Saturday, 5 April 2025

बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट

      कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 

मुंबईदि. 5 : क्रोधद्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतातअशा गुन्हेगारांच्या आयुष्यात गवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात  नवी पहाट निर्माण हो शकतेयाचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून 190 बंदिजनांच्या साधनेतून दिसून ये आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.

मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहा भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेस्वामी श्री गोविंद देवगिरीजी हाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पा पाडत आहेतगीता परिवारद्वारा आजतागायत 12 लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहेपूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग 13 भाषांतून  21 'टाईम स्लॉट्स ' मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेतहा वर्ग 40 मिनिटांचा आहेवर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जातेराज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमाच्या ऑनलाईन वर्गासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता कारागृह प्रशासक आणि कर्मचारी करत आहेतसर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर 2023 मध्ये पहिला वर्ग सुरू झालाटप्प्याटप्प्याने यात कोल्हापूरनाशिकठाणेतळोजा येथील केंद्रीय कारागृहांना समाविष्ट केले गेलेयामध्ये छत्रपती संभाजीनगर येथी कारागृहात 25, ठाणे 35, कोल्हापूर 45, नाशिक 40, तळोजा 35, येरवडा 10 कैद्यांचा समावेश आहेया कारागृहातील सुमारे 190 बंदी साधक गीता श्लोक पठण करीत आहेत.

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन सुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहेसध्या ठाणेनाशिककोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसऱ्या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहेयेथे एकूण 12 अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहेगीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध रून देण्यात आली आहेतकारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेतयाबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात लेपुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत.

 शनिवारी  रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जातेयावेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनदेखील केली जातेगीता परिवाराचे हे वर्ग चार टप्प्यांमध्ये चालत आहेतया चार टप्प्यातील वर्गांना चार स्तर म्हटले जातेपहिल्या स्तरावर दोन अध्याय शिकवले जातातदुसऱ्या स्तरामध्ये चार अध्याय शिकवले जाताततिसऱ्या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी सहा अध्याय शिकवले जातात.

या उपक्रमामुळे बंदीजनांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेहा उपक्रम निश्चितच बंदीजनांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी होत आहेअशा उपक्रमांमुळे बंदीजन आपल्या कुटुंबात परत येवून एक चांगले आयुष्य जगू शकणार आहेतअसा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शिक्षकांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यास मदत होईल

 शिक्षकांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे अध्यापन पद्धती

अधिक प्रभावी होण्यास मदत होईल

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईदि. 4 - जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यामुळे विकसित देशातील शाळांमध्ये सुरू असलेले अध्यापनाचे नाविन्यपूर्ण प्रयोगपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. या दौऱ्याचा राज्यातील शिक्षकांची अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होईलअसा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

समग्र शिक्षामहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यावतीने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने चालवल्या जाणाऱ्या स्टार्स’ (स्ट्रेंथनिंग टिचिंग लर्निंग अँड रिझल्टस् फॉर स्टेटस्) प्रकल्पांतर्गत राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी 22 ते 27 मार्च या कालावधीत सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक सर्वोत्तम शिक्षण पद्धती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणणेनावीन्यपूर्ण शैक्षणिक पद्धती आणि यशस्वी प्रशासकीय पद्धतीचा अभ्यास करणेजागतिक स्तरावरील विविध सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकआर्थिकऐतिहासिकभौगोलिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन नवीन दृष्टीकोन प्राप्त करणे व स्वत:च्या शाळेत नवीन शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे हा या दौऱ्याचा उद्देश होता.

शिक्षकांमध्ये नेतृत्वगुण व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भर देण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षकांना या दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती विषयी थेट शिकण्याची संधी मिळाली. यामध्ये आधुनिक अध्यापन पद्धतीवर्ग व्यवस्थापन तंत्रे व नाविन्यपूर्ण प्रशासकीय पद्धतींचा समावेश होता. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदमुंबई येथील सहायक संचालक (कार्यक्रम) सरोज जगताप यांच्या नेतृत्वाखाली या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) पुणे येथील उपसंचालक ज्योती शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील 48 शिक्षकांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला.

*प्रशिक्षणाचे विषय :*

प्रायोगिक शिक्षण- बलस्‍थानेआव्हानेप्रकारसंरचनाशिक्षकांनी करावयाची पूर्व तयारी व यश प्राप्तीशिक्षणातील अध्यापन शास्त्रीय दृष्टीकोनविद्यार्थांची अध्यापनातील रूची टिकवून ठेवण्याची प्रभावी तंत्रे व विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशिक्षणाचे नावीन्यपूर्ण धोरण या मुद्यांवर प्रिन्सिपल्स अकॅडमी इन्क (पीएआय)सिंगापूर या शिक्षण नेतृत्वअभ्यासक्रम व अध्यापन शास्त्रात विशेष प्राविण्य असलेल्या संस्थेमार्फत शैक्षणिक साधनांचा वापर करत प्रशिक्षण देण्यात आले.

*शाळा भेटी :*

मूल्य आधारित शिक्षण आणि पर्यायी मूल्यमापनासाठी ओळखली जाणारी सिंगापूरमधील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक असलेल्या गण इंग सेंग शाळा तसेच डान्सस्पोर्ट आणि छायाचित्रण सारख्या जीवनकौशल्य शिक्षण कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या एजफिल्ड प्राथमिक शाळेला या दौऱ्यात भेट देण्यात आली. दोन्ही देशातील शिक्षकांनी एकमेकांशी संवाद साधून शैक्षणिक कल्पनांची देवाण घेवाण केली.

*पुढील दिशा :*

या प्रशिक्षणानंतर शिक्षक त्यांच्या शाळांमध्ये प्रशिक्षण व शाळाभेटीद्वारे जाणून घेतलेले नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची अंमलबजावणी करण्यासाठी कृती योजना तयार करतील. तसेच एससीईआरटीमार्फत आयोजित होणाऱ्या पुढील शिक्षक प्रशिक्षणात आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यातून अनुभवलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा व प्रशासकीय बाबींचा सहभाग केला जाईल.

या दौऱ्याने जागतिक स्तरावर शैक्षणिक उपक्रमांची देवाण- घेवाण करण्यासाठी मजबूत पाया घालण्यास मदत केली आहे. हा अभ्यास दौरा महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण व सकारात्मक बदल घडवेलअसा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केला आहे.

00000

वांद्रे शासकीय वसाहत : भुखंडाच्या निकषासाठीची समिती लवकरात लवकर गठीत करावी

 वांद्रे शासकीय वसाहत : भुखंडाच्या निकषासाठीची

समिती लवकरात लवकर गठीत करावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. ४ : वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भुखंडाबाबत निकष निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आहे. ही समितीत लवकरात लवकर गठीत करण्यात यावीअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत यासंदर्भाच सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस माजी आमदार किरण पावसकरउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताबांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते आणि गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

या सहकारी संस्थेला भुखंड उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला असल्याचे श्री. पावसकर यांनी यावेळी सांगितले. या भुखंडाचा तपशील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची अर्हतानिकष निश्चित करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ही समिती लवकरात लवकर गठीत करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

 

यावेळी बैठकीतून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून संवाद साधत लवकरात लवकर समिती गठीत करण्याबाबत सूचना दिल्या.

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

 वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • वीज निर्मितीसाठी सर्वोत्तम दर्जाच्या कोळश्यासाठी शासन प्रयत्नशील

 

मुंबई, दि. 4 : कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. ‘महाजनको’ने  गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

         सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा खाणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महाजनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यावेळी उपस्थित होते.

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीज निर्मितीसाठी विविध कंपन्यांकडून मिळणारा कोळसा चांगल्या दर्जाचा मिळावा तसेच तो वेळेत मिळावा यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. छत्तीसगड येथील रायगढ जिल्ह्यातील गारे पेल्मा दोन (GPII)  कोळसा खाणीला  शासनाच्या सर्व परवानग्या प्राप्त करून ‘महाजनको’ने कोळसा उत्पादनाबाबत सर्वसमावेशक असा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करून त्याला मान्यता घ्यावी. वीज निर्मिती करताना उत्पादन खर्च कमी करून  ग्राहकांना कमी दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी ‘महाजनको’कडून कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

        यावेळी ‘महाजनको’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी कोळसा खरेदी व महाजनकोकडून करण्यात येत असलेली विजनिर्मितीबाबत माहिती सादर केली.

0000

एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे

 एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि 4 :- एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकासाला अधिक चालना देता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउद्योग मंत्री उदय सामंतमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशीउपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तासचिव नवीन सोनाउद्योग सचिव डॉ. पी.अन्बलगनमुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासुसहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीऔद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबरच संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास वेगाने होईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठारस्तेवीज आणि इतर सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल.

 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये एकूण 63 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून यातील 47 करार हे उद्योगाशी संबंधित आहे. यातील कंपन्यांना जमीन वाटपाचे काम पूर्णत्वास जात आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादनाची अधिसूचना प्रकाशित करण्यात येत आहे. ई-निविदा पद्धतीने महाटेंडर्स् पोर्टलवर 654 भूखंडाचे वाटप करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

100 दिवस कृती आराखड्यात दिलेल्या कार्यक्रमात महामंडळाने 3500 एकर औद्योगिक भूखंड देण्याच्या उद्दिष्टांपैकी 2346 एकर औद्योगिक भूखंड उद्योगांना वाटप करण्यात आले आहे. जमीन अधिग्रहणाचे 110 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बुटीबोरी येथे 5 एमएलडी सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित झाला असून औद्योगिक सेवांच्या विनंतीतक्रारी आणि मंजुरीच्या अर्जाचे निराकरण करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल.....*

 *उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल.....*


आता उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीराला पाण्याची कमतरता जाणवणे, स्ट्रोक, खूप जास्त घाम येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांचा त्रास होतो. अशात भरपूर पाणी पिणे, सुती कपडे घालणे आणि नीट योग्य तो पोषक आहार घेणे गरजेचे आहे.


इन हाउस आयुर्वेदिक सल्लागार डॉ. अश्विनी कोन्नूर यांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी मार्ग सांगितले आहेत.


*आहाराकडे लक्ष द्या...*

तु्म्ही जे काही खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर दिसून येतो. उन्हाळ्यात पचायला हलक्या असणाऱ्या अन्नाचा आहारात समावेश करणे कधीही चांगले असते. उष्ण वातावरणात शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हलका पोषक आहार घ्यावा. उदा. दही, पांढरा भात, सॅल्मन मासा तुम्ही खाऊ शकता. आंबट व तिखट पदार्थ खाणे टाळा.


*भरपूर फळे आणि भाजीपाला खा...*

फळे आणि भाजीपाल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फोलिक अॅसिड व मिनरल्स असतात. हे घटक शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये चांगले फॅट्स असतात; जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. उदा.

काकडी, बेरी, टरबूज,

सायट्रिक अॅसिड समृद्ध फळे, अॅव्होकॅडो.


*जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करा...*

उन्हाळ्यात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. द्रव पदार्थ आपल्या शरीरातील पाण्याची पातळी भरून काढतात आणि आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात अल्कोहोल घेणे टाळले पाहिजे. त्याऐवजी फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, ग्रीन टी हे द्रव पदार्थ सहज उपलब्ध असतात आणि त्याचे अनेक फायदेही दिसून येतात.


*व्यायामामध्ये बदल करा...*

उन्हाळ्यात शरीरावर ताण पडणार नाही, याची काळजी घ्या आणि त्यानुसार व्यायामप्रकार निवडा. खूप जास्त तास व्यायाम करणे आणि खूप जास्त धावणे टाळा. त्याऐवजी प्राणायाम करा.


*शीतली प्राणायाम...*

 या प्राणायामामध्ये तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जाते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.


*सदांता प्राणायाम...*

 या प्राणायामामध्ये दातांद्वारे हवा आत घेऊन नाकावाटे बाहेर सोडली जाते.


त्याशिवाय तुम्ही वृक्षासन, अर्धकटी चक्रासन, कोनासन, त्रिकोणासन, मार्जारासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, चक्रासन, नवासन, योग निद्रा इत्यादी आसन प्रकार तुम्ही करू शकता.


*जीवनशैलीमध्ये बदल करा...*

उन्हाळ्यात रात्र लहान असते. त्यामुळे दिवसा तुम्ही थोडा आराम करू शकता. त्याशिवाय फिकट रंगाचे सुती कपडे, चंदन, फुलांपासून बनविलेले अत्तर यांचा वापर करा. घराबाहेर पडण्यापूर्वी किमान ५० एसपीएफ (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन वापरा. जर कडाक्याचे ऊन असेल तर सनकोट, तसेच छत्री वा टोपीचा वापर करा.


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य  मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*


माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*


*(कॉपी पेस्ट)*


 *आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 


८०-वर्ष-जुनी भिंत" नावाचे पुस्तक प्रकाशित केले.

 मित्रांनो,


आपल्याकडे सुद्धा average  आयुष्यमान 80 च्या आसपास गेले आहे असे वाटते. त्यामुळे आता आपल्याला 80 वर्षे आनंदात जगायचे असल्यास काय करायला पाहिजे ते माहित करुन घ्या. 


मानसोपचारतज्ज्ञ हिदेकी वाडा यांनी "८०-वर्ष-जुनी भिंत" नावाचे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित होताच, त्याची विक्री ५,००,००० प्रतींपेक्षा जास्त झाली, जी सध्या सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. जर हाच दर कायम राहिला तर या पुस्तकाची विक्री १० लाख प्रतींपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे ते या वर्षी जपानमधील सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक बनेल.


या पुस्तकातील 60 ते 80 वर्षे वयाच्या लोकांना *"सुखी माणसं"* बनवण्याच्या 44 गोष्टी:👇


1.चालत राहा.


2.चिडल्यावर खोल श्वास घ्या.


3.शरीर आखडत नसेल ,इतपत व्यायाम करा.


4.उन्हाळ्यात एसी वापरत असाल तर ,भरपूर पाणी प्या.


5."डायपर" वापरल्याने हालचाली सोप्या होतात.


6.जास्त वेळा चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहतो.


7.विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते.


8.जास्त औषधं घेण्याची गरज नाही.


9.रक्तदाब आणि साखर पातळी कृत्रिमरीत्या कमी करण्याची गरज नाही.


10.एकटे असणे म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर आनंदी वेळ घालवणे.


11.आळशी असणे लाजिरवाणे नाही.


12.वृद्धांसाठी वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा.


13.आवडते तेच करा, जे नकोसे वाटते ते करु नका.


14.वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात.


15.घरात बसून राहू नका.


16.जे हवे ते खा, किंचित जाडसर राहणे ठीक आहे.


17.प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.


18.ज्यांना तुम्ही नकोसं समजता, अशा लोकांना टाळा.


19.सतत टीव्ही पाहू नका.


20.रोगाशी अखेरपर्यंत लढण्यापेक्षा त्याच्यासोबत जगायला शिका.


21."गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते" हा जादूई मंत्र लक्षात ठेवा.


22.ताजे फळे आणि सॅलड खा.


23.आंघोळ 10 मिनिटांत पूर्ण करा.


24.झोप येत नसेल तर जबरदस्ती करू नका.


25.आनंदी गोष्टी केल्याने मेंदू सक्रिय राहतो.


26.मनातलं बोलून टाका, जास्त विचार करू नका,कसं बोलू वगैरे?


27.लवकरात लवकर "फॅमिली डॉक्टर" ठरवा.


28.फार सहनशील राहू नका, थोडेसे 

*"वाईट म्हातारे"*,व *नटखट* होण्यास हरकत नाही.


29.कधी कधी आपलं मत बदलायला व हट्ट सोडायला हरकत नाही.


30.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील "डिमेन्शिया" हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे.


31.शिकणं थांबलं की ,माणूस खरंच म्हातारा होतो.


32.कीर्तीचा हव्यास सोडा, जे आहे ते पुरेसं आहे.


33.निरागसपणा हा वृद्धांचा विशेषाधिकार आहे.


34.जितक्या समस्या, तितकं आयुष्य रंजक!


35.सूर्यप्रकाशात बसल्याने आनंद मिळतो.


36.दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी करा.


37.आजचा दिवस निवांत जगा.


38.इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे.


39.नेहमी सकारात्मक राहा.


40.मोकळा श्वास घ्या.


41.जीवनाचे नियम तुमच्या हातात आहेत.


42.प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.


43.आनंदी माणसं नेहमी प्रिय असतात.


44.हसण्याने नशीब उजळतं.


*ही माहिती आपल्या सर्व ज्येष्ठ मित्रांपर्यंत जरूर शेअर करा!*

Featured post

Lakshvedhi