Sunday, 6 April 2025

प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी




 प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी

-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 5 : प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष असून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेतजीवनाची मूल्ये काय असावीतयाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहेप्रभू श्रीराम यांनी जी मूल्ये सांगितलेली आहेतत्या मूल्यांची जोपासना करावीअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मानखुर्द येथील संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्रीफडणवीस बोलत होतेयावेळी विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकरदैनिक तरुण भारतचे संपादक किरण शेलारसंजोग सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ बन यांच्यासह सोसायटीमधील रहिवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेप्रभू श्रीरामांचे एकूण जीवन बघितले तर आपण त्यांना युगपुरुष म्हणतोएक युग प्रवर्तीत करण्याचे काम त्यांनी केले आहेप्रभू श्रीराम यांच्यामध्ये देवाचा अंश आपण मानतोमग ते देव होतेतर कदाचित रावणाशी चमत्काराने देखील लढू शकले असतेपण त्यांनी तसे न करता समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजयी वृत्ती तयार केलीजेणेकरून त्यांचा अभिमानआत्माभिमान जागृत झाला  त्यामुळे आसुरी शक्तीला परास्त करू शकले. सामान्य माणूस देखील ज्यावेळेस सत्याच्या मार्गाने चालतोत्यावेळी असत्य कितीही मोठे व आसुरी असलेतरी त्या आसुरी शक्तीचा निपात तो करू शकतोत्यामुळे प्रभू श्रीराम यांनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करावा, असे सांगून संजोग सोसायटीच्या रहिवाश्यांना मुख्यमंत्री यांनी  शुभेच्छा दिल्या.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi