Thursday, 27 February 2025

हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ

 हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी

30 दिवसांची मुदतवाढ

पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 25 : हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दि. 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ही मुदत आणखी 30 दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

 

दि. 24 फेब्रुवारी 2025 अखेर राज्यात 29 हजार 254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 161 शेतकऱ्यांकडून 1813.86 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

 

भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करताना चौकशी नाको

 


कदाचित माहीत नसेल, पण मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे.

 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे.  

आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.

इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

__________________

क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.


च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते. 

एकदा करून बघा 


ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा. 


त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.

एकदा म्हणून बघा.


प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .

________________________


आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.


जय मराठी !

क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ....

••••••••••••••••••••••••••••••••••••

क - क्लेश करू नका 

ख- खरं बोला

ग- गर्व नको 

घ- घमेण्ड करू नका  

च- चिँता करत राहू नका

छ- छल-कपट नको 

ज- जवाबदारी निभावून न्या

झ- झुरत राहू नका  

ट- टिप्पणी करत  राहू नका

ठ- ठकवू नका  

ड- डरपोक राहू नका

ढ- ढोंग  करू नका

त- तंदुरुस्त रहा 

थ- थकू नका 

द- दिलदार बना 

ध- धोका देऊ नका  

न- नम्र बना 

प- पाप करू नका  

फ- फालतू कामे करू नका  

ब- बडबड कमी करा

भ- भावनाशील बना 

म- मधुर बना 

य- यशस्वी बना 

र- रडू नका 

ल- लालची बनू  नका

व- वैर करू नका

श- शत्रुत्व करू नका

ष- षटकोणा सारखे स्थिर रहा 

स- सत्य बोला 


ह- हसतमुख रहा 

क्ष- क्षमा करा 

त्र- त्रास देऊ नका 

ज्ञ- ज्ञानी बना  !!


कृपया महाराष्ट्रातील सर्वांना अभिमानाने पाठवा.

*🙏🏻#मराठी बोलु अभिमानाने*🙏🏻

🌹मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठमोळ्या शुभेच्छा 🌹

🙏 *जयहिंद,जय महाराष्ट्र* 🙏

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

सर्व सावरकर प्रेमींसाठी आनंदाची बातमी:

 👍🏻👏🏻👏🏻सर्व सावरकर प्रेमींसाठी आनंदाची बातमी: 



*शासन निर्णय :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहीलेल्या "अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला" या प्रेरणा गीतास "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार" सन २०२५ म्हणून या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येत आहे.*


12 ज्योतिर्लिंग माहिती

 *🚩आज महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५🚩*



*🔺12 ज्योतिर्लिंग माहिती🔺*



सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥


    सोमनाथ (गुजराथ - वेरावळ)

    मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)

    महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)

    ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)

    वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)

    भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)

    रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)

    नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)

    विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)

    त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)

    केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)

    घृष्णेश्वर (महाराष्ट्र *संभाजीनगर*)


१२ ज्योतिर्लिंगे अनेक धर्म व अनेक देवदेवता असणार्‍या भारत देशात अनेक देवदेवतांची तीर्थक्षेत्रे व तेथील यात्रा प्रसिद्ध आहेत. महादेवांच्या भारतातील प्रमुख १२ मंदिरांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंगे आहेत.


१.  सोमनाथ  (गुजराथ - वेरावळ)-गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेलेसोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीनतीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे.याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एककथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल. असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी. सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें लिंग स्थापून पूजा केलीम्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले .


२. मल्लिकार्जुन(आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)– गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍रीतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.


३. महाकाळेश्वर  (मध्यप्रदेश - उज्जैन)-हे मंदिर मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यामध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग व स्वयंभू असून रुद्रसागर तलावाच्या काठावर उज्जैन शहरात आहे.हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्य राज्याची राजधानी येथे होती.दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यातजगभरातून भाविक येथे जमा होतात.श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगात  दक्षिणमुखी पूजेचे महत्वामुळे फक्त महांकालेश्वर येथेच भस्म आरतीहोते. वर्षात केवळ एकदा महाशिवरात्रिच्या दुसर्या दिवशी भगवान श्री महांकालेश्वरांची दुपारी बारा वाजता भस्म आरती होते .


४. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर) -ॐकारेश्वर मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नामक बेटावर वसलेले असून मोरटक्का गाव पासून जवळपास २० कि.मी. अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह ॐ च्या आकारामध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत,  ॐकारेश्वरआणि अमरेश्वर.

ॐकारेश्वर ची निर्मिती नर्मदा नदी पासून झाली आहे. ही नदी भारताची अत्यंत पवित्र नदी आहे. राजा मान्धाता ने येथे नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिव ला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले.  येथे एकूण ६८ तीर्थ असून येथे ३३ कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे. याशिवाय येथे २ ज्योतिस्वरूप लिंग यासहित १०८ प्रभावशाली शिवलिंग आहेत. शास्त्र मान्यता अशी आहे की कोणीही तीर्थयात्री देशाची भले ही सारे तीर्थ करून घेऊ दे परंतु जोपर्यंत तो ओंकारेश्वर येऊन केलेल्या तीर्थों चे जल आणून येथे नाही चढवत तोपर्यंत त्याचे सारे तीर्थ अधूरे मानले जातात.


५. परळी वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)  - भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाहीपण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. परळी वैजनाथ परभणीपासून ६१ कि. मी. अंतरावर आहे .


६. भीमाशंकर  (महाराष्ट्र - भीमाशंकर)- भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. मंदिराबाबत असे म्हणतात की, १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. `भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर' असे म्हणतात.

भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर - डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा - निसर्गरम्य आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जवळच कोकणकडा व नागफणी हे दोन महत्त्वाचे कडे आहेत. या कड्यावरून कोकणाचे निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते.

भीमाशंकर पुण्यापासून मंचर मार्गे १२८ कि.मी. अंतरावर आहे. भीमा नदीचा उगम हा राजगुरूनगर  तालुक्यात झालेला आहे. तर मंदिराच्या पायर्‍यांवरील गावाचा भाग हा आंबेगाव तालुक्यात आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी जास्त संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.


७. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)– हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनि रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्याचे वचन भगवान रामचंद्रांना दिले. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी व १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे रामेश्वर चे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वती ची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.


८.नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ) -पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार यांची देखील मंदिरे आहेत.

मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट काम केलेले आहे. परिसरात मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच. संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसीचे होते. असे समजले जाते, की, संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले होते. 

औंढा नागनाथच्या शेजारील राजापूर गावातील उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. सिद्धेश्र्वर व येलदरी ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. औंढा-नागनाथला जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ हे स्थान आहे.


 


९. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)–विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते.पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते. वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते भारताची पवित्र नदी गंगाच्या किनार्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वीनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वेनाथ ज्याकतिर्लिंग स्थापलेले आहे. श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणाच्या तपस्येने तयार झाले नसून येथे साक्षात भगवान शिव हेच विश्वनाथ च्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात कि येथे मृत्यू येणार्या प्रत्येकास मोक्ष प्राप्ती होते.  


१०. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)– नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते.याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते. या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा इ. महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. त्रिपिंडी नारायण नागबळीचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. जवळच ब्रम्हगिरी पर्वत असून या पर्वतावरून महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्त्वाची नदी गोदावरीचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार व मुक्ताई मंदिर, संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इत्यादी महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वरपासून जवळच्या अंतरावर आहेत.. नाशिकपासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.


११.केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) - हे हिमालयातउत्तराखंडच्यारुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. पुराणाप्रमाणे भगवान विष्णू जगाच्या कल्याणाकरिता पृथ्वीवर निवास करण्यासाठी आले.त्यांनी बद्रीनाथ मध्ये आपले पहिले पाउल ठेवले.हे अगोदर भगवान शिवाचे स्थान होते. परंतु भगवान विष्णू साठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथ मध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी समाधी घेतली. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगा बरोबरच चार धामा पैकी एक धाम आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते.


१२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -संभाजीनगर- बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. १७६५ ते १७९५ दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले. घृष्णेश्र्वराचे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेष (जुना वाडा) देखील मंदिराजवळ आहेत.                                                                   -


राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्याकडून 'बाटू' विद्यापीठाचा आढावा

 राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्याकडून 'बाटू' विद्यापीठाचा आढावा

 

मुंबईदि.26 : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी 25 फेब्रुवारी रोजी लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन मुंबई येथे आढावा घेतला.  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी यावेळी विद्यापीठासंदर्भात सादरीकरण केले.

यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीविद्यापीठातील पायाभूत सुविधांचा विकासपरदेशी भाषा शिक्षणास प्रोत्साहनपरदेशी विद्यापीठांशी सहकार्यविविध प्रवर्गांमधून विद्यार्थ्यांची नोंदणीवसतिगृह सुविधाशाळांशी सहकार्य कौशल्य विकासक्रीडा सुविधांचा विकास, 'स्वच्छ भारत अभियानव 'विकसित भारतउपक्रमांमध्ये विद्यापीठाचा सहभाग आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
 

बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. डब्ल्यु. किवळेकरअधिष्ठाता शैक्षणिक विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. एस. एल. नलबलवारअधिष्ठाता संशोधन व विकास डॉ. एस. एम. पोरेविशेष कार्य अधिकारीसंलग्निकरण डॉ. एच. एस. जोशीपरिक्षा नियंत्रक डॉ. एन. एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

 

मुंबईदि. 26 : मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरकौशलरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाउद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंतसांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलारविरोधी नेते अंबादास दानवेउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेसंसद तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित असणार आहे.

मराठी भाषा विभाग अंतर्गत 2024 करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी 2024 चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशनपुणे या संस्थेला जाहिर झाला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार  हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.

याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी 2023 चे पुरस्कार जाहीर झाले आहे.  वाङमय पुरस्कार प्रकारात प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारामध्ये कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. नाटक / एकांकिका करिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांनाकादंबरीकरिता हरी नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांनालघुकथेकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर यांनाललितगद्यकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, विनोदाकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना चरित्राकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकरआत्मचरित्रासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा. राठोड यांना समीक्षा, संशोधन, सौंदर्यशास्त्र, ललितकला व आस्वादपर लेखनाकरिता श्री. के. क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. तसेच प्रौढ वाङमय राज्यशास्त्र अथवा  समाजशास्त्रकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नाही.       

त्याचप्रमाणे प्रौढ वाङमय इतिहासाकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांनाभाषाशास्त्र अथवा व्याकरणाकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांनाविज्ञान व तंत्रज्ञानाकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांनाशेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना,  तसेच उपेक्षितांचे साहित्यकरीता  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना जाहीर झाला आहे.  तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखनाकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस नाही. तत्वज्ञान व मानसशास्त्रकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांनाशिक्षणशास्त्राकरिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांनापर्यावरणकरिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांनासंपादित अथवा आधारितसाठी रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांनाअनुवादितकरिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्णकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना जाहीर झाला आहे.

वाङमय पुरस्कार प्रकारात बाल वाङमयमध्ये कवितेकरीता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांनानाटक व एकांकिकाकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांनाकादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना सर्वसामान्य ज्ञानकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये आहे. 

वाङमय पुरस्कार प्रकारात प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांनानाटक/एकांकिकाकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांनाकादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांनालघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांनाललितगद्याचा ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपय असे आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्काराकरिता शिफारस नाही.

याचप्रमाणे सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना ‘आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये आहे.

Featured post

Lakshvedhi