Sunday, 13 April 2025

मिरा भाईंदर येथील दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांच्या मालकीच्या जमिनीप्रकरणी खातेदारांना ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

 मिरा भाईंदर येथील दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांच्या मालकीच्या जमिनीप्रकरणी

खातेदारांना ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

 - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. ७ : मिरा भाईंदर येथील दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. या कंपनीच्या वादांकित मिळकतीपैकी काही मिळकतीस कुळ कायद्याच्या तरतुदी लागू झालेल्या आहेत. त्यापैकी ज्या कुळांना त्यांचे हक्क प्रदान करण्याची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे त्या मिळकतींचा शोध घेऊन नियमानुसार पात्र खातेदारांस कुळ कायदा कलम ३२ ग नुसार कायदेशीर अधिकार बहाल करण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोडल अधिकारी नेमून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच अशा खातेदारांना सदर जागेवरील बांधकामाकरीता कंपनीच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाहीअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांना विधीमंडळातील चर्चेदरम्यान दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंबंधीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.पटोले यांच्यासह आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. तरकोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी ऑनलाईन उपस्थित होते.

दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांच्या मालकीच्या जमिनीची विधिग्राह्यता व अनुषंगिक बाबींची तपासणी करण्यासाठी अप्पर आयुक्तकोकण एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल शासन स्तरावर स्विकृत करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेप्रस्तुतच्या मिळकती या सन 1870 मध्ये भाडेपट्याने प्रदान करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदरच्या मिळकती या भोगवटादार वर्ग 2 असणे कायद्याने आवश्यक आहे. परंतु सदरच्या मिळकती पैकी काही मिळकती या विनापरवानगी भोगवटादार वर्ग 1 करण्यात आलेल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदरच्या मिळकती विना परवानगी भोगवटादार वर्ग 1 करण्यात आल्या असल्याने त्याचा नियमानुसार पुन्हा भोगवटादार वर्ग 2 किंवा शासकीय पट्टेदार असा वर्ग लावण्यात यावा आणि प्रकरण निहाय पडताळणी करुन ज्या प्रकरणांमध्ये शर्तभंग झाला आहे त्या प्रकरणी आढावा घेण्यात यावा व शर्तभंग झालेल्या मिळकतीबाबत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

0000

ठाणे भुयारी गटारे योजनेतील ४,६५२ ब्रास माती व डेब्रीजचे स्वामित्वधन शासनाकडे जमा

 ठाणे भुयारी गटारे योजनेतील ४,६५२ ब्रास माती व

डेब्रीजचे स्वामित्वधन शासनाकडे जमा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. ७ :-  ठाणे महानगरपालिकेच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत भुयारी गटारे योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक सहकार्यातून करण्यात आलेल्या कामांमध्येसंबंधित ठेकेदारांनी ४,६५२ ब्रास माती व डेब्रीजचे स्वामित्वधन शासनाकडे जमा केले असल्याची माहितीमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात मुरबाड येथील आमदार किसन कथोरे यांनी विधानसभेते उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न क्र. ९६९-ठाणे महानगरपालिक हद्दीमध्ये भुयारी गटार योजनेचे ठेकेदार यांनी मातीची बेकायदेशीर वाहतूक करुन रॉयल्टी बुडविल्याबाबत आढावा बैठक घेण्यात आलीत्यावेळी महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अपर आयुक्त संदीप माळवीठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अपर जिल्हाधिकारीउपविभागीय अधिकारी व तहसीलदार दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

दरम्यानमौजे कोपरी गट क्रमांक ८६ मध्ये एन.सी.सी. व एस.एम.सी. (सेंटीज) जे. व्ही. कंपनीतर्फे अनधिकृत उत्खनन केल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीतसदर कंपनीने १९,०८९ ब्रास मातीचा भराव केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजेया उत्खननासंदर्भात कंपनीकडे कोणतीही अधिकृत परवानगी अथवा आदेश उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.

यामुळेमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम१९६६ च्या कलम ४८(७) अंतर्गत संबंधित कंपनीविरोधात कार्यवाही सुरू करण्यात आली असूनयासंदर्भात वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या. अंतिम सुनावणी दिनांक ४ मार्च २०२५ रोजी घेण्यात आली असून प्रकरण आता निर्णयासाठी बंद करण्यात आले आहेअशी माहिती महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिली.

0000

वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार* *तोंड येण्याची कारणे*

 *वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*


*तोंड येण्याची कारणे*


◼️कुपोषण


◼️आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली


◼️जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता


◼️दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे,


◼️दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे,


◼️कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे


◼️तंबाखूम दारू, गुटखा याचं सेवन करणे


◼️मानसिक ताणतणाव


◼️अपुरी झोप


◼️अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे


◼️कमी प्रतिकारशक्ती


◼️जीवनसत्त्वांची कमतरता


◼️वारंवार टुथपेस्ट बदलणे


◼️कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं.


*तोंड येणं म्हणजे नेमकं काय होतं?*


तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरडया, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णत: लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. अशा वेळी तोंडातून गरम वाफा निघाल्याचं जाणवतं. जिभेच्या कडा खडबडीत होतात. तिथेही फोड येतात. कधी कधी ताप येतो किंवा अंगात कणकण जाणवते.


 पचनसंस्थेवर ताण पडून शौचाच्या तक्रारीही निर्माण होतात. त्याचबरोबर भूक मंदावणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, इतर आजरावर सामोरे जावे लागतं. यासारख्या तक्रारी वारंवार तोंढ येण्याचे दिसून येतं. वारंवार तोंड आल्यामुळे अपचन, जुलाब, मोठया आतडयाचे विकार, मानसिक ताणतणाव अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं.


थोडक्यत शरीरातील ब गटातील जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी झालं की त्याचा मज्जा पेशींवर परिणाम होतो. त्वचा, ओठ, गालाचा आतील भाग, जीभ आणि घसा असे पचनसंस्थेतील महत्त्वाचे पाचकरस करणा-या ग्रंथी तसंच रक्त तयार करणा-या ग्रंथींचं जीवनसत्त्व बी गटामुळे होत असतं. मात्र या जीवनसत्त्वांच्या अभावाने खंड पडतो. आणि त्यांचं कार्य बिघडतं त्यामुळे तोंड येतं.


*तोंड येऊ नये म्हणून काय कराल?*

◼️तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता

◼️पान, तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक घोष्टींचं सेवन पूर्णपणे बंद करावं

◼️आहारात जीवनसत्त्व आणि चोथायुक्त पदार्थाचा समावेश करावा.

◼️भरपूर पाणी प्यावं. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे

◼️पुरेशी झोपही आवश्यक आहे. रात्रीच्या जागरणाने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेही तोंड येतं. म्हणून किमान सहा ते सात तास झोपणं आवश्यक आहे.

◼️तणावरहीत जगणं आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा मनावर ताण आल्याने त्याच्या परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो.

◼️तोंड आलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावावं. आणि लाळ थुकून टाकावी. तोंडात कात धरल्यानेही आराम पडतो. मात्र त्वरित आराम न पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


*शरीराला आवश्यक जीवनसत्त्व कोणती?*

» बी १ अर्थात थायमिन

» रायबोफ्लेवीन

» नायसीन


*ही जीवनसत्त्व कोणत्या पदार्थातून मिळतील?*


*थायमिन :* सर्व प्रकारची तृणधान्य, हातसडीचा तांदूळ, कोंडयासकट गहू, मोड आलेली कडधान्य, ज्वारी आणि बाजरी.


*रायबोफ्लेवीन :* दूध, तृणधान्य, डाळी यातून अधिक प्रमाणात मिळतं.


गर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉड ग्रंथीचे आजार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते.


*नायसीन :* संमिश्र आहार. तृणधान्य आणि दूध.


वारंवार तोंड येत असेल तर त्याची वर नमूद केल्याप्रमाणे बरीच कारणे आहेत..


तोंड अगदी लहान बाळाचे ही येते . दूध पिल्यानंतर तोंडाची व्यवस्थित स्वच्छता नाही केली तर.. 

किंवा एखादी व्यक्ती काही कारणास्तव औषधे घेत असेल तर, एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल तर अशी विविध कारणे असतात.


*

आपले सरकार' पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

 आपले सरकारपोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

 

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे.

या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील.

दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळेनागरिकांनीआपले सरकार सेवा केंद्र/ सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनीग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवा संबंधित कामांचे नियोजन पूर्वीच करावेअसे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभागमहाराष्ट्र शासन यांनी केले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी...

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमहाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या चित्रपटातून समजते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी यांनीतर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. या चित्रपटाचे सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपूरफोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ

चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

 

मुंबईदि. 13 : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवारदि. १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटासहचित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या दिनानिमित्ताने महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सकाळी ११ वाजता महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.

            ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्सफेसबुकयूट्यूब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स  https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब  https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

            महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेचलाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटांचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहेतर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहेतर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

End of 2026, Farmers to Receive 12 Hours of Free Electricity

 End of 2026, Farmers to Receive 12 Hours of Free Electricity

                                                                  – Chief Minister Devendra Fadnavis

 

Electricity bills will decrease every year for the next five years in Maharashtra

 

Major irrigation and employment generation to take place in Wardha district

 

CM inaugurates and lays foundation stone for various development projects in Arvi, including a new administrative building

 

Wardha, April 13 –Chief Minister Devendra Fadnavis today announced that by December 2026, 80% of the state’s farmers will receive 12 hours of free electricity throughout the year. He also stated that electricity bills for citizens across the state will reduce each year for the next five years. He made this announcement during the inauguration and foundation stone-laying ceremony for several development projects in Arvi, Wardha district.

He further assured that water and electricity for farming would be made available through irrigation projects like the Upper Wardha Project and the Wadhwan-Pimpalkhuta project. Employment opportunities will be created by establishing an MIDC industrial hub on the Samruddhi Mahamarg node passing through the district.

CM Fadnavis inaugurated a new administrative building in Arvi and virtually launched development works worth ₹720 crore. The event was attended by Minister of State for Home (Rural) and Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar, MP Amar Kale, MLAs Dadarao Keche, Sumit Wankhede, Sameer Kunawar, Rajesh Bakane, former MP Ramdas Tadas, District Collector Vanmathi C., and Zilla Parishad CEO Jitin Rahman.

He said the government has taken several initiatives for farmers’ welfare and has begun implementing them. Farmers had long demanded 12 hours of power supply for agriculture, and now the government is working to fulfill that promise. By December 2026, 80% of farmers will receive 12 hours of free power, 365 days a year. From 2025 to 2030, electricity bills for consumers in the state will be reduced annually. Moreover, households consuming up to 300 units of electricity, especially middle-class and low-income families, will receive free power under the solar energy scheme.

Various major development projects have been launched in Arvi constituency, which will boost the region’s progress. The government will fully support the implementation of irrigation projects like the Upper Wardha and Wadhwan-Pimpalkhuta lift irrigation schemes, ensuring abundant water and free electricity for agriculture. The Upper Wardha Project will generate 500 MW of electricity, and the Wadhwan-Pimpalkhuta scheme will also be approved soon.

Due to the Samruddhi Mahamarg, development in Wardha is accelerating. Upcoming projects like the Shaktipith Expressway starting from Wardha and the dry port at Sindi will turn the district into a logistics hub for Central India. The government will soon approve an MIDC at the Virul node along the Samruddhi Mahamarg, creating an ecosystem for industries and local employment. Maharashtra has signed MoUs worth ₹16.5 lakh crore at the World Economic Forum in Davos, of which ₹7 lakh crore is reserved for Vidarbha. Large-scale investments are expected in Wardha and other districts. Gadchiroli is emerging as a steel capital, and the state has offered special incentives for iron ore-based industries in Wardha, Chandrapur, Gadchiroli, and Nagpur.

The Wainganga-Nalganga River Linking Project will benefit drought-prone areas across 10 districts in Vidarbha. Through this project, a new 550 km-long river will be created using 62 TMC overflow water from the Gosikhurd Dam. A provision of ₹1 lakh crore has been made for this project, and all necessary approvals are in place. Work is expected to begin by the end of this year or early next year.

 

Historic Moment for Wardha – Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar

 

Dr. Bhoyar remarked that CM Fadnavis inaugurated 11 major development works worth ₹720 crore across three talukas in Arvi constituency, marking a turning point for the district's growth. He also mentioned that 476 government schools in the state are being transformed into model schools, with the first phase launching on April 14, 2025, on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary. Three schools from Arvi are included in this initiative, which aims to bring positive change in the education sector.

MP Amar Kale, MLAs Sumit Wankhede and Dadarao Keche addressed the audience. District Collector Vanmathi C. gave the introduction, and Arvi Sub-Divisional Officer Vishwas Shirsat delivered the vote of thanks.

 

CM Inaugurates Administrative Building and 10 e-Groundbreaking Events

 

CM Fadnavis inaugurated the new administrative building in Arvi and conducted 10 virtual inaugurations and foundation stone-laying ceremonies, including:Arvi Lift Irrigation Scheme, New building at Gandhi Vidyalaya, Arvi,Swimming pool in Arvi cityInternal road development in Arvi,Beautification of Sarangpuri Lake100-bed hospital at Arvi Sub-District HospitalInauguration of PM Suryaghar Free Electricity Scheme (Solar Village Neri Mirzapur, Arvi Taluka)Roadworks in Karanja Taluka under MIDC HAM Phase-2Launch of six official vehicles under the 100-day campaign.

 

000

Featured post

Lakshvedhi