Tuesday, 8 April 2025

घराचे वास्तुशात्र*

 *घराचे वास्तुशात्र*


     जिथे आपण सर्वजण *एकत्र राहतो,* एकमेकांना *आधार* देतो, *सुखदुःखे* वाटून घेतो. *ती वास्तू* फक्त आनंदी नसावी तर *समाधानी* असावी. आनंद हा *भौतिक पातळीवर* असतो आणि समाधान *आत्मिक पातळीवर* असते.     

😁  *साखर, लिंबू, मीठ* हे सारे पदार्थ *आपापल्या* आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते *एकमेकांत मिसळतात,* तेंव्हाच विलक्षण *मधुर चवीचे* सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला *कापून आणि पिळून* घ्यावे लागते तर *मीठ व साखरेला* पाण्यात *विरघळून* एकजीव व्हावे लागते.

☝️ *म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.* कारण *गृहमंदिरात* जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर *चवदार सरबत* नाही तर *मधुर-अमृत* तयार होईल.

✌आपले *आईबाबा* एकमेकांशी किती प्रेमाने *वागताहेत* हे बघून मुलांच्या *मनावर आणि शरीरावर* अत्यंत *शुभ परिणाम* होतो.अन्यथ: ती मनातल्या मनात *कुढत* राहतात.

🙏मुले ही *अनुकरणप्रिय* असतात. आईचा *कडवट चेहरा,* वडिलांचा *आरडा-ओरडा* घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग *वास्तुतज्ज्ञ* या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त *अतार्किक, अशास्त्रीय* आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो. आणि आपण *निर्बुद्ध मंडळी* त्यावर हजारो रुपये खर्च करुन *पस्तावतो.*

🌞 अरे, *बाबांनो* कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर *पैसे घेऊन* तुमच्या घरात *"शांती"* आणणे  शक्य आहे का.?!!! 

*तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 

🤺ज्येष्ठ नागरिकांनी *प्रकृती साथ* देत असेल तर, *अर्थार्जन* करून मुलांना हातभार लावावा. 

*रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.* काहीही कारण नसताना सारखे *लोळत पडलेली* माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.

   🏌️‍♂️मुलांनीही *जन्मभर कष्ट* केलेल्या *आई-वडिलांशी* खूप *नम्रतेने* वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. *सून* म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला *खूप प्रेम आणि आधार* द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली *आधुनिक मुलगी* आहे. आपणच *जनरेशन गॅप* कमी करावा. अर्थात *सुनेने सुद्धा* सासरी साऱ्यांना असा *लळा* लावावा, की सून माहेरी गेली की *सुनं-सुनं* वाटलं पाहिजे.

🍔घरात मेणबत्या *फुंकून* आणि *डोक्यावर कचरा* पाडून घेऊन वाढदिवसाचा *धांगडधिंगा* करण्यापेक्षा मुलाचे *निरांजन* ओवाळून *औक्षण* करावे. भोजनाचे वेळी *आनंदी वातावरण* ठेवावे. *पत्नी जेवली का* विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप *संयमाने* बोलावे.एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण *चिडला* तर दुसऱ्याने *शांत* बसावे. 

🤓पहा ना,गवत नसलेल्या जागी *पडलेला अग्नी* जसा *आपोआप शांत* होतो, तसे *सारे शांत* होईल. चालतानाही *घरात पाय आपटू नयेत.* शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच *भांड्यांची* आदळ-आपट करु नये. *पुरुषांनीही* घरात *नीटनेटके* रहावे. सतत फक्त *बायकांनीच* सदाफुलीसारखे *टवटवीत* राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.

*⚘अशी राहते समाधानी वास्तु!*⚘

म्हणून म्हणतो, *तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ* आणि करा आपली *वास्तुदेवता प्रसन्न.* !!

👇🏻घरातील प्रत्येकाच्या *मोबाईलमध्ये* हा मॅसेज गेला, तर प्रत्येक घर *सुखी व समाधानी* होऊ शकेल.👌👌👌👌👌👌       

अत्यंत भावनिक लेख   

Copy paste

दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार,स्वतंत्र घरकुल योजना,अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश

 दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

  • दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजनाधोरणांची निर्मिती करावी
  • विशेष सहाय्य योजनेचे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे जमा
  • घरकुलासाठी स्वतंत्र योजना

 

             मुंबईदि. ७ : जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो. अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी काल सुसंगत नवनवीन योजनाधोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या. 

सह्याद्री अतिथिगृह येथे दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमाजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडूमुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

दिव्यांगाच्या रोजगारासाठी धोरण

  राज्यातील दिव्यांगाना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षणरोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.दिव्यांगाच्या रोजगाराकरिता धोरण तयार करण्यात येणार असून रोजगार व स्टॉल बाबतचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योग विभागाला दिले आहे.

लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होणार

  राज्यातील दिव्यांग बांधवांना अधिक सुलभतेने लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असूनलाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग बांधवांचे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

            दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे

राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजनेचे अर्थसाहाय्य थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक झाले नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

दिव्यांग सर्वेक्षण प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम

   दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्रासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र नसल्यामुळे शासकीय योजनासवलतीशिक्षणनोकरी आणि आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी अडचणी येतात. यासाठी आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहीम राबवावी.

प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था

            राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात सुलभ व सन्मानपूर्वक प्रवेश मिळावा यासाठी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात यावी. यामध्ये दिव्यांग अनुकूल पायाभूत सुविधासहाय्यक उपकरणेविशेष मार्गदर्शन केंद्रे आणि समुपदेशन सेवा यांचा समावेश असावा.  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत शासन सकारात्मक विचार आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा.

अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश

अंत्योदय अन्न योजनेत पात्र दिव्यांगांचा तातडीने समावेश केला जाणार असूनज्यांचा समावेश विद्यमान निकषांमध्ये होऊ शकत नाहीअशा दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शासन स्वतंत्र योजना तयार करणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने पात्र दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिका वाटप करण्यात येत आहेत.

दिव्यांगासाठी जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या  सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. या निधीमधून दिव्यांग व्यक्ती साठीच्या सर्व सोयी सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा दिव्यांग भवन उभारण्यात येईल.

स्वतंत्र घरकुल योजना

   दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार आहे. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाहीअशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक जागेसाठीही शासन मदत करणार आहे.

            दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून कर्जमाफीसार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासकीय रुग्णालयात दर्जेदार औषधे मिळणेदिव्यांगाच्या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने दिव्यांगावर पाच टक्के खर्च करणे,  प्रशिक्षण व स्वतंत्र क्रीडा स्टेडियमअति तीव्र दिव्यांगाचे संगोपनमानधन असलेल्या पदांमध्ये दिव्यांगाना प्राधान्यजिल्हास्तरावर तालुकास्तरावर विविध समितीमध्ये दिव्यांग सदस्यांची नियुक्तीराज्यस्तरावर दिव्यांगासाठी फेस्टिवलचे आयोजन करणे याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विविध विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.


पत्रकारांना मंत्रालयात दुपारी २ वाजेनंतर प्रवेशाचे निर्देश पत्र रद्द

 पत्रकारांना मंत्रालयात दुपारी २ वाजेनंतर प्रवेशाचे निर्देश पत्र रद्द

 

मुंबईदि. ७ विविध दैनिकवृत्तवाहिन्यांचे पत्रकार व प्रतिनिधींना प्रवेशासाठी त्यांचे ओळखपत्र (आरएफआयडी कार्ड) व सर्व सुरक्षा विषयक तपासणी करून दुपारी २ वाजेनंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात यावाअसे निर्देश पत्र २४ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आले होते. पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशाबाबतचे हे निर्देश गृह विभागाकडून रद्द करण्यात आले आहेअसे कक्ष अधिकारी डॉ. प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन

 

मुंबईदि. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी दादर येथे १४ आणि १५ एप्रिल २०२५ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन समारंभभीमगीतेपुस्तक स्टॉल आणि स्काऊट गाईड्स हॉल येथे विशेष कार्यक्रमांद्वारे जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन नागरीकांनी विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक तथा बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

 या विशेष सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता रॅलीने होणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतादुतांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 पुणे येथील बार्टीच्या कार्यालयात  जयंतीनिमित्त आजपासून १४ एप्रिल पर्यंत भारतीय संविधान अमृत महोत्सव सप्ताह संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध सामाजिकशैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरआरोग्य तपासणीविद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्यविषयक मार्गदर्शनमहात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनअभिवाचन कार्यक्रमदुर्मिळ छायाचित्र आणि ग्रंथप्रदर्शन यांचा समावेश आहे.

 

कार्यक्रमाची रुपरेषा :

• ८ एप्रिल रोजी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या भीम गीताचा कार्यक्रम दुपारी २: ३० ते ५:३० यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

• १० एप्रिल रोजी १२ तास वाचन दिन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आणि अधिकाऱ्यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अभ्यासासाठी प्रेरित करण्यात येईल.

• ११ एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील नाट्य सादर करण्यात येणार आहे.

0000

आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान...

 आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या

आरोग्य संस्थांचा सन्मान...

* राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा - मोतीबिंदू शस्त्रक्रिया - प्रथम - बीडद्वितीय - धाराशिव

* कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा - प्रथम - नांदेडद्वितीय - पालघरलातूर महानगरपालिका

* मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय - प्रथम - उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजकोल्हापूरद्वितीय - उपजिल्हा रुग्णालय अचलपूरअधिकाधिक मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे ५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय - प्रथम - उपजिल्हा रुग्णालय देगलूरजिल्हा नांदेडद्वितीय - उपजिल्हा रुग्णालय गंगाखेडपरभणी

अधिकाधिक मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण रुग्णालय प्रथम - ग्रामीण रुग्णालय अहमदपूरजिल्हा लातूरद्वितीय ग्रामीण रुग्णालय माहूरजिल्हा नांदेड

            गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत सर्वात जास्त संस्थांना राष्ट्रीय पातळीवर प्रमाणित करणारा जिल्हा प्रथम - लातुरद्वितीय धाराशिव

जास्त प्रसुती करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) - प्रथम - प्राथमिक आरोग्य केंद्र साईवन ता. डहाणू जिल्हा पालघरद्वितीय - प्राथमिक आरोग्य केंद्रशेंदूर्णी ता. जामनेर जिल्हा जळगाव

जास्त प्रसुती करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (महानगरपालिका) - नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आकुर्डीपिंपरी चिंचवड महानगरपालिका

जास्त प्रसुती करणारे ग्रामीण रुग्णालय - प्रथम ग्रामीण रुग्णालय धडगावजिल्हा नंदुरबारद्वितीय ग्रामीण रुग्णालय स्पर्श सस्तूरता. लोहारा जिल्हा धाराशीव

आरबीएसके कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा (विद्यार्थी तपासणीहृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया). प्रथम कोल्हापूरद्वितीय - पुणे

असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम - सातारा द्वितीय वाशीम

सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणारा जिल्हा (सिकलसेल तपासणी) प्रथम नागपुर द्वितीय नाशिक

            उल्लेखनीय कामगिरी करणारे विशेष नवजात शिशु काळजी कक्ष (SNCU) - प्रथम डागा रुग्णालयनागपुर द्वितीय उपजिल्हा रुग्णालयजव्हार जिल्हा पालघर

उल्लेखनीय कामगिरी करणारे पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) - प्रथम - उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडाजिल्हा यवतमाळद्वितीय जिल्हा रुग्णालयहिंगोली

मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमय) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम ठाणेद्वितीय नांदेड

पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्हा प्रथम धाराशीव

पाच वर्षात सातत्याने मातामृत्यू कमी करणारा जिल्हा - प्रथम रायगड

सर्वात जास्त In-house Dialysis करणाऱ्या आरोग्य संस्था प्रथम - डायलिसीस सेंटरचंद्रपुरद्वितीय - जिल्हा रुग्णालयगडचिरोली

उल्लेखनीय कामगिरी करणारे अतिदक्षता कक्ष (ICU) - जिल्हा रुग्णालय धुळे

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम गोंदियाद्वितीय धाराशीव

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय काम करणारी महानगरपालिका: प्रथम मालेगावमहानगरपालिकाद्वितीय धुळे महानगरपालिका

कष्ठरोग निर्मलन कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम चंद्रपुरद्वितीय सातारा

जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा

जिल्हा आरोग्य अधिकारीअकोलाद्वितीय जिल्हा आरोग्य अधिकारीधाराशीव

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा: प्रथम जिल्हा शल्य चिकित्सक वाशिमद्वितीय जिल्हा शल्य चिकित्सकनाशिक

वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी महानगरपालिका - प्रथम वैद्यकीय आरोग्य अधिकारीसांगली महानगरपालिकाद्वितीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका

उल्लेखनीय कामगिरी करणारे 100 खाटांचे रुग्णालय प्रथम उपजिल्हा रुग्णालय कराड जिल्हा साताराद्वितीय उपजिल्हा रुग्णालयशहापूर जिल्हा ठाणे

उल्लेखनीय कामगिरी करणारे महिला रुग्णालय प्रथम महिला अकोलाद्वितीय महिला रुग्णालयअमरावती

किडनी ट्रांसप्लांट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे रुग्णालय - विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी - ग्रामीण भाग- हिंगोली जिल्हाशहरी भाग - पनवेल महानगरपालिका


गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमूख सोयी सुविधांची उभारणी

 गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम

मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमूख सोयी सुविधांची उभारणी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 7 : सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला, नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली  असून पोलीस ठाणे लोकाभिमूख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस स्थानकातील उत्कर्ष सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र हा सायबर गुन्हेगारी नियंत्रणामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याची मुंबई पोलीसांची मोठी क्षमता आहे. सायबर गुन्ह्याच्या  एक प्रकरणात 12 कोटी रुपये वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आह. भविष्यातील सायबर गुन्ह्यांचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दलाने आतापासूनच अनेक उपक्रम हाती घेतले असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी महत्वाचे असलेले अत्याधुनिक तीन सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. या लॅबचे आज लोकार्पण करण्यात येत आहे. डीजिटल अरेस्ट सारख्या प्रकरणांमध्ये चांगले सुशिक्षीत लोकही पैसे देत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. मुंबई पोलीसांच्या उपक्रमांना साथ देणारे अभिनेते आयुष्यमान खुराणा आणि निर्माते साहित कृष्णन यांचे अभिनंदन करतोअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीकेंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कायदे हे खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचे सांगून गुन्हे प्रकटीकरणपुरवा याविषयीच्या कायद्यामुळे आता गुन्ह्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. गुन्ह्याच्या तपासकामी तंत्रज्ञान वापरासही आता परवानगी मिळालेली आहे. महिलांमध्येही आता बदल होत असून पुर्वी समाजिक दबावांमुळे महिलांविषयीच्या गुन्ह्यांची नोदणी कमी होती  आता त्यामध्ये वाढ झाली आहेही एक चांगली बाब आहे. महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठीही आणि महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस स्थानकांमध्ये महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे महिलांविषयीचे गुन्हे नोंदवताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही याची खात्री असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पार्क साईट पोलीस स्थानकांची नुतन  इमारत उत्कृष्ट झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणालेतसेच आझाद मैदन पोलीस ठाण्यामधील उत्कर्ष सभागृहाचे काम ही उत्कृष्ट झाले असून याला पूर्वीचे ऐतिहासिक रुप पुन्हा प्राप्त झाले आहे. शासनाने प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कार्यक्रम आखून दिला होता. या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट पालन मुंबई पोलीस दलाने केले आहे. पोलीस दलाचा कायाकल्प झाला आहे. याशिवाय राज्यात महिला पोलीस ठाणे उभारण्याऐवजी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस अधिकारीअंमलदार यांची नेमणूक करून पोलीस दलाचे कामकाज जास्तीत जास्त महिलाभिमुख करणयात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सुरुवातील मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पोलीसांच्या नवीन मोटर सायकलइंटरेप्टर व्हेईकलफॉरेन्सिक लॅब व्हॅननिर्भया पथकाच्या व्हॅन यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आझाद मैदान येथील उत्कर्ष सभागृहपार्क साईट पोलीस स्टेशनची नुतन इमारतयांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मुंबईतील 87 पोलीस ठाण्यातील महिला व बाल सहाय्यता कक्ष216 पोलीस ठाणे व उपायुक्त कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेली दूरदृष्य प्रणाली यंत्रणापोलीस विभागाची एक्स हॅन्डलयांचे लोकार्पणमिशन कर्मयोगी माहिती पुस्तिकेचे अनावरण व मिशनचे कार्यन्वयनपोलीस प्रशिक्षणाचे कार्यान्वयन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फणडवीस यांनी पार्क साईट पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्याशी संवाद साधून नुतन इमारतीविषयीच्या त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि अशाच प्रकारे लोकाभिमूख कारभार करण्यासाठी संपूर्ण मुंबई पोलीस दलास शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमास गृह राज्यमंत्री योगेश कदमगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहलमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरअतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह मुंबई पोलीस दलातील अधिकारीकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा

 सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई शहरातील तीन सायबर प्रयोगशाळांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. ७ : सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे  डी. बी. नगर पोलीस स्टेशन येथे उद्घाटन करण्यात आले.  यासोबतच मुंबई (मध्य) भागासाठी वरळी पोलीस स्टेशन येथील व मुंबई (पूर्व) भागासाठी गोवंडी पोलीस स्टेशन येथील सायबर प्रयोगशाळांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

 

कार्यक्रमास गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदमअप्पर मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल,  मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरविशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आदींसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मुंबई शहरात पाच सायबर प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत.  यापैकी तीन प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विशेषत्वाने सायबरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे कमी कालावधीत सिद्ध करता येणार आहे.  तसेच गुन्हा लपवण्यासाठी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणातील डाटा डिलीट केल्यास,  मोबाईलची तोडफोड केल्यास किंवा मोबाईल टेम्पर केल्यास अशा सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील सर्व डेटा आधुनिक संगणक प्रणालीच्या सहाय्याने रिकव्हर केला जाणार आहे.  प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून  अद्ययावत संगणक प्रणालीने (सॉफ्टवेअर) सक्षम आहेत.

 

जगातील या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान या प्रयोगशाळांमध्ये उपयोगात आणले जाणार आहे. आर्थिक गुन्हेगारी संदर्भात ऑनलाईन पद्धतीने परस्पर पैशांची हेराफेरी करणेबँक खाते हॅक करणे अशा पद्धतीच्या गुन्ह्यांवरही प्रयोगशाळेच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्यात येणार आहे.                       


Featured post

Lakshvedhi