Tuesday, 8 April 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन

 

मुंबईदि. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी दादर येथे १४ आणि १५ एप्रिल २०२५ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन समारंभभीमगीतेपुस्तक स्टॉल आणि स्काऊट गाईड्स हॉल येथे विशेष कार्यक्रमांद्वारे जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन नागरीकांनी विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक तथा बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

 या विशेष सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता रॅलीने होणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतादुतांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 पुणे येथील बार्टीच्या कार्यालयात  जयंतीनिमित्त आजपासून १४ एप्रिल पर्यंत भारतीय संविधान अमृत महोत्सव सप्ताह संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध सामाजिकशैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरआरोग्य तपासणीविद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्यविषयक मार्गदर्शनमहात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनअभिवाचन कार्यक्रमदुर्मिळ छायाचित्र आणि ग्रंथप्रदर्शन यांचा समावेश आहे.

 

कार्यक्रमाची रुपरेषा :

• ८ एप्रिल रोजी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या भीम गीताचा कार्यक्रम दुपारी २: ३० ते ५:३० यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

• १० एप्रिल रोजी १२ तास वाचन दिन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आणि अधिकाऱ्यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अभ्यासासाठी प्रेरित करण्यात येईल.

• ११ एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील नाट्य सादर करण्यात येणार आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi