Wednesday, 9 April 2025

महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार

 जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या

 चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण

 महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

 महेश्वर येथील राजवाडाइंदोर येथील वास्तूशिल्पकाशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार

 

मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्यमहेश्वर येथील राजवाडाइंदोर येथील वास्तूशिल्पकाशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दारवृक्षसंवर्धन याबाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका सहायक आयुक्त श्री.जयदीप मोरे आणि अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश यांची या कामासंदर्भात बैठक झाली. हे काम दिनांक १५ मे२०२५ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक ३१ मे२०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभीत आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे.

                               

महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार

 जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या

 चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण

 महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

 महेश्वर येथील राजवाडाइंदोर येथील वास्तूशिल्पकाशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार

 

मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्यमहेश्वर येथील राजवाडाइंदोर येथील वास्तूशिल्पकाशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दारवृक्षसंवर्धन याबाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका सहायक आयुक्त श्री.जयदीप मोरे आणि अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश यांची या कामासंदर्भात बैठक झाली. हे काम दिनांक १५ मे२०२५ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक ३१ मे२०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभीत आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे.

                                        

 

गिग कामगारांना संरक्षण; ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 गिग कामगारांना संरक्षणई-श्रम पोर्टलवर

नोंदणी करण्याचे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

मुंबईदि. ८ : असंघटित कामगारांसाठी विविध योजना सध्या अस्तित्वात आहेतमात्र गेल्या काही वर्षापासून गिग कामगारांची संख्यादेखील लक्षणीय वाढत आहे. अशा कामगारांसाठी केंद्र शासनाकडून विशेष पोर्टल तयार करण्यात आले असूनत्याअंतर्गत त्यांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा गिग कामगारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार विभागाने पुढाकार घेतला असूनकेंद्राच्या ई-श्रम पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नि. वा. नगरारे यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.

गेल्या काही वर्षात ओलाउबेरझोमॅटोस्वोगी अशी प्लॅटफॉर्म इकोनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगारनिर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सुरक्षित भविष्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत अशा असंघटित कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या आशा कामगारांना विधिध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे झोमॅटोस्वीगीओलाउबेर यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याऱ्या डिलिव्हरी बॉयराइडरड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अशा गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration  या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावीअसे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे फायदे

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास नोंदणीधारकास विविध सामाजिक सुरक्षा योजना आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. या नोंदणीद्वारे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना औपचारिक ओळख मिळेल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.

झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र योजनेला गती देण्यासाठी अधिनियमात सुधारणा झोपडपट्टी घोषित झाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव ६० दिवसांत द्यावा लागणार

 झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र योजनेला गती देण्यासाठी अधिनियमात सुधारणा

झोपडपट्टी घोषित झाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव ६० दिवसांत द्यावा लागणार

राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देऊन महाराष्ट्र झोपडमुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा व पुनर्वसन कायद्यात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मधील तीन तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. झोपडपट्टीची जमीन झोपडपट्टी क्षेत्र घोषित केल्यानंतरजमीन मालकविकासक किंवा सहकारी संस्थेला या जमिनीवरील पुनर्वसनाचा प्रस्ताव १२० दिवसात सादर करावा द्यावा लागत असे. ही मुदत आता ६० दिवसांची करण्यात येणार आहे. या ६० दिवसांत संबंधितांनी प्रस्ताव न दिल्यास झोपडपट्टीचे क्षेत्र पुनर्विकासासाठी इतर प्राधिकऱणास सोपवू शकणार आहेतयाबाबतची दुरूस्ती कलम १५(१) मध्ये केली जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टी पूनर्वसन योजना शासकीयनिमशासकीय महामंडळेप्राधिकरणे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर राबवण्यात येत असल्यासत्यांना आता योजनेला आशयपत्र दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत ही जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिली जाईल. जेणेकरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक किंवा वित्तीय सस्थांकडून कर्जअर्थसहाय्य मिळवणे शक्य होणार आहे. याबाबतची दुरूस्ती कलम १५ – अ मध्ये केली जाणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना व प्रकल्पांमध्ये स्वेच्छेने सहभागी न होणाऱ्या झोपडपट्टीवासियांबाबत करावयाची कार्यपद्धती आता कलम ३३-अ मध्ये विस्ताराने समाविष्ट करण्यात येत आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडीधारकांना संक्रमण शिबीराऐवजी भाडे देण्यात येते. पण झोपडपट्टी धारकांना विकासकांकडून हे भाडे वेळेत दिले जात नाही. त्याची थकबाकी वाढत जाते. संक्रमण शिबीराचे भाडे किंवा इतर देणे विकासकाकडून वसूल करता यावे यासाठीची कायदेशीर तरतूद करण्यासाठी कायद्यात ३३-बी नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. यात विकसकांकडून भाडे थकबाकीची वसुली महसुली कायद्यानुसार केली जाणार आहे.

--0


सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करणार

 सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करणार

- सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार

  मुंबई, दि. ८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व समाजघटकांनी सहभाग घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

समता पर्व सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सर्व शासकीय वसतीगृहसर्व दिव्यांग शाळा व समाज कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये व्याख्यानरक्तदान शिबिरविविध उपक्रमांच्या अनुषंगाने कार्यशाळा, विविध प्रबोधनकारक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक व महिला मेळावा इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाबरोबरच इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावाअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

सामाजिक समता सप्ताहात हे उपक्रम राबविले जाणार

दि. ९ एप्रिल२०२५ रोजी  विभागातील सर्व शाळामहाविद्यालयेशासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचांरावर आधारित वक्तृत्व स्पर्धानिबंध स्पर्धालघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार.

दि. १० एप्रिल२०२५ रोजी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार.

दि. ११ एप्रिल२०२५ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार.

️ दि. १२ एप्रिल२०२५ संविधान जागर भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देण्यात येत आहे तसेच संविधानाची निर्मितीसंविधान निमिर्ती समितीअनुच्छेदविशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात येणार.

️ दि. १३ एप्रिल२०२५ रोजी प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात येत असूनजिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळामहाविद्यालयेशासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार .

️ दि. १४ एप्रिल२०२५ रोजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयेशाळामहाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन व इतर कार्यक्रमव्याख्यानेचर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात ऑनलाईन जातपडताळणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

0000

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबवावी

 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनाअधिक प्रभावीपणे राबवावी

- रोहयो मंत्री भरत गोगावले

 

मुंबईदि. ८ : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनाअधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले  यांनी दिले.

मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात आयोजित मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप अडसडनाना पटोलेविनोद अग्रवालअभिमन्यू पवारराजू तोडसाम,  राजेंद्र पाटील आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. गोगावले म्हणाले, योजनेतील कामे वेळेत व दर्जेदार व्हावीतकेंद्र शासनाकडून प्रलंबित निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावातसेच रोहयो अंतर्गत न होणारे रस्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी योग्य रस्ता सुविधा मिळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. कामांची गुणवत्ता राखत ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष लक्ष द्यावे.

राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध नाहीतत्या ठिकाणी कामांसाठी पर्यायी समायोजन करावे. मजूर उपलब्ध नसणे ही अंमलबजावणीतील मोठी अडचण असूनत्यावर तातडीने उपाययोजना करावी. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

Featured post

Lakshvedhi