Thursday, 20 March 2025

२५ लाख लखपती दीदीसाठीही भागीदारी

 २५ लाख लखपती दीदीसाठीही भागीदारी

क्रिस्पर केस नाईन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी भागीदारी करणार आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे सांगितलेशिवाय गरीब आणि गरजू महिलांना राज्य शासन महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून १५०० रूपये देत असल्याची माहिती दिली. या उपक्रमातही सहभाग घेण्यास मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशन तयार असल्याचेही बिल गेट्स यांनी सांगितले. महिलांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यासाठी सहकार्य करण्याची गेट्स यांनी तयारी दर्शवली.

शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्यासाठी सोलरचा वापर शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी 2022-23 पासून सोलरचा वापर करण्यात येत आहे. 30 टक्के वीज निर्मितीमधून आता 52 टक्क्यांपर्यंत सोलरमधून वीजनिर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध होत आहे. त्यांना 24 तास वीज देण्यासाठी विजेचे सर्व फिडर सोलरद्वारे करण्याचे नियोजन असल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बिल गेट्स यांना दिली. नवी मुंबई येथे 300 एकर परिसरात इनोव्हेशन सिटी करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावर श्री. गेटस यांनी इनोव्हेशन सिटी आणि इतर उपक्रमासाठी आर्थिक बाबीसोबत तांत्रिक मदतीत भागीदारी करण्याची ग्वाही दिली. मलेरियामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न महाराष्ट्रात डासांमुळे मलेरिया आजाराच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मलेरियामुक्त महाराष्ट्र करण्यासोबतच डेंग्यू नियंत्रणासाठी गेट्स फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. यासाठीही तांत्रिक, आर्थिक मदत करण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यापासून याची सुरूवात करण्यात येणार असल्याची ग्वाही बिल गेट्स यांनी दिली.

 शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्यासाठी सोलरचा वापर

शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी 2022-23 पासून सोलरचा वापर करण्यात येत आहे. 30 टक्के वीज निर्मितीमधून आता 52 टक्क्यांपर्यंत सोलरमधून वीजनिर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध होत आहे. त्यांना 24 तास वीज देण्यासाठी विजेचे सर्व फिडर सोलरद्वारे करण्याचे नियोजन असल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बिल गेट्स यांना दिली.

            नवी मुंबई येथे 300 एकर परिसरात इनोव्हेशन सिटी करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावर श्री. गेटस यांनी इनोव्हेशन सिटी आणि इतर उपक्रमासाठी आर्थिक बाबीसोबत तांत्रिक मदतीत भागीदारी करण्याची ग्वाही दिली.

मलेरियामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न

महाराष्ट्रात डासांमुळे मलेरिया आजाराच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मलेरियामुक्त महाराष्ट्र करण्यासोबतच डेंग्यू नियंत्रणासाठी गेट्स फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. यासाठीही तांत्रिकआर्थिक मदत करण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यापासून याची सुरूवात करण्यात येणार असल्याची ग्वाही बिल गेट्स यांनी दिली.

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य बिल गेट्स यांची ग्वाही; लखपती दीदी उपक्रमातही सहभाग

 मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य

बिल गेट्स यांची ग्वाहीलखपती दीदी उपक्रमातही सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबिल गेट्स यांच्यादरम्यान चर्चा

            मुंबईदि. २० :- राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या 25 लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापकप्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स तसेच गेट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. गेट्स आणि मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्यकृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली.

            महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असून याचा आनंद असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधाकृषीआरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाऊंडेशने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यात एआयच्या वापरातून ऊसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राम राम क्यू kehena


 

खारीचा वाटा


 

एका वर्षात राज्यात 85 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती पूर्ण; रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू

 एका वर्षात राज्यात 85 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती पूर्ण;

रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू

-         माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार

मुंबईदि. 19 : राज्यात गेल्या एका वर्षात 85 हजार 363 उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्त्याही देण्यात आल्याची माहिती मंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

            सदस्य विक्रम काळे यांनी अर्धातासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेलार बोलत होते.

राज्यातील गट अ आणि गट ब मधील पदांची भरती ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत होत असल्याचे सांगून माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेलार म्हणाले कीआता राज्य शासनाने गट क मधील काही पदांच्या भरतीचे अधिकारही एमपीएससीकडे दिले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त राज्य शासनाने 75 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने राज्यात 85 हजार पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात आली आहे. तसेच एमपीएससी सदस्यांची रिक्त असेलेली तीन पदे भरण्याची कार्यवाहीही सुरू आहे. भरती प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारची बंदी नसून भरती प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शासनातील रिक्त पदांची माहिती एमपीएससीकडे वेळोवेळी सादर करून ही भरती प्रक्रिया राबवली जाते. आताही अनेक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून त्याविषयी प्रक्रिया सुरु आहे. तसेच निवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त पदांच्या भरतीबाबतही शासन निर्णय घेऊन प्रक्रिया राबवत आहे. तसेच आतापर्यंत अनेक विभागांमध्ये रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियाही शासनाने मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे रिक्त पदांच्या भरतीबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील. तसेच नियमीत पदावर कंत्राटी भरती करण्याचे कोणतेही आदेश शासनाने निर्गमित केलेले नसून अशा प्रकारे भरती झाली असल्यास त्याची चौकशी करण्यात येईलअसेही श्री शेलार यांनी सांगितले.

000

नाशिक जिल्ह्यातील दुर्गम वाड्यांवर सर्व सोयीसुविधांची उभारणी सुरू

 नाशिक जिल्ह्यातील दुर्गम वाड्यांवर सर्व सोयीसुविधांची उभारणी सुरू

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबईदि. 19 : नाशिक जिल्ह्यातील दुर्गम वाड्यांवर मुलभूत सोयींसह पायाभूत सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

           अर्धातास चर्चेदरम्यान सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गोरे बोलत होते.

            नाशिक जिल्ह्यातील लचकेवाडीडोंगरवाडीतोरणवाडीगणेशनगरखैरेवाडीसिद्धीवाडी येथे वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे सांगून गोरे म्हणाले कीया सर्व वाड्यांमध्ये कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यादृष्टीने या वाड्यांच्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आला आहे. तसेच या वाड्यांमध्ये अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून अंगणवाडीच्या इमारतींचे कामही सुरू आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा असून सांस्कृतिक सभागृहही मंजूर करण्यात आले आहे. वैतरणा नदीतून या वाड्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi