Wednesday, 9 April 2025

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबवावी

 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनाअधिक प्रभावीपणे राबवावी

- रोहयो मंत्री भरत गोगावले

 

मुंबईदि. ८ : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनाअधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले  यांनी दिले.

मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात आयोजित मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप अडसडनाना पटोलेविनोद अग्रवालअभिमन्यू पवारराजू तोडसाम,  राजेंद्र पाटील आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. गोगावले म्हणाले, योजनेतील कामे वेळेत व दर्जेदार व्हावीतकेंद्र शासनाकडून प्रलंबित निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावातसेच रोहयो अंतर्गत न होणारे रस्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी योग्य रस्ता सुविधा मिळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. कामांची गुणवत्ता राखत ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष लक्ष द्यावे.

राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध नाहीतत्या ठिकाणी कामांसाठी पर्यायी समायोजन करावे. मजूर उपलब्ध नसणे ही अंमलबजावणीतील मोठी अडचण असूनत्यावर तातडीने उपाययोजना करावी. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi