Wednesday, 16 April 2025

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार -

 थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार

-         आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. 15 : थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी लवकरच प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले .

निर्मल भवन येथे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र बाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी  सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या म्हणणे थॅलेसेमिया आजारावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.या उपक्रमांद्वारे थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवूनमहाराष्ट्राला या आजारापासून मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे.

जनजागृतीचे विशेष अभियान

थॅलेसेमिया आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.  ग्रामपंचायत स्तरापासून ते शहरांपर्यंत विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे. थॅलेसेमियाच्या निदानासाठी खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये काही विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या जाणार आहेत. यामुळे वेळेवर निदान होऊन पुढील पिढीत हा आजार पसरण्यापासून रोखता येईल.

थॅलेसेमिया आजाराचे निदानव्यवस्थापन आणि समुपदेशन यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकाधिक कर्मचाऱ्यांना विशेष कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गावागावांपर्यंत या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवता येईल.

थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी या आजारावरील सविस्तर माहितीच्या सादरीकरण केले.

०००००००

कामगारांनी कोणत्या संघटनेसोबत जावे याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य

 कामगारांनी कोणत्या संघटनेसोबत जावे याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य

-       कामगार राज्यमंत्री आशिष जैयस्वाल

मुंबईदि. 15 – कामगारांनी कोणत्या संघटनेसोबत काम करावे याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बॉम्बे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सर्व कामगार संघटनांशी चर्चेची भूमिका घ्यावी, असे निर्देश कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.

            मंत्रालयात बॉम्बे रुग्णालयातील रुग्णसेविका आणि कामगार यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी राज्यमंत्री श्री.जयस्वाल बोलत होते. याबैठकीस राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष किरण पावसकरबॉम्बे रुग्णालयाचे व्यवस्थापक राजन चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कामगार आयुक्तालयाचे अधिकारी उपस्थित होते.

            कामगार आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या सोबत एकत्रिक बैठक घ्यावी अशा सूचना देऊन राज्यमंत्री श्री.जयस्वाल म्हणाले कीभविष्यात रुग्णसेवकांबाबत कोणत्याही तक्रारी होणार नाहीत याची रुग्णालय प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच यावेळी बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टमुंबई येथे रुग्णांना देण्यात येणाऱ्या 10 टक्के सवलतीच्या बेडचा दुरूपयोग होत असल्याबाबतही आढावा घेण्यात आला. याबाबत समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.

यावेळी विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवलेअवर सचिव स.द .कस्तुरेधर्मादाय सहआयुक्त सुनीता तरारबॉम्बे हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी व  सरचिटणीस स्थानिक कमिटी दीपक जामदार उपस्थित होते.  

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ


 

हिवताप विभागाचा आकृतीबंध लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करा

 हिवताप विभागाचा आकृतीबंध लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करा

– राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. 15 : राज्यातील हिवताप विभागाचा आकृतीबंध हा लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करण्यात यावाअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

 

निर्मल भवन येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेचे सदस्य संजय केनेकरसार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या कीपावसाळ्यात ग्रामीण भागात विविध आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे केवळ आरोग्याचे नव्हेतर कुटुंबांचे आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून नागरिकांना उत्तम सेवा मिळावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. बायोमेट्रिक प्रणालीत सुधारणा करावीप्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवावी तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पदोन्नती देण्यात यावी किंवा आर्थिक लाभ देण्याचाही विचार करण्यात यावे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईलअसेही राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


शालेय शिक्षण विभाग समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी,शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी होणार

 शालेय शिक्षण विभाग समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी होणार

 

मुंबईदि. 15 – विद्यार्थी हे दैवत असून राज्यातील शासकीय शाळांमध्ये समर्पित वृत्तीने काम करणारे अनेक शिक्षक आहेत. राज्य शासन अशा शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून सर्वच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावीअशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी केली जाणार असून येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे दिसून येईलअसे त्यांनी सांगितले.

 

शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. शिक्षण विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या शासन निर्णयांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि सकारात्मक निर्णयांचा समावेश असावा यादृष्टीने ते अंतिम करण्यापूर्वी त्यांनी शिक्षक संघटनांशी चर्चा केली. या बैठकीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेशिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंहएससीईआरटीचे संचालक राहुल रेखावारशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.भुसे म्हणालेशैक्षणिक गुणवत्तेवर भर देऊन शालेय शिक्षण विभागामध्ये सर्वांच्या सहकार्याने सकारात्मक मार्गक्रमण केले जाणार आहे. संवादातून प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारताना राज्य शिक्षण मंडळ कायम राहणार असल्याचे सांगून नवीन अभ्यासक्रमात मराठी भाषाराज्याचा इतिहासभूगोल यांच्याशी तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे गणवेश स्थानिक पातळीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहेतथापि ते दर्जेदार असणे आवश्यक आहे. शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करताना जिल्हा नियोजन समितीसह शासनाच्या विविध विभागांच्या निधीचा तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर ऊर्जा उपलब्ध करुन देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह म्हणालेशालेय शिक्षण विभाग शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शिक्षकांनीही प्रत्येक विद्यार्थ्यांला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शाळेशी संबंधित बैठका घेताना अथवा शाळेने कोणतीही माहिती देताना शैक्षणिक कामांना बाधा येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं ? -:🤣:-

 -:🤣:- आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं ? -:🤣:-


|| लुसलुशीत, खुसखुशीत, भुसभुशीत, घसघशीत, 

|| रसरशीत, ठसठशीत, कुरकुरीत, चुरचुरीत, झणझणीत, 

|| सणसणीत, ढणढणीत, ठणठणीत, दणदणीत, चुणचुणीत, 

|| टुणटुणीत, चमचमीत, दमदमीत, खमखमीत, झगझगीत, 

|| झगमगीत, खणखणीत, रखरखीत, चटमटीत, चटपटीत, 

|| खुटखुटीत, चरचरीत, गरगरीत, चकचकीत, गुटगुटीत, 

|| सुटसुटीत, तुकतुकीत, बटबटीत, पचपचीत, खरखरीत, 

|| खरमरीत, तरतरीत, सरसरीत, सरबरीत, करकरीत, 

|| झिरझिरीत, फडफडीत, शिडशिडीत, मिळमिळीत, 

|| गिळगिळीत, बुळबुळीत, झुळझुळीत, कुळकुळीत, 

|| तुळतुळीत, जळजळीत, टळटळीत, ढळढळीत, 

|| डळमळीत, गुळगुळीत, गुळमुळीत. 


-:🔸 ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही :----------- 

-:🔸 भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा :------------ 


-:🔹 थोडी गम्मत :------------ 


|| 'मॅक्सिन बर्नसन' हा एक अमेरिकन भाषा तज्ज्ञ 

|| मराठीबद्दल त्यांनी लिहिले आहे कि...


|| ही मराठी भाषा खूप छान आहे, पण जीव घाबरा करणारी 

|| आहे. मराठी भाषेत बाळबोध लिपी पासूनच हिंसेचे 

|| बाळकडू पाजले जाते. 


-:🔹 उदा० :------------ 


|| अक्षरांचे पोट फोडणे, पाय मोडणे; 

|| इतिहासात तर 'ध' चा 'मा' सुद्धा केला जातो. 

|| यांच्या सामाजिक व्यवहारातही उघड उघड हिंसाचार 

|| दिसतो. :*


|| नाक दाबले, तर तोंड उघडणे. 

|| अमक्याचे खापर, तमक्याच्या माथी फोडणे, 

|| धारेवर धरणे, पाठीत खंजीर खुपसणे, 


|| बिन पाण्याने हजामत करणे, रक्त आटवणे, पाय ओढणे, 

|| पोटावर पाय देणे, कान उपटणे, डोक्यावर मिरे वाटणे. 

|| इत्यादी, इत्यादी... 


-:🔹 ही मराठी माणसे स्वत:बद्दलही हिंसक असतात. 

-:🔹 म्हणजे... 🤣😀😂


-:🔹 झोपेतून उठल्यावर :------------ 


|| अंग मोडतात, बोटे मोडतात, घसाफोड करतात, 

|| तोंड फाटेस्तोवर बोलतात, घर डोक्यावर घेतात, 

|| डोक्यात राख घालतात. 


-:🔹 आणि कांहीही खातात :------------ 


|| मार खातात, बोलणी खातात, डोके खातात, वेळ खातात, 

|| लिहितांना काना-मात्रा वेलांट्या खाऊन टाकतात. आणि 

|| कांही जण, तर पैसेही खातात... 🤪 🤪 


-:🔹 यांच्या शरीर शास्त्राच्या कल्पना तर काय :------------

-:🔹 विचित्र आहेत पाहा 😀 😅


|| यांचे हातपाय गळतात, काळजाचे पाणी होते, 

|| तोंडचे पाणी पळते. 


|| आता सांगा, परकियांना ही भाषा येणार कशी ? 

|| पण माझ्यावर या भाषेने कृपा केली आणि मला ती 

|| चांगली यायला लागली. 


   -:😂:-  आता "माझा जीव भांड्यात पडला"  -:😂:-

Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who

 Punekars! 🙋🏻‍♀️


*Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who want to plant them inside their compounds. . 

They will plant the saplings too , only maintainence will need to be done by the societies….


• Tabubiya yellow

• ⁠Tabubiya pink

• ⁠Palas pink, white, yellow 

• ⁠बहावा

• ⁠बकुळ 

• ⁠चाफा 

• ⁠करंज 

• ⁠कदंब 

• ⁠वड 

• पिंपळ 

• ⁠कडुनिंब 

• ⁠आंबा 

• ⁠चिंच 

• ⁠अर्जुन

• ⁠शिरीष 

• ⁠सदुंबर


Here is the format to share  while forwarding on your groups:


• Name of society / bunglow

• ⁠Type of saplings including number of each required.

• ⁠Contact person from society who will coordinate.


Interested?

Please message *Megha Lawand:*

+91 8149206443

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारणार महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात

 मुंबईपुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारणार

महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

 

मुंबईदि. 15 : महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात मंत्रालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयद्वारे प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. हा सांमजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.

या करारांतर्गत राज्यात तीन कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य व उत्कृष्टता केंद्रे उभारली जाणार असून त्यामध्ये मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठीपुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन व मार्व्हेल (MARVEL) अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.

          या भागीदारीचा उद्देश सार्वजनिक सेवा वितरण अधिक परिणामकारकवेगवान व नागरिक-केंद्रित बनवणे हा असूनकृत्रिम बुद्धिमत्ताहायब्रिड क्लाऊडडेटा अ‍ॅनालिटिक्ससायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर यामध्ये केला जाणार आहे.

या कराराद्वारे व्हर्च्युअल सहाय्यक आणि एजेन्टिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासकीय सेवा अधिक सुलभ आणि वैयक्तिक करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्सवरील मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे असणार असूनतंत्रज्ञानावर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहणार. जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रशासकीय प्रक्रिया अधिक आधुनिकअंदाजाधारित व पारदर्शक बनवली जाणार असून हायब्रिड क्लाऊडओळख व्यवस्थापन आणि सुरक्षित नागरिक प्रवेश प्रणाली यांवर विशेष भर दिला जाणार आहे.

आयबीएमच्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सरकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांना AI, सायबर सुरक्षा व क्लाऊड तंत्रज्ञान यामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.  त्याचबरोबर एमएसएमई आणि उद्योग क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता व ऑटोमेशन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणारज्यामुळे उत्पादनक्षमता व स्पर्धात्मकता वाढेल.

या सामंजस्य कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारमुख्य सचिव सुजाता सौनिकआयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.

000

Featured post

Lakshvedhi