स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल सांस्कृतिक क्षेत्रासाठी नवसंजीवनी;
कलाकारांना मिळणार एकाच छताखाली सर्व सुविधा
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे लोकार्पण
मुंबई, दि. ९ : प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या 'स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य' या संकुलात ३६० डिग्री क्रोमा स्टुडिओ, रेकॉर्डिंग, एडिटिंग, मिक्सिंग, चित्रीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, गायिका उतरा केळकर, कला व संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, स्वर गंधर्व सुधीर फडके यांच्या नावाने अद्याप काहीच नव्हतं, आणि म्हणूनच हे नाव देणे हे सर्वार्थाने योग्य होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ‘सुधीर फडके’ हे नाव निश्चित करण्यात आले. या संकुलाच्या निमित्ताने स्व. सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे.
स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे नाव सुचविण्यापासून ते उभारणी पर्यंत विशेष मेहनत घेणार सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन
No comments:
Post a Comment