Tuesday, 11 March 2025

बालस्नेही पुरस्कार २०२४’ चे वितरण राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम

 बालस्नेही पुरस्कार २०२४ चे वितरण

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. ४ :  बालकांना सुरक्षितसक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने बालस्नेही पुरस्कार २०२४  समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकरराज्यमंत्री पंकज भोयरआमदार संजय केळकरआमदार मनीषा कायंदेमहिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जेआयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरेआयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैनशिक्षण अधिकारी माधुरी भोसलेसदस्य नीलिमा चव्हाणजयश्री पालवेसायली पालखेडकरसंजय सिंगलचैतन्य पुरंदरेआदिसह जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी,  विभागीय आयुक्तपोलीस अधिकारीविविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा – अध्यक्ष सुशीबेन शाह

आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या कीमहिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर  देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असूनआधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुर‍क्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.

            यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तिपत्रिकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीआयोगाने अनावरण केलेले भित्तीपत्रक हे सर्व पोलीस स्थानकात लावण्यात येणार असून  त्यावर असलेल्या क्यू-आर कोडमुळे बाल हक्क व संरक्षण आयोगाची सर्वांना माहिती मिळणार आहे.

बालकाच्या जन्मापासून ते १८ वर्ष होईपर्यंत शिक्षणआरोग्यसंरक्षणमूलभूत अधिकार त्यांना देण्याचे काम आयोग करीत आहे. आयोग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

 बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारीउत्कृष्ट विशेषगृहउत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रमउत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारीउत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सीपोलीस अधीक्षकउत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्वसहायक पोलीस आयुक्तउत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारीपोलीस निरीक्षकउत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयपोलीस उपनिरीक्षकउत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्षसहाय्यक पोलीस निरीक्षकउत्कृष्ट बाल कल्याण समितीपोलीस हवालदारउत्कृष्ट बालगृहपोलीस शिपाईबालस्नेही पुरस्कारपोलीस अंमलदारउत्कृष्ट परिविक्षा अधिकारीउत्कृष्ट खुले निवारा गृहउत्कृष्ट काळजी वाहकउत्कृष्ट समुपदेशकउत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करावीत -

 उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामे

गतीने पूर्ण करावीत

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबई, दि. ४ : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलआमदार मोनिका राजळेपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांतर्गत कामे दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे तसेच त्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने क्षेत्र पाहणी करुन वेळेत कामांची पूर्तता करण्याचे सूचित केले.

यावेळी शेवगाव, पाथर्डी व परिसरातील गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. योजना अंमलबजावणीतील अडचणी तत्परतेने दूर कराव्यात. त्यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक आमदारसरपंच तसेच शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घ्यावा. गावातील शाळाप्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातपाण्याची टाकी बसवण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. उन्हाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टाकी बसवण्याची कामे तातडीने सुरू करावी. तसेच गावात विहित मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंड आकारण्यात यावा. सर्व गावात योजना अमंलबजावणीसाठी उपयुक्त जागा पाहणी करून त्याची माहिती संबंधितांनी आढावा बैठकीत सादर करावी, अशा सूचना श्री.पाटील यांनी दिल्या. 

बैठकीत शेवगाव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भगवान गड व ४६ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अमरापूर- माळीबाभुळगावबोधेगावशहरटाकळी या गावातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत चाकण औद्योगिक वसाहत व १९ गावातील पाणीपुरवठा योजनाच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा  घेण्यात आला.

0000

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन ,pl share

 सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून  ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणेसायबर पोलीस ठाणेकेंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावीअसे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींगसोसायटी मिटींगजेष्ठ नागरिकांचे क्लबझोपडपट्ट्या तसेच शाळामहाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धतीसुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

 मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्रामट्विटरव्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेतअसे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

 खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाहीयासाठी काळजी घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.


हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा*

 बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या*

*विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा*

*- प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा*

*- हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा*

*- प्रस्तावित प्रकल्पांच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करा*

 

मुंबईदि. ४ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे  लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पायाभूत सुविधापाणीपुरवठा प्रकल्पमलनिःसारण प्रकल्पआरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ७०० किमी किलोमीटर रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाची कामेवर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्गगोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूलविक्रोळी पूलकर्नाक पूलसायन पूलमढ वर्सोवा पूल आदी पुलांची कामेदहीसरपोईसरओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्पयासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवामालाडभांडूपघाटकोपर येथील मलजल उदचन केंद्रवर्सोवा मलजल बोगदामिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे.  याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने सायन केईएमसायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणीदहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तसेच निक्षारीकरण प्रकल्पमिठी नदी पॅकेज ५पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्पदहिसर उद्यान विकासमानखुर्द वाहतूक केंद्रजिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालयदेवनार बायोमायनिंगदेवनार पशुवध आधुनिकीकरणमध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी कायदा पदवीधरांनी पुढे यावे

 दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी कायदा पदवीधरांनी पुढे यावे

- न्यायमूर्ती भूषण गवई

 

मुंबई : यशासाठी सातत्यपरिश्रम व प्रामाणिक प्रयत्न यांची आवश्यकता आहे.  कायदा क्षेत्र सर्वस्पर्शी असून समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर सल्ला व मदत देण्यासाठी कायदा क्षेत्रातील पदवीधरांनी पुढे यावेअसे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधी विद्यापिठाचे कुलपती भूषण गवई  यांनी केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा द्वितीय पदवी प्रदान सोहळा एनसीपीए झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलपती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरेन्यायमूर्ती संदीप मारणेविधि व न्याय विभाग प्रधान सचिव सुवर्णा केवळेयासह मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सर्वश्री अतुल चांदुरकरनितीन सांबरेअनिल किल्लोरअभय आहुजापृथ्वीराज चव्हाण (निवृत्त) तसेच कायदा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पदवी व पदव्युत्तर अशा 350 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.  विविध अभ्यासक्रमांमध्ये सुवर्णरौप्य व कांस्य पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. डॉ  उके यांनी  विद्यापीठाने शैक्षणिकसांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा आढावा घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत केलेल्या सामंजस्य करारांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाचे पुढील 20 वर्षाचे  व्हिजन डॉक्युमेंट 2040 प्रकाशित करण्याते आले. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी विद्यापीठ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. संचालक समरेंद्र निंबाळकर व सदस्य सचिव शेखर मूनगटे यांनी करारावर स्वाक्षरी केली.

सुधारित नळ पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अतंर्गत नळ पाणी पुरवठा

 ग्रामीण भागात मागणीप्रमाणे

पाणीपुरवठा उपलब्ध करुन द्यावा

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. १० : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही बाब महत्वपूर्ण असून त्याचे गांर्भीय लक्षात घेऊन गावांमध्ये वाढीव मागणीप्रमाणे पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित सांगली जिल्ह्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कामाच्या आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. बैठकीस आमदार जयंत पाटील, सत्यजीत देशमुख, सचिव संजय खंदारेयांच्यासह जलजीवन मिशन तसेच स्थानिक संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन ज्या गावांमध्ये गावकऱ्यांची वाढीव पाण्याची गरज व मागणी आहेत्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करुन योग्य उपाययोजना करुन त्यानुसार पाण्याची उपलब्धता करुन देण्यात याव्यात. या दोन्ही तालुक्यातील गावांमधील सुधारित नळ पाणी पुरवठा योजनाजलजीवन मिशनमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अतंर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत विविध कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi