Saturday, 5 April 2025

बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट

      कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 

मुंबईदि. 5 : क्रोधद्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतातअशा गुन्हेगारांच्या आयुष्यात गवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात  नवी पहाट निर्माण हो शकतेयाचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून 190 बंदिजनांच्या साधनेतून दिसून ये आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.

मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहा भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेस्वामी श्री गोविंद देवगिरीजी हाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पा पाडत आहेतगीता परिवारद्वारा आजतागायत 12 लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहेपूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग 13 भाषांतून  21 'टाईम स्लॉट्स ' मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेतहा वर्ग 40 मिनिटांचा आहेवर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जातेराज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमाच्या ऑनलाईन वर्गासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता कारागृह प्रशासक आणि कर्मचारी करत आहेतसर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर 2023 मध्ये पहिला वर्ग सुरू झालाटप्प्याटप्प्याने यात कोल्हापूरनाशिकठाणेतळोजा येथील केंद्रीय कारागृहांना समाविष्ट केले गेलेयामध्ये छत्रपती संभाजीनगर येथी कारागृहात 25, ठाणे 35, कोल्हापूर 45, नाशिक 40, तळोजा 35, येरवडा 10 कैद्यांचा समावेश आहेया कारागृहातील सुमारे 190 बंदी साधक गीता श्लोक पठण करीत आहेत.

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन सुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहेसध्या ठाणेनाशिककोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसऱ्या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहेयेथे एकूण 12 अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहेगीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध रून देण्यात आली आहेतकारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेतयाबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात लेपुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत.

 शनिवारी  रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जातेयावेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनदेखील केली जातेगीता परिवाराचे हे वर्ग चार टप्प्यांमध्ये चालत आहेतया चार टप्प्यातील वर्गांना चार स्तर म्हटले जातेपहिल्या स्तरावर दोन अध्याय शिकवले जातातदुसऱ्या स्तरामध्ये चार अध्याय शिकवले जाताततिसऱ्या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी सहा अध्याय शिकवले जातात.

या उपक्रमामुळे बंदीजनांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेहा उपक्रम निश्चितच बंदीजनांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी होत आहेअशा उपक्रमांमुळे बंदीजन आपल्या कुटुंबात परत येवून एक चांगले आयुष्य जगू शकणार आहेतअसा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi