो शासनाच्या मंजूरीसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक परवानगी मिळविण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
संभे गावाचे सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनाचे निर्देश
रोहा तालुक्यातील मौजे संभे गावाला भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी सदर गावाचे स्थलांतर आणि पुनर्वसनाची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. यासाठी आवश्यक प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करुन घ्यावात. राज्य शासनासाठी नागरिकांचा जीव वाचवणे सर्वात महत्वाचे असल्याने धोकादायक गावांच्या स्थलांतर, पूनर्वसनासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
No comments:
Post a Comment