Monday, 14 April 2025

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान 620 चौ.फूटाची सदनिका; निविदा प्रक्रियेला गती द्यावी

 अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान 620 चौ.फूटाची सदनिका;

निविदा प्रक्रियेला गती द्यावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 11 : मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान 620 चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात व ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रविण दरेकरअजय चौधरीमाजी आमदार बाळा नांदगावकरमुख्य सचिव सुजाता सौनिकम्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह अभुदयनगर रहिवासी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभुदयनगर येथील म्हाडाच्या वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी यापूर्वी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 635 चौरस फूट असण्याबद्दल प्रमुख अट होती. मात्रविकासकाकडून ही अट व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र 635 चौ.फूट ऐवजी किमान 620 चौ.फूट चटई क्षेत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच निविदेमध्ये 620 चौ.फूटपेक्षा जास्त क्षेत्रफळ देणाऱ्या विकासकाचा विचार पुनर्विकासासाठी करण्याचे निर्देश दिले. या निर्णयास अभ्युदयनगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनुकुलता दाखविली.

या प्रकल्पासाठी पुनर्विकास विनियम 33(5) नुसार लागू असलेल्या 3 चटई क्षेत्र निर्देशांक हा अधिमूल्याच्या मोबदल्यात गृहसाठ्याच्या स्वरुपात वितरित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. पुनर्विकासादरम्यान रहिवाश्यांना देण्यात येणाऱ्या 20 हजार रुपये घरभाड्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. जयस्वाल यांनी या प्रकल्पातील आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या निर्देशानुसारपुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 620 चौ. फू. नुसार तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईलअसे सांगितले.

श्री. दरेकरश्री. चौधरी व श्री. नांदगावकर यांनी अभ्युदयनगर पुनर्विकास हा एक दिशादर्शक प्रकल्प होईलअसे सांगून रहिवाशांना पुनर्विकासादरम्यान देण्यात येणारे घरभाडे वाढवून देण्याच्या मागणीसह विविध मागण्या केल्या.

अभ्युदयनगर फेडरेशनचे तुकाराम रासमदिलीप शिंदेनिखिल दिक्षीत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की 300वीं जयंती के उपलक्ष्य में चर्चगेट स्टेशन के पास स्थित प्रतिमा का सौंदर्यीकरण • महाराष्ट्र विधान परिषद के सभापति प्रो. राम शिंदे की अध्यक्षता में हुई बैठक में निर्णय

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की 300वीं जयंती के उपलक्ष्य में

चर्चगेट स्टेशन के पास स्थित प्रतिमा का सौंदर्यीकरण

• महाराष्ट्र विधान परिषद के सभापति प्रो. राम शिंदे की अध्यक्षता में हुई बैठक में निर्णय

• महेश्वर का राजवाड़ाइंदौर की वास्तुकलाकाशी विश्वनाथ मंदिर के जीर्णोद्धार को कलात्मक रूप में प्रस्तुत किया जाएगा

 

मुंबईदिनांक 9 अप्रैल: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की चर्चगेट स्टेशन के पास स्थित प्रतिमा और उसके परिसर का सौंदर्यीकरण किया जाएगा। प्रतिमा की मरम्मत की जाएगी और उसके पीछे की दीवार पर अहिल्यादेवी होलकर के कार्यों का चित्रात्मक व प्रकाशयुक्त प्रस्तुतीकरण किया जाएगाजिसमें महेश्वर का राजवाड़ाइंदौर की वास्तुकलाकाशी विश्वनाथ मंदिर का जीर्णोद्धार और वृक्ष संवर्धन जैसे कार्यों को कलात्मक ढंग से दर्शाया जाएगा।

 

इस कार्य के संदर्भ में आज महाराष्ट्र विधान परिषद के सभापति प्रो. राम शिंदे की अध्यक्षता में मुंबई महानगरपालिका के सहायक आयुक्त श्री जयदीप मोरेअन्य अधिकारीगण और डॉ. असीम गोकर्ण हरवंश की उपस्थिति में बैठक आयोजित की गई।

 

इस अवसर पर यह निर्देश दिया गया कि यह कार्य 15 मई 2025 तक पूरा कर लिया जाए।

31 मई 2025 को पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की 300वीं जयंती है। इस जन्म त्रिशताब्दी के अवसर पर उनकी प्रतिमा को आकर्षक रूप में सजाया और पुष्पों से अलंकृत किया जाएगा।

Maharashtra, Bihar Governor participate in rj

 Maharashtra, Bihar Governor participate in rj

 

Mumbai 9 : Maharashtra Governor C P Radhakrishnan and Bihar Governor Arif Mohammed Khan participated in a Seminar on the theme 'World Peace & Harmony Through Interfaith Dialogue' organised on the occasion of Mahavir Jayanti in Mumbai on Mon ( 8 April).

The Interfaith Dialogue was organised by the Lokmat Media Group in association with the Ahimsa Vishwa Bharati.

Chairman of Lokmat Group Vijay Darda, Founder of Ahimsa Vishwa Bharati Dr Acharya Lokesh, President of All India Bhikkhu Sangha Dr Bhadant Rahul Bodhi and former DGP Dr P S Pasricha were among those present.

            Both the Governors jointly presented the 'Lokmat Peace and Harmony' awards to CMD of Cello Group Pradip Rathod, Chairman of JITO Prithviraj Kothari, President of Bharat Jain Mahamandal C C Dangi, Ujwal Pagaria, Vishal Chordiya, Nitin Khara, Prakash Dhariwal and Rajesh Jain.


. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल सांस्कृतिक क्षेत्रासाठी नवसंजीवनी; कलाकारांना मिळणार एकाच छताखाली सर्व सुविधा

 स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल सांस्कृतिक क्षेत्रासाठी नवसंजीवनी;

कलाकारांना मिळणार एकाच छताखाली सर्व सुविधा

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य  संकुलाचे लोकार्पण

मुंबई, दि. ९ : प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या 'स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्यया संकुलात ३६० डिग्री क्रोमा स्टुडिओरेकॉर्डिंगएडिटिंगमिक्सिंगचित्रीकरणऑडिओ-व्हिज्युअल अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमाहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई येथे  स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेपु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकरगायिका उतरा केळकर, कला व संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणालेस्वर गंधर्व सुधीर फडके यांच्या नावाने अद्याप काहीच नव्हतंआणि म्हणूनच हे नाव देणे हे सर्वार्थाने योग्य होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी  झालेल्या चर्चेनंतर सुधीर फडके’ हे नाव निश्चित करण्यात आले. या संकुलाच्या निमित्ताने स्व. सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे.

स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे नाव सुचविण्यापासून ते उभारणी पर्यंत विशेष मेहनत घेणार सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी...

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी...

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमहाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

            स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या चित्रपटातून समजते.

            या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी यांनीतर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. या चित्रपटाचे सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपूरफोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

 महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

             ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेचलाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटांचा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

            या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. या माहितीपटाचे मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहेतर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहेतर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त, – https://twitter.com/MahaDGIPR फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

 

            मुंबईदि. ९ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवारदि. १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटासहचित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या दिनानिमित्ताने महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने सकाळी ११ वाजता महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.

            ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्सफेसबुकयूट्यूब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

Featured post

Lakshvedhi