Wednesday, 5 March 2025

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या मागणीसाठी आंदोलन ,pl share more more


 भक्ती भोसले महिला विभाग प्रमुख, बांदा east शिवसेना शिंदे गट प्रमुख [: पदाधिकारी

पु. ल. कला महोत्सव आणि महिला कला महोत्सवाचा रंगारंग सोहळा रंगला

 पु. ल. कला महोत्सव आणि महिला कला महोत्सवाचा रंगारंग सोहळा रंगला

 

मुंबईदि. 4 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 3 आणि 4 मार्च 2025 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नूतनीकृत अकादमीमध्ये आयोजित या महोत्सवांमध्ये नाट्यनृत्य आणि संगीताच्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

महिलांच्या कलाविष्काराला वाव

- संचालक मीनल जोगळेकर

रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित या विशेष महोत्सवासंदर्भात पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर म्हणाल्या कीपारंपरिक आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून महिलांच्या कलाविष्काराला वाव देण्यात आला आहे. कला अकादमीच्या या नव्या पर्वात अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असूनत्याला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर महिलांच्या कलासामर्थ्याचा हा उत्सव पुढील काही दिवस रंगत जाणार असूनयामध्ये नृत्यनाटकगायन आदी विविध कलारूपांचे सादरीकरण होणार असल्याचे श्रीमती जोगळेकर यांनी सांगितले.

पु. ल. कला महोत्सवात ‘मॅड सखाराम’ आणि बंगाली नाट्यविष्कार*

 *पु. ल. कला महोत्सवात मॅड सखाराम’ आणि बंगाली नाट्यविष्कार*

3 मार्च 2025 रोजी पार्थ थिएटर्समुंबई यांच्यातर्फे पु. ल. देशपांडे लिखित मॅड सखाराम’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर, ‘व्यक्ती आणि वल्लीमधील काही व्यक्तिरेखांवर आधारित अनुवादित बंगाली नाट्यविष्कार आमार देखा किचू नमुना’ हे रूपांगण फाउंडेशनमुंबई यांच्यातर्फे सादर करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन शिवाजी सेनगुप्ता यांनी केले होतेतर नाट्य रूपांतर आणि अनुवाद देवांशू सेनगुप्ता यांचा होता

महिला कला महोत्सवात लावणी आणि शास्त्रीय युगलगायनाने रंगत*

 *महिला कला महोत्सवात लावणी आणि शास्त्रीय युगलगायनाने रंगत*

4 मार्च 2025 रोजी महिला कला महोत्सवात रेश्मा मुसळे परितेकरयोगिता मुसळेअश्विनी मुसळे आणि त्यांच्या संचाने लावणी नृत्य सादर केली. या कार्यक्रमाला आशाताई मुसळे आणि सुलोचना जावळकर यांच्या गायनाने रंगत आणलीतर कृष्णा मुसळे (ढोलकी)विठ्ठल कुडाळकर (तबला) आणि सुधीर जावळकर (हार्मोनियम) यांनी संगत दिली. त्यानंतरविदुषी अपूर्वा गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी यांच्या शास्त्रीय युगलगायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अनंत जोशी (पेटी) आणि अभय दातार (तबला) यांनी त्यांना साथ दिली.

यावेळी आपली भावना व्यक्त करताना लावणी नृत्यांगना श्रीमती रेश्मा मुसळे म्हणाल्या की, लोककलेला आणि लोककलांवतांना रसिकांकडून मिळणारी दाद ही नक्कीच सुखावणारी आणि लाखमोलाची असते.

चित्रप्रदर्शनाचेही आयोजन*रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे 2 मार्च ते 15 मार्च

 *चित्रप्रदर्शनाचेही आयोजन*

रवींद्र नाट्यमंदिरप्रभादेवी येथे 2 मार्च ते 15 मार्च 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित चित्रकारसुलेखनकार आणि शिल्पकार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार असूनमुंबईकरांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.


दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी कायदा पदवीधरांनी पुढे यावे,pl share

 दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी कायदा पदवीधरांनी पुढे यावे

- न्यायमूर्ती भूषण गवई

 

मुंबईदि. 04 : यशासाठी सातत्यपरिश्रम व प्रामाणिक प्रयत्न यांची आवश्यकता आहे.  कायदा क्षेत्र सर्वस्पर्शी असून समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर सल्ला व मदत देण्यासाठी कायदा क्षेत्रातील पदवीधरांनी पुढे यावेअसे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधी विद्यापिठाचे कुलपती भूषण गवई  यांनी केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा द्वितीय पदवी प्रदान सोहळा एनसीपीए झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलपती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरेन्यायमूर्ती संदीप मारणेविधि व न्याय विभाग प्रधान सचिव सुवर्णा केवळेयासह मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सर्वश्री अतुल चांदुरकरनितीन सांबरेअनिल किल्लोरअभय आहुजापृथ्वीराज चव्हाण (निवृत्त) तसेच कायदा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पदवी व पदव्युत्तर अशा 350 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.  विविध अभ्यासक्रमांमध्ये सुवर्णरौप्य व कांस्य पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. डॉ  उके यांनी  विद्यापीठाने शैक्षणिकसांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा आढावा घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत केलेल्या सामंजस्य करारांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाचे पुढील 20 वर्षाचे  व्हिजन डॉक्युमेंट 2040 प्रकाशित करण्याते आले. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी विद्यापीठ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. संचालक समरेंद्र निंबाळकर व सदस्य सचिव शेखर मूनगटे यांनी करारावर स्वाक्षरी केली.

0000

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन Pl share

 सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून  ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणेसायबर पोलीस ठाणेकेंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावीअसे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींगसोसायटी मिटींगजेष्ठ नागरिकांचे क्लबझोपडपट्ट्या तसेच शाळामहाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धतीसुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

 मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्रामट्विटरव्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेतअसे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi