Thursday, 27 February 2025

राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्याकडून 'बाटू' विद्यापीठाचा आढावा

 राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्याकडून 'बाटू' विद्यापीठाचा आढावा

 

मुंबईदि.26 : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी 25 फेब्रुवारी रोजी लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन मुंबई येथे आढावा घेतला.  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी यावेळी विद्यापीठासंदर्भात सादरीकरण केले.

यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीविद्यापीठातील पायाभूत सुविधांचा विकासपरदेशी भाषा शिक्षणास प्रोत्साहनपरदेशी विद्यापीठांशी सहकार्यविविध प्रवर्गांमधून विद्यार्थ्यांची नोंदणीवसतिगृह सुविधाशाळांशी सहकार्य कौशल्य विकासक्रीडा सुविधांचा विकास, 'स्वच्छ भारत अभियानव 'विकसित भारतउपक्रमांमध्ये विद्यापीठाचा सहभाग आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
 

बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. डब्ल्यु. किवळेकरअधिष्ठाता शैक्षणिक विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. एस. एल. नलबलवारअधिष्ठाता संशोधन व विकास डॉ. एस. एम. पोरेविशेष कार्य अधिकारीसंलग्निकरण डॉ. एच. एस. जोशीपरिक्षा नियंत्रक डॉ. एन. एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi