Wednesday, 12 March 2025

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या

पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

 

            मुंबईदि. १२ : ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातकुंड येथे झालेल्या या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

 

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातकुंड येथे किशोर ते कन्नड बायपास जवळ १० मार्च २०२५ रोजी ऊसाचा ट्रक उलटल्यामूळे अपघात झाला. या अपघातात सहा मजूरांचा मृत्यू झाला असून ११ मजूर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी असलेल्या तीन मजूरांवर उपचार करून त्यांना घरी सोडलेले आहे. उर्वरीत आठ मजूरांवर एम. जी. एम. हॉस्पीटलछत्रपती संभाजीनगर व स्वराज हॉस्पीटलचाळीसगांव या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मृत झालेले सर्व मजूर हे सातकुंड ता. कन्नड येथील रहिवाशी आहेत. ऊस तोडणी व वाहतुक करतांना होणाऱ्या वेगवेगळ्या अपघातात ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबांस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लक्षअपंगत्व आल्यास २.५० लक्ष व जखमींना उपचारासाठी ५० हजारापर्यंत वैद्यकीय खर्च देण्यात येतोअसे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi