Tuesday, 15 April 2025

वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

       मुंबईदि. १४ : मुंबई ही महाराष्ट्राची आहेअसे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले.

वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमास व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलारआमदार कालिदास कोळंबकरआमदार कॅप्टन तमिल सेलवन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणालेमुंबईतील त्यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राज्य शासन इंदू मिल येथे त्यांचे भव्य स्मारक साकारत आहे. त्यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. संविधानाच्या तत्त्वावर देशाचा कारभार सुरू आहे.  या संविधानानेच देशाच्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे. बाबासाहेबांचा पुतळा हा संविधानशिवाय अपूर्ण असतो. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून शोषितपीडित लोकांना न्याय देण्याचे काम केले. संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली. संविधान निर्माण करताना त्यांची दूरदृष्टी आणि बुद्धीची प्रगल्भता लक्षात येते.

डॉ. बाबासाहेबांचा मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर पहिला सत्कार मुंबईत झाला. एवढेच नव्हे तरकेंद्रीय मंत्री, प्रांतिक अध्यक्षगोलमेज परिषदेवरून देशात परत आल्यावरराज्यघटना पूर्ण करून परत आल्यानंतर अशा अविस्मरणीय क्षणी बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार मुंबईमध्येच झाला. बाबासाहेब यांनी वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चैत्यभूमीवर अभिवादन सभाही मुंबईतच पार पडल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनपटात त्यांना उजाळा देणारेत्यांच्या स्मृती जागविणारे अनेक प्रसंग मुंबईने अनुभवले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि प्रिंटिंगही मुंबईतच झाले. त्यांच्या राजकीय आयुष्याचे अनुष्ठान हे मुंबईतूनच सुरू झाले. शोषितांचा आवाज बनवून ते आयुष्यभर लढलेअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

          प्रास्ताविक आमदार कोळंबकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच  रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रामसेतु पहा रामसेतु chya अस्तित्वावर प्रश्न करणाऱ्यांनी


 

आरोग्य संदेश

 *नमस्कार*🙏🏻


1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.


2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..


3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.


4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.


5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.


6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.


7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.


8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.


9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..


10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर  असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..


11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.


12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.


13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.


14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.


15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल  तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो...


16)व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक च औषध लागू पडत नाही..वय,वजन,प्रकृती,रुग्णाची नाडी परीक्षा ,पूर्वी होऊन गेलेले आजार अशा अनेक गोष्टींवर treatment अवलंबून असते..


Health is Wealth

वैद्य स्वप्ना कुलकर्णी



🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

 युवा पिढीने योगाचा अंगीकार करून

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट

 

मुंबईदि. 9 : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत युवा पिढीला आणि महिलांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'अंतर योग फाउंडेशनला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंतर योग फाउंडेशन उपक्रमांची माहिती घेतली. तसेच फाउंडेशनद्वारे योग आणि मानसिक आरोग्यविषयक सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.

मंत्री पाटील म्हणालेया संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनामहिलांना आणि युवापिढीला योग व आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे प्रवृत्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही महत्त्वाची बाब असूनअशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.

यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

२५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय 'एचएसआरपी' बसवून मिळणार

 २५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच

फिटमेंट शुल्काशिवाय 'एचएसआरपीबसवून मिळणार

 

मुंबईदि. ९ : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटनासोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांनी निवासस्थानीव्यवसायाच्या ठिकाणी किंवा निवासी कल्याण संघटनासोसायटीमध्ये वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची एकत्रित बुकिंग केल्यास कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येणार आहे.

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येत आहे. अशा जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता तीन उत्पादकांची परिवहन विभाग मार्फत निवड केली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर ही पाटी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा. ही पाटी बसविण्याकरता वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी संचासह बसविण्याचे जीएसटी वगळून शुल्क

दुचाकी वाहने व ट्रॅक्टर ४५० रुपयेतीन चाकी वाहने ५०० रुपयेहलकी वाहनेप्रवासी कारमध्यम व जड वाहने ७४५ रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. या शुल्काशिवाय इतर कुठलेही शुल्क अनुज्ञेय नाही. काही फिटमेंट केंद्रामध्ये जुन्या वाहन नोंदणीच्या पाटी काढायचे शुल्क घेतले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी नागरिकांच्या याविषयी काही तक्रारी असल्यास त्यांनी 022- 20826498 या क्रमांकावर आणि hsrpcomplaint.tco@gmail.com या ईमेलवर कराव्यात असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी 17 एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी

17 एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

              मुंबईदि. 9 : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी 17 एप्रिल 2025 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

    मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता पाच अनुसूचित जातीअनुसूचित जमातीचे अशासकीय सदस्य आणि बिगर मागासवर्गीय संस्थामधील तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक असलेल्या व्यक्तीनी अर्ज व अर्जासोबत परिचयपत्र कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत 17 एप्रिल 2025 पूर्वी सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत, 4 था मजलाआर.सी. मार्गचेंबूर (पू)मुंबई-71 किंवा acswomumbaisub@gmail.com या ई-मेलवर अर्ज व परिचय पत्र पाठवावे.

              अशासकीय सदस्य पात्रतेचे नियम पुढील प्रमाणे आहेतसदस्य अनुसूचित जातीजमातीचा असावासदस्यास सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याचा अनुभव असावासदस्यास अनुसूचित जातीजमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 कायद्याचे ज्ञान असावेविधी शाखेची पदवी (एलएलबी किंवा एलएलएमअसलेले सदस्यांना प्राधान्य राहीलसदस्य मुंबई उपनगर जिल्ह्यात राहणारा असावा. अशासकीय सदस्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. (पृष्ठार्थ पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे) असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Monday, 14 April 2025

कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव,शेती, संस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाचा दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य सोहळा

 कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण

अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

शेतीसंस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाचा दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य सोहळा

 

मुंबई दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागकृषी उत्पादन बाजार समिती (एपीएमसी) पाटण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ चे आयोजन  दौलत नगरपाटण येथे दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. शेतीग्रामीण पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा महोत्सव ग्रामीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या महोत्सवात सर्व नागरिकांनाशेतकऱ्यांनापर्यटकांना आणि उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात येत आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ हा संस्कृतीसाहस आणि ग्रामीण विकासाचा परिपूर्ण संगम आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्स व ठरेल अशी माहिती पर्यटन मंत्री  शंभूराज देसाई यांनी  दिली.

महोत्सवाची वैशिष्ट्ये:

 

कृषी प्रदर्शन: शेतकऱ्यांना आपली उत्पादनेआधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन मांडण्याची संधी. शेतीशी संबंधित नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन

प्राणी आणि पक्षी प्रदर्शन: स्थानिक पशुधन आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे प्रदर्शनतसेच पशुपालकांसाठी मार्गदर्शन

आनंद मेळा: सर्व वयोगटांसाठी मनोरंजनात्मक उपक्रमखाद्यपदार्थांचे दालन आणि स्थानिक हस्तकलांचे प्रदर्शन

महिला बचत गटांचे दालन: महिला उद्योजकांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठतसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम

साहसी उपक्रम: घोडेस्वारीजलक्रीडा आणि इलेक्ट्रिक बग्गी राईड्स यांसारखे उपक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलानृत्य आणि संगीताचे सादरीकरण.

महोत्सवाचे उद्दिष्ट:

हा महोत्सव शेतकऱ्यांना फायदामहिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक संस्कृती आणि परंपरांचे जतन करत पर्यटकांना ग्रामीण महाराष्ट्राचे सौंदर्य अनुभवण्याची संधी उपलब्ध होईल. तसेचशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल.

0000

Featured post

Lakshvedhi