Sunday, 6 April 2025

अंतरराष्ट्रीय पीडी चैंपियंस ट्रॉफी 2025 की विजेता भारतीय दिव्यांग क्रिकेट टीम को खेल मंत्री ने दी बधाई

 अंतरराष्ट्रीय पीडी चैंपियंस ट्रॉफी 2025 की विजेता

भारतीय दिव्यांग क्रिकेट टीम को खेल मंत्री ने दी बधाई

 

दिव्यांग क्रिकेट की प्रगति के लिए सरकार की ओर से हरसंभव सहयोग

 — खेल मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, 5 अप्रैलकोलंबोश्रीलंका में आयोजित पीडी चैंपियंस ट्रॉफी 2025 में इंग्लैंड को हराकर विजेता बनी भारतीय दिव्यांग क्रिकेट टीम को महाराष्ट्र के खेल एवं युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे ने बधाई दी है। उन्होंने कहा कि दिव्यांग क्रिकेट को आगे बढ़ाने के लिए सरकार की तरफ से हरसंभव सहायता प्रदान की जाएगी।

हाल ही में मंत्रालय में विजेता खिलाड़ियों का सत्कार किया गयाजहां श्री भरणे ने खिलाड़ियों की जिदखेल के प्रति समर्पण और कठिन परिस्थितियों में भी आगे बढ़ने की जज्बे की सराहना की। उन्होंने कहा कि यह ऐतिहासिक जीत न केवल टीम के लिए बल्कि देशभर के युवा दिव्यांग खिलाड़ियों के लिए प्रेरणास्त्रोत साबित होगी।

इस विजयी टीम की कप्तानी विक्रांत केणी ने कीजबकि रवींद्र संते उपकप्तान रहे। टीम के प्रमुख खिलाड़ियों में अखिल भारतीय ऑलराउंडर आकाश पाटील और प्रमुख बल्लेबाज कुणाल फानसे शामिल थे।

इस अभिनंदन समारोह में डीसीसीआई समिति सदस्य श्री कल्पेश पुंडलिक गायकरव्हीलचेयर स्पोर्ट्स एसोसिएशन के अध्यक्ष विश्वनाथ गुरवमुंबई व्हीलचेयर क्रिकेट टीम के कप्तान राहुल रामुगडेऔर पैरा शूटर एवं व्हीलचेयर बास्केटबॉल खिलाड़ी प्रशांत विष्णू नेरपगारे भी मौजूद थे।

आंतरराष्ट्रीय पीडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विजेत्या भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे केले अभिनंदन क्रीडा

 आंतरराष्ट्रीय पीडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025  विजेत्या

 

भारतीय  दिव्यांग क्रिकेट संघाचे केले अभिनंदन क्रीडा




मंत्री यांच्याकडून अभिनंदन

 

दिव्यांग क्रिकेट संघाच्या प्रगतीसाठी शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य - क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, 5 :  क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांनी कोलंबोश्रीलंका येथे झालेल्या पीडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकणाऱ्या भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे अभिनंदन केलेदिव्यांग क्रिकेटच्या प्रगतीसाठी शासनातर्फे आवश्यक सर्व मदत आणि पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळवलेया भारतीय दिव्यांग क्रिकेट  संघाच्या खेळाडूंचा सत्कार नुकताच मंत्रालयात करण्यात आला होतायावेळी ते बोलत होते.

श्रीदत्तात्रय भरणे यांनी संघातील खेळाडूंच्या जिद्दीचेक्रिकेटप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचे आणि कठीण परिस्थितीतही उभे राहण्याच्या जिगरदार वृत्तीचे कौतुक केलेया स्पर्धेतील विजय हा भारतीय दिव्यांग खेळाडूंसाठी एक ऐतिहासिक टप्पा असूनअनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार विक्रांत केणी यांनी केलेतर उपकर्णधार रवींद्र संते होतेसंघातील प्रमुख खेळाडूंमध्ये अष्टपैलू खेळाडू आकाश पाटील आणि फलंदाज कुणाल फानसे यांचा समावेश होताया अभिनंदन समारंभास श्री. कल्पेश पुंडलिक गायकर, (डीसीसीआय समिती सदस्य), विश्वनाथ गुरव, (अध्यक्षव्हीलचेअर स्पोर्ट्स असोसिएशन), राहुल रामुगडे, (कर्णधारमुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघ) , प्रशांत विष्णू नेरपगारे, (पॅरा शूटर आणि व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू. ) आदि उपस्थित होते.

 

प्रभु श्रीराम द्वारा बताए गए मूल्यों का संरक्षण करें: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 प्रभु श्रीराम द्वारा बताए गए मूल्यों का संरक्षण करें: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, 5 अप्रैल: प्रभु श्रीराम हमारे राष्ट्रपुरुष हैं और वे मर्यादा पुरुषोत्तम हैं। जीवन के आदर्श और मूल्यों का सर्वोच्च उदाहरण उनका जीवन है। उन्होंने जो जीवन मूल्य बताए हैंउनका संरक्षण और पालन किया जाना चाहिए। यह विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किए।

मुख्यमंत्री श्री फडणवीस मानखुर्द स्थित संजोग देवस्थान की प्राणप्रतिष्ठा और लोकार्पण कार्यक्रम में बोल रहे थे। इस अवसर पर विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकरदैनिक तरुण भारत के संपादक किरण शेलारसंजोग सोसायटी के अध्यक्ष नवनाथ बन सहित बड़ी संख्या में सोसायटी के निवासी और नागरिक उपस्थित थे।

मुख्यमंत्री ने कहा कि यदि हम प्रभु श्रीराम के संपूर्ण जीवन पर नजर डालेंतो उन्हें युगपुरुष कहा जाता है। उन्होंने एक युग की रचना की है। हम मानते हैं कि उनमें ईश्वर का अंश था। यदि वे चाहते तो रावण से चमत्कारिक रूप से भी युद्ध कर सकते थेलेकिन उन्होंने ऐसा नहीं किया। उन्होंने समाज के लोगों को एकत्र कियाउनमें विजय की भावना जगाईआत्मगौरव और आत्मसम्मान को प्रेरित कियाजिससे वे आसुरी शक्तियों का पराभव कर सके।

उन्होंने कहा कि एक सामान्य व्यक्ति भी जब सत्य के मार्ग पर चलता हैतब चाहे असत्य कितना भी बलशाली और आसुरी होवह उसका नाश कर सकता है। इसलिए हमें प्रभु श्रीराम द्वारा दिखाए गए सत्य के मार्ग पर चलने का प्रयास करना चाहिए।

कार्यक्रम के अंत में मुख्यमंत्री ने संजोग सोसायटी के निवासियों को शुभकामनाएं दीं।

 




प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी




 प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी

-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 5 : प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष असून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेतजीवनाची मूल्ये काय असावीतयाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहेप्रभू श्रीराम यांनी जी मूल्ये सांगितलेली आहेतत्या मूल्यांची जोपासना करावीअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मानखुर्द येथील संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्रीफडणवीस बोलत होतेयावेळी विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकरदैनिक तरुण भारतचे संपादक किरण शेलारसंजोग सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ बन यांच्यासह सोसायटीमधील रहिवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेप्रभू श्रीरामांचे एकूण जीवन बघितले तर आपण त्यांना युगपुरुष म्हणतोएक युग प्रवर्तीत करण्याचे काम त्यांनी केले आहेप्रभू श्रीराम यांच्यामध्ये देवाचा अंश आपण मानतोमग ते देव होतेतर कदाचित रावणाशी चमत्काराने देखील लढू शकले असतेपण त्यांनी तसे न करता समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजयी वृत्ती तयार केलीजेणेकरून त्यांचा अभिमानआत्माभिमान जागृत झाला  त्यामुळे आसुरी शक्तीला परास्त करू शकले. सामान्य माणूस देखील ज्यावेळेस सत्याच्या मार्गाने चालतोत्यावेळी असत्य कितीही मोठे व आसुरी असलेतरी त्या आसुरी शक्तीचा निपात तो करू शकतोत्यामुळे प्रभू श्रीराम यांनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करावा, असे सांगून संजोग सोसायटीच्या रहिवाश्यांना मुख्यमंत्री यांनी  शुभेच्छा दिल्या.

 

तुळजापूरच्या विकास आराखड्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीची बैठक*

 विकास आराखड्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीची बैठक*

तुळजापूर पुनर्विकास आराखड्यामुळे मंदिर परिसराच्या विकासाबरोबरच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला गती मिळेल. तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर धार्मिक कॉरिडॉर उभारल्यास भाविकांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध होतील आणि या तीर्थस्थळांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळेलअसेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विकास आराखड्याची माहिती देताना सांगितले कीमुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीमध्ये या आराखड्याचे सादरीकरण झाले असूनलवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. स्थानिक नागरिक आणि पुजारी मंडळाच्या सहकार्याने हा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*पुरातत्व विभागाच्यावतीने विकासकामांना गती*

तुळजापूर मंदिर परिसराच्या संवर्धनासाठी ५८ कोटी ११ लाख रुपयांची विकासकामे सुरू असल्याचे पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले. पुढील टप्प्यात मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवूनकुंडांचे सौंदर्यीकरण आणि मंदिर संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत.

तुळजापूर मंदिर व परिसराच्या पुनर्विकासासाठी ३५० कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार आहेत. नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि दोन वर्षांत संपूर्ण विकास आराखड्याची पूर्तता होईलअशी माहिती बैठकीत देण्यात आली.

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तुळजापूर पुनर्विकास आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा घेतला आढावा

 धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर

 विकसित करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर पुनर्विकास आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा घेतला आढावा

 

मुंबई: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पुनर्विकास आणि तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूरसह पंढरपूरअक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थस्थळांचा समावेश असलेला धार्मिक कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात झालेल्या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटीलधाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारपुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गेपुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले कीतुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास करताना भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यातयासाठी विशेष प्रयत्न करावे. यामध्ये रुग्णवाहिकाअग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावातसेच ड्रेनेजपाणीपुरवठा आणि विद्युत वितरण व्यवस्थेचा समावेश करावाअसे निर्देश त्यांनी दिले.

            तुळजापूरच्या धार्मिक परंपरांचा विचार करताजोगतेभोपेभुते आणि कडकलक्ष्मी या पारंपरिक भक्तांसाठी स्वतंत्र भक्त निवास तयार करण्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सुचवले. देवीच्या साड्यादागिने आणि दानातील वस्तू यांची मोजणी सुयोग्य पद्धतीने व्हावीअसे त्यांनी सांगितले.

तुळजाभवानी मातेच्या ऑनलाईन दर्शनासाठी विशेष सुविधा*

शिर्डीच्या साईबाबा मंदिर आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मातेच्या ऑनलाईन दर्शनाची सोय चॅनेलद्वारे उपलब्ध करून देण्यात यावीअशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली

पुणे जिल्ह्यातील घेरा सिंहगड गावाची पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार

 पुणे जिल्ह्यातील घेरा सिंहगड गावाची पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबईदि. 18 : पुणे जिल्ह्यातील घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना लवकरच पूर्ण करण्यात येऊन नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईलअसे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य भीमराव तापकीर यांनी पाणीपुरवठा योजनेबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.

या चर्चेला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घेरा सिंहगड गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाची छाननी करण्यात येऊन, जल जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामाची स्थळ पाहणी केली. या पाहणीअंती योजनेचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्याकडे 11 सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत योजनेच्या पूर्णत्वास निधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या  योजनेच्या पूर्णत्वास निधी अभावी कुठलीही अडचण येणार नाही.

या योजनेचे काम ज्या कंत्राटदाराने केले आहे ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार निकृष्ट कामाची चौकशी करण्यात येईल. काम निकृष्ट असल्यास त्याच कंत्राटदाराकडून हे काम पूर्ण करण्यात येईलअसेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi