Sunday, 9 March 2025

गुरु तेग बहादुर यांच्या शहादीच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन

 गुरु तेग बहादुर यांच्या शहादीच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने

 विशेष कार्यक्रमांचे आयोजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि.8 – गुरु तेग बहादुर यांच्या शहादीच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्यावतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुमत समागम कार्यक्रम प्रसंगी बोलतांना सांगितले.

 

गोरेगावनेस्को येथील गुरुमत समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुमत समागम कार्यक्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले "गुरु तेग बहादुरजींनी देशधर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज आपल्या परंपरा आणि संस्कृती जपू शकतो." त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये त्यागनिःस्वार्थ सेवा आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित होईलअसे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

गुरु गोविंद सिंगजी यांनी देखील धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी महान कार्य केले. उत्तरेत  गुरुजनांनी संरक्षण केलेतर दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी लढा दिला, असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

रागोपनिषद'व्दारे शास्त्रीय संगीताचे जतन, संवर्धन

 रागोपनिषद'व्दारे शास्त्रीय संगीताचे जतनसंवर्धन

                                                                                    -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रागोपनिषद ग्रंथ आणि म्युझिक अल्बमचे प्रकाशन

 

मुंबई. दि.8 :- भारतीय शास्त्रीय संगीतात अद्भुत शक्ती असून याची अनुभूती आपण वेळोवेळी घेतो. हा संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला असून रागोपनिषद या ग्रंथाद्वारे भारतीय शास्त्रीय संगीताचे जतन व संवर्धन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

गोरेगाव येथील लक्ष्मी सरस्वती मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते संवादिनीचे सूर छेडून रागोपनिषद या ग्रंथाचे आणि म्युझिक अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढागुजरातचे गृहमंत्री हर्षद भाई सांगवी,आमदार पराग अळवणीविद्या ठाकूरगच्छाधिपती कल्पतरू सूरी महाराजतीर्थभद्र सूरी महाराजपन्यास तीर्थ रुची महाराजपन्यास कल्पजीत महाराजतीर्थ रतीजी महाराज,  जिग्नेश दोशीकिरीट भन्साळी,  सनी पंड्यापृथ्वीराज कोठारी,विदुषी अश्विनी भिडे-देशपांडेपं. भरत बलवल्लीपं. आनंद भाटेव मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,सामवेद हा आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा मुलाधार आहे. असा संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत तेजस्वी आहे. ते मनाला सुखावणारे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच अनेक व्याधी दूर करण्यासाठीही भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक्त ठरते हे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे. दीर्घ संशोधनातून रागोपनिषद हा ग्रंथ साकारला असून विलुप्त होत असलेल्या रागांचे पुनरुज्जीवनच यानिमित्ताने करण्यात आले आहे हे नक्कीच अभिनंदनीय आहे.

देशातील नामवंत गायकांनी यामधील रचना गायल्या आहेत हे  वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात यमन कल्याण हा राग अतिशय प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच आम्ही देखील नेहमी जनकल्याणाचाच राग आळवतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

आचार्य तीर्थभद्र सूरी महाराज म्हणालेभारतीय शास्त्रीय संगीताचा अनमोल ठेवा आपल्याला लाभला आहे. अनेक व्याधी दूर करण्यासाठी शास्त्रीय संगीताच्या श्रवणाचा लाभ होतो हेही आपण जाणतो. रागोपनिषद हा ग्रंथ दीर्घ संशोधनातून साकारला असून देशातील नामवंत संगीत शिक्षण संस्था आपल्या अभ्यासक्रमात या ग्रंथाचा समावेश करणार आहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

----- 000 -----

Saturday, 8 March 2025

एक महिला जी आपल्या आयुष्यात विविध कर्तव्य

 *8 मार्च  जागतिक महिला दिन* 🌹

एक महिला जी आपल्या आयुष्यात विविध कर्तव्य पार पाडते.एक मुलगी ते एक मैत्रीण,बहीण,आई आणि पत्नी. त्रिवार अभिवादन तुमच्या विविध रुपाला आणि तुमच्या धैर्यला 

कधी कधी दुर्गा,कधी लक्ष्मी ,कधी सरस्वतीच्या रुपात वावरणाऱ्या तुम्हास शतशः प्रणाम

           पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या तुम्ही मात्र पुरुषापेक्षा जास्त सहनशीलताअसणाऱ्या ,म्हणुनच मातृत्वाची जबाबदारी मिळालेल्या स्त्रीत्वःला मातृत्वाला मानाचा मुजरा 🙏🌹

 आपणास महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 💐💐💐💐💐💐

सावरकर कुटुंबियातील महिलाना मानाचा मुजरा

 



राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्यावी

 राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्यावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

         मुंबईदि. 8 :- राज्यातील जे खाणपट्टे लिलावात गेलेले आहेत, ते त्वरीत सुरु झाले पाहिजेत. ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत "गती शक्ती" प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा. राज्यातील खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील प्रमुख खनिजांच्या 40 खाणपट्ट्यांच्या कार्यान्वयनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखनिकर्म मंत्री शंभूराज देसाईराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेखनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांना विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमीत कमी असावा, यामुळे उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रक्रियेत वेग येईल आणि शासनाला महसूल वाढीस मदत होईल. खनिकर्म विभागातील कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. राज्यातील खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. खनिकर्म विभागासाठी पर्यावरणमहसूलभूसंपादन व वन विभागातील प्रलंबित कामे तातडीने करावी. ही कामे गतीने होण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात. तसेच सगळ्या विभागाचा एक शासन निर्णय काढून विभागाची जबाबदारी निश्चित करावी.

  मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाणपट्ट्यांशी संबंधित सुनावण्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि नियमांची पूर्तता करणाऱ्या उद्योगांना मुदतवाढ देण्यात यावी असे सांगितले. खनिकर्म विभागराज्य खनिकर्म महामंडळ आणि केंद्र-राज्य समन्वय आवश्यक आहे. खनिजनिहाय खाणपट्ट्यांचा आढावा घेऊन सुरूबंद आणि लिलावयोग्य खाणपट्ट्यांवर कार्यवाही करावी. राज्यातील खनिज अन्वेषण वाढवून जास्तीत जास्त खाणपट्टे लिलावासाठी खुले करावेत. तसेचएकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली 2.0 लागू करावीअसे निर्देश यावेळी देण्यात आले.

    राज्य खनिकर्म महामंडळ व खनिकर्म विभागखनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषयखनिजक्षेत्राची ई-लिलाव प्रक्रिया आदींबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.

  या बैठकीस खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.इकबाल सिंह चहलअपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरअपर मुख्य सचिव राजेशकुमारउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताप्रधान सचिव विनिता वेद सिंगलमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

महिला सुरक्षिततेसाठी सार्वजनिक सुविधा

 महिला अधिकाऱ्यांचे कौतुक

 प्रशासनात काम करणाऱ्या महिला अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्यात चोखपणे पार पाडत असून या कामात त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. राज्याच्या मुख्य सचिव पासून प्रशासनातील विविध विभागात मुख्य पदावर महिला अधिकारी आहेत.

महिला सुरक्षिततेसाठी सार्वजनिक सुविधा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 50 किमी अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतचत्यांचे दीर्घकालीन व्यवस्थापन आणि देखभाल करण्यासाठी ठोस योजना आखण्यात आली आहे.

लैंगिक समानता

शालेय जीवनापासून जेंडर इक्वलिटी मुलांवर बिंबवली पाहिजे. स्त्रियांचा आदर करणेसन्मान करणे या बाबी लहान वयातच रुजवल्या पाहिजेत. ही जबाबदारी त्यांची शाळापरिवार आणि समाजाची देखील आहे.

स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ति म्हणून जगण्याचा अधिकार

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिच्या विचारांना मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मात्रसर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, हे दुर्भाग्य आहे. तरीही काही स्त्रिया आपल्या मतांवर ठाम राहतात आणि त्याचा सामना करतात.

लव्ह जिहादविरोधात कठोर भूमिका

लव्ह जिहाद प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले की, "सुरुवातीला अशा घटना एक-दोन अपवाद म्हणून वाटत होत्यापण तपासानंतर लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणावर चाललेला प्रकार आहे. अनेक मुली फसवल्या जात असूनत्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांची विशेष समिती तयार केली असून त्यांना या प्रकरणांचे सखोल विश्लेषण करण्याचे निर्देश दिले आहेत.

अनेकांना माझ्या राजकीय वारसदारांची चिंता असतेपण मी माझ्या घराण्यातला शेवटचा राजकारणी असेनअसे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी  माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहसंचालक हेमराज बागुलसंचालक किशोर गांगुर्डे आणि संचालक दयानंद कांबळे उपस्थित होते.

000


 

महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही

 महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

 

             मुंबईदि. 8 : महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान  दिली.

जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना महिलांच्या सशक्तीकरणासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणीत्यांच्या सुरक्षेचे मुद्दे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावेअसे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  यावेळी केले. राज्यमंत्री पंकज भोयर सुद्धा यावेळी उपस्थित होते.

महिला आणि माध्यम क्षेत्रातील आव्हाने

मुख्यमंत्र्यांनी माध्यम क्षेत्रातील महिलांसमोरच्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, "महिलांना मल्टीटास्किंग काम करत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. माध्यम क्षेत्रातील महिलांना तर 24 तास दक्ष राहावे लागते. व्यवसायघर आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना प्रत्येक टप्प्यावर अनेक संघर्ष करावे लागतात.

महिला उद्योजकतेला चालना

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध क्लस्टर्समध्ये महिला उद्योजकांसाठी खास संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेचमायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने 10 हजार महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचे अभियान हाती घेतले आहे.

भविष्यातील नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित असतील आणि महिलांनी त्यात आघाडीवर राहावेयासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मीडिया मॉनिटरिंग

मॉनिटरिंगचा अर्थ असा आहे कीएक सिस्टम आम्ही उभी करतो ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या बातम्या आहेत त्याचे विभागीकरण होणार आहे. त्यातल्या ज्या बातम्या नकारात्मक असतील त्याच जे खरे उत्तर आहे किंवा त्याच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या ज्यांनी दिल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंगचे प्रयोजन आहे. माध्यमांवरील तो अंकुश अजिबात नाही.

 

Featured post

Lakshvedhi