Wednesday, 12 March 2025

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' लवकरच जाहीर करणार

 महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४लवकरच जाहीर करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १२ : 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले.

               विधानभवन येथे 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलारसांस्कृतिक कार्य  विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीसांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक  बिभीषण चवरेमहाराष्ट्र  भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकरदूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य अॅड उज्ज्वल निकमश्री. वासुदेव कामतश्री.गो. ब. देगूलकरडॉ शशिकला वंजारी यासह इतर अधिकारी उपस्थित  होते.

              मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणा-या तसेच त्याव्दारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीला देण्यात येतो. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम  आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेवून असून लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील.

         सांस्कृतिक कार्य  विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबत सादरीकरण केले. महाराष्ट्र  भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य यांनी पुरस्कारासाठी निवड याबाबत मते मांडली.

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचे भविष्यातील फायदेशक्तीपीठ महामार्गाचे महत्त्व

 शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचे भविष्यातील फायदे

या महामार्गामुळे शक्तीपीठ आणि औद्योगिक केंद्रे जोडली जातील. मराठवाडाविदर्भ आणि कोकणातील उद्योगांना चालना मिळेल. राज्यातील वाहतुकीचा वेग आणि सुविधा सुधारतील. पुरवठा साखळी मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या रीतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल. "हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शक्तीपीठ महामार्गाचे महत्त्व


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले की, जसे समृद्धी महामार्गामुळे १२ जिल्ह्यांचे जीवनमान बदलले, त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गामुळेही मोठे परिवर्तन घडेल. या महामार्गामुळे राज्यातील विविध भागांत सुलभ आणि वेगवान वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे व्यापार आणि उद्योगांना गती मिळेल.

ग्रीनफिल्ड महामार्गाचा महत्त्वाचा निर्णय

 ग्रीनफिल्ड महामार्गाचा महत्त्वाचा निर्णय

ज्या भागांकडे आजवर दुर्लक्ष झालेत्या भागांचा विकास करण्यासाठी दिल्ली-मुंबई ग्रीनफिल्ड महामार्ग हे योग्य माध्यम आहे."अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे प्रसिद्ध उद्गार आहेत – अमेरिका श्रीमंत आहे कारण तेथे चांगले रस्ते आहेत. आपण महाराष्ट्राचाही हा विकास याच पद्धतीने साधणार आहोत," असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांचे समर्थन आणि चर्चा, कोल्हापूर

 शेतकऱ्यांचे समर्थन आणि चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले कीकोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून या महामार्गासाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. कोल्हापूरच्या एअरपोर्टवर एक हजार शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झालेज्यात महामार्गाचे समर्थन करण्यात आले आहे.

"शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी  चर्चा करूत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पण हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो होणारच," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या

पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

 

            मुंबईदि. १२ : ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातकुंड येथे झालेल्या या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

 

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातकुंड येथे किशोर ते कन्नड बायपास जवळ १० मार्च २०२५ रोजी ऊसाचा ट्रक उलटल्यामूळे अपघात झाला. या अपघातात सहा मजूरांचा मृत्यू झाला असून ११ मजूर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी असलेल्या तीन मजूरांवर उपचार करून त्यांना घरी सोडलेले आहे. उर्वरीत आठ मजूरांवर एम. जी. एम. हॉस्पीटलछत्रपती संभाजीनगर व स्वराज हॉस्पीटलचाळीसगांव या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मृत झालेले सर्व मजूर हे सातकुंड ता. कन्नड येथील रहिवाशी आहेत. ऊस तोडणी व वाहतुक करतांना होणाऱ्या वेगवेगळ्या अपघातात ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबांस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लक्षअपंगत्व आल्यास २.५० लक्ष व जखमींना उपचारासाठी ५० हजारापर्यंत वैद्यकीय खर्च देण्यात येतोअसे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फतच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत एक महिन्यात चौकशी करून कारवाई

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फतच्या निविदा प्रक्रियेतील

अनियमिततेबाबत एक महिन्यात चौकशी करून कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बस गाड्या घेण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य राजेश राठोड यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहामंडळाच्या स्तरावर ही प्रक्रिया राबवण्यात आली.  ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून यामुळे परिवहन विभागाचे 1700 कोटी रुपये वाचले आहेत. याबाबत एक महिन्याच्या आत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

याबाबत माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले कीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रचलित पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सर्व विभागांची तीन समूहामध्ये विभागणी करून प्रत्येक समूहात किमान 400 ते 450 याप्रमाणे सात वर्षासाठी 1310 बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व विभागांना केवळ एकत्रित निविदेनुसार तीन समूहात बस गाड्या पुरवण्यात येणार आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ॲड.अनिल परबप्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

0000

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार

 भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार

गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. 12 : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांमार्फत गर्दीच्या व सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. अशा ठिकाणी पोलीस बळ वाढवून देण्यात येईलअसे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी भुसावळ शहरात 10 जानेवारी रोजी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.भोयर म्हणालेयाप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे येथे दि. 10 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अचानकपणे ऑलआऊट कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगार व आरोपींवर मोठ्याप्रमाणावर एमपीडीएहद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील घटनेच्या अनुषंगाने गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईलअसेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Featured post

Lakshvedhi