Wednesday, 16 April 2025

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारणार महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात

 मुंबईपुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारणार

महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

 

मुंबईदि. 15 : महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात मंत्रालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयद्वारे प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. हा सांमजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.

या करारांतर्गत राज्यात तीन कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य व उत्कृष्टता केंद्रे उभारली जाणार असून त्यामध्ये मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठीपुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन व मार्व्हेल (MARVEL) अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.

          या भागीदारीचा उद्देश सार्वजनिक सेवा वितरण अधिक परिणामकारकवेगवान व नागरिक-केंद्रित बनवणे हा असूनकृत्रिम बुद्धिमत्ताहायब्रिड क्लाऊडडेटा अ‍ॅनालिटिक्ससायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर यामध्ये केला जाणार आहे.

या कराराद्वारे व्हर्च्युअल सहाय्यक आणि एजेन्टिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासकीय सेवा अधिक सुलभ आणि वैयक्तिक करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्सवरील मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे असणार असूनतंत्रज्ञानावर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहणार. जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रशासकीय प्रक्रिया अधिक आधुनिकअंदाजाधारित व पारदर्शक बनवली जाणार असून हायब्रिड क्लाऊडओळख व्यवस्थापन आणि सुरक्षित नागरिक प्रवेश प्रणाली यांवर विशेष भर दिला जाणार आहे.

आयबीएमच्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सरकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांना AI, सायबर सुरक्षा व क्लाऊड तंत्रज्ञान यामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.  त्याचबरोबर एमएसएमई आणि उद्योग क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता व ऑटोमेशन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणारज्यामुळे उत्पादनक्षमता व स्पर्धात्मकता वाढेल.

या सामंजस्य कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारमुख्य सचिव सुजाता सौनिकआयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi