Thursday, 27 February 2025

राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगारासाठी ‘युथ फॉर जॉब्स’ संस्थेसोबत सामंजस्य करार

 राज्यातील  दिव्यांग युवकांना रोजगारासाठी

‘युथ फॉर जॉब्स’ संस्थेसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि.26 : राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देत त्यांचे आर्थिक स्वावलंबन होवून रोजगाराच्या संधी दिव्यांगांनाही उपलब्ध  होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगांना कौशल्ययुक्त  प्रशिक्षण देवून रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षांत नोंदणीकृत  दिव्यांगांना युडीआयडी (Unique Disability ID) देण्यात येणार आहे. शासन दिव्यांगांच्या योजना प्रभावीपणे राबवित आहे. स्वयंसेवी संस्थादेखील दिव्यांगांच्या विकासासाठी पुढे येत आहेत. ‘युथ फॉर जॉब्स’ संस्था व राज्य शासन लवकरच  सामंजस्य करार करणार आहे. रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी युथ फॉर जॉब्स’ ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात शासनास सहकार्य करणार आहे. आगामी काळात या कामाची व्यापकता वाढवून राज्यभर गती देणार आहे.  यामुळे दिव्यांग युवकांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

        नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी शासन नेहमी आग्रही असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत’ चे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि निर्णय घेतले आहेत. कौशल्यपूर्ण शिक्षणातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभागाची स्थापना करण्यात  आली आहे.  युवकांच्या कौशल्य विकासासाठी याच धर्तीवर राज्य शासनही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय युवांच्या कल्याणासाठी घेत आहे. 

युथ फॉर जॉब्स’ संस्थेच्या संस्थापिका तथा अध्यक्ष मीरा शेणॉय यांच्या संस्थेने केंद्र शासनाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनासोबत दिव्यांग युवांना रोजगार वाढीसाठी उत्कृष्ट काम केले आहे. ज्या व्यक्ती दिव्यांग आहेत, त्यांचे दिव्यांगत्व लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते. रोजगार मेळावे आयोजित करून दिव्यंगत्वाच्या प्रकारानुसार उद्योग क्षेत्रातील मागणीनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. रोजगार देणाऱ्या  खाजगी संस्थांमध्ये लाईफस्टाईल इंटरनॅशनलआदित्य बिर्ला फॅशनरिलायन्स ट्रेंड्सआयआयएफएललक्ष हॉस्पिटलमीलन कॉफी हाऊसएचपीसीएलबीपीसीएलसहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीलोकल ऑटोमोबाईल डीलर्सदिशा मेन पॉवर अँड सिक्युरिटी यांचा समावेश आहे. तसेच नोकरी करू शकत नसलेल्या युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहेत. हेच मॉडेल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सुरू करून  दिव्यांगासाठी रोजगाराच्या  संधी  निर्माण करण्यात येतील.

राज्यात सर्व दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडे त्यांचा अद्ययावत डाटाबेस तयार करण्यात येत आहे. यासाठी दिव्यांगांची 100 टक्के नोंदणी करीत नोंदणीकृत  दिव्यांगांना युडीआयडी (Unique Disability ID) देण्याची कार्यवाही सुरू आहे. दिव्यांगांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

     या उपक्रमासाठी शासनाबरोबर विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात प्रथम टप्प्यात युथ फॉर जॉब्स’ ही संस्था काम करणार आहे. यासाठी राज्य शासन व स्थानिक जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.  राज्यात स्थानिक स्वयंसेवी संस्था या उपक्रमासाठी पुढे येवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे.

00000000


फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

 फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबईदि. 26 : टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबईच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. टेक स्टार्ट अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्राला भारतातील टेक स्टार्टअप्ससाठी पहिल्या पसंतीचे राज्य बनवण्यासाठीच्या विविध संकल्पनांवर यावेळी चर्चा झाली.

यावेळी ध्रुविल संघवीअभिनंदनअनुपम मित्तलनैय्या सग्गीनीरज रॉयआनंद जैनशरद संघीआशिष शाहत्रिविक्रमण थंपीनितीश मित्रसेनपुष्कर मुकेवारभाविक वासाऋषी गुप्तामयंक कुमारदिपक खुराणा आणि अनिकेत देब आदी एंजेल इन्व्हेस्टर्स आणि टेक उद्योजक उपस्थित होते.

Tech Entrepreneurs meet Governor

Mumbai,Dt.26:A group of Members of the Tech Entrepreneurs Association of Mumbai today had an interaction meeting with the Governor of Maharashtra C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai.

Ideas to further drive the development of the Tech Start Up Ecosystem and Make Maharashtra the number one destination for Tech StartUps in India were discussed.

Angel Investors and Tech Entrepreneurs including Dhruvil Sanghvi, Abhinandan, Anupam Mittal, Naiyya Saggi, Neeraj Roy, Anand Jain, Sharad Sanghi, Ashish Shah, Trivikraman Thampy, Nitish Mittersain, Pushkar Mukewar, Bhavik Vasa, Rishi Gupta, Mayank Kumar, Dippak Khurana and Aniket Deb were among those present.

 

 

देशाच्या फाळणीच्या वेदना सोसलेल्या हशु आडवाणी यांचे समाज सेवेसाठी योगदान अतुलनीय

 देशाच्या फाळणीच्या वेदना सोसलेल्या हशु आडवाणी

यांचे समाज सेवेसाठी योगदान अतुलनीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २६: साधी राहणी उच्च विचारसरणीचा अंगीकार करीत हशुजी अडवाणी  यांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. त्यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. देशाची फाळणी झाल्यानंतर फाळणीच्या वेदना सोसत निर्वासित म्हणून नव्या भारतात आलेल्या हशुजी यांनी समाजसेवेसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

स्व. हशु अडवाणी जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, टिप्स कंपनीचे संचालक कुमार तौराणी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश मलकाणी, सचिव राजेश ग्यानी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या फाळणीनंतर सिंधी समाज हा निर्वासित म्हणून भारतात आला. शिबिरांमधून सिंधी समाजाचे पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसनाच्या कामात स्व. हशुजी यांनी मोठी भूमिका बजावली. स्वतः घरदार पाकिस्तानात सोडून आलेल्या हशुजी  यांनी निर्वासितांचे अश्रू पुसण्याचे काम केले. निर्वासित म्हणून आलेल्या सिंधी समाजाने संघर्षातून विश्व निर्माण केले असून आज प्रत्येक क्षेत्रात समाज प्रगती करीत आहे.

            शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती केलेल्या हशुजी यांनी नगरसेवक पदापासून मंत्री पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी राज्यमंत्री तसेच  राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले. अर्थमंत्री असताना त्यांनी राज्याचा अर्थसंकल्पही त्याकाळी सादर केला. त्यांना आणखी आयुष्य मिळाले असते, तर त्यांच्या कार्यामुळे झालेले अधिकचे परिवर्तन आपल्याला दिसले असते. त्यांनी स्थापन केलेली शैक्षणिक संस्था स्वामी विवेकानंद यांच्या नावाने आहे. यावरूनच त्यांच्या द्रष्टेपणा आणि भविष्य ओळखण्याची जाण लक्षात येते, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

            आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहोत. 1947 मध्ये जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था असलेला भारत साकारायचा आहे. ही जबाबदारी सर्व दृष्टीने बलशाली असलेल्या युवकांच्या खांद्यावर आहे. बलशाली युवक हा देशाला वेगाने पुढे नेत असतो, असे स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे.  यावरून भारताला महासत्ता  हा बलशाली युवकच बनवू शकतो. देशाला महासत्ता बनवून  स्वामी विवेकानंदांची  स्वप्नपूर्ती करायची आहे,  असे प्रतिपादनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

            हशु आडवाणी यांच्या जीवन कार्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे विमोचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००निलेश

कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा

 कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी

कुंभमेळा प्राधिकरण तयार करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबईदि. 26 : नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावायासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृह येथे  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनमुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह  नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. मागील बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिकमधील एक पथक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास पाठविण्यात आली होती. या पथकाने नोंदविलेल्या सूचना व त्याअनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावेसर्व यंत्रणांचा समन्वय व्हावाकुंभ मेळ्याची कामे गतीने व्हावीतयासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा. कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावेअशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.

            सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार केला होता. मात्रप्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. गर्दीचे व्यवस्थापनघाटांची संख्यारस्तेरेल्वे व हवाई वाहतुकीचे नियोजनही या आराखड्यात असावे. नाशिक त्र्यंबक रस्ता 24 मीटर वाढविण्यात यावा. तसेच या रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा. नाशिक शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करता येईल का याचा ड्रोन सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रस्ते मार्गांचे बळकीटकरण करावे

सिंहस्थसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबईजव्हारगुजरातछत्रपती संभाजी नगरशिर्डीधुळेपुणेमुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे. त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करावी. कुंभ काळात नाशिक शहरात वाहने सोडण्यात येऊ नये. भाविकांसाठी वाहनतळ ते शहरात प्रवासासाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच या ई बस प्रत्येक तीन मिनिटांना सुटतील असे नियोजन करावे. तसेच शिर्डीछत्रपती संभाजी नगरओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे. शिर्डी विमानतळावर विमाने थांबविण्यासाठी जागा वाढविण्यात यावी. तसेच ओझर विमानतळावरही अधिक विमानांचे लँडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का याचा विचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

रेल्वे प्रशासनासाठी समन्वय साधून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक रोडइगतपुरीकसारा आदी स्थानकांमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यातअसेही यावेळी त्यांनी सांगितले.

धार्मिक कॉरिडॉर निर्माण करावे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच्या त्र्यंबकेश्वरशिर्डीवणीशनिशिंगणापूरमांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतो. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे. नाशिकमधील राम काल पथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करावे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तासह इतर कुंडांच्या सौंदर्यीकरण केल्यास भाविकांना तेथे जाता येईल. त्याशिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वर मंदिरांच्या शेजारील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ व्हावा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. गर्दीचे नियोजनवाहतूक नियोजन तसेच सर्व्हेलन्ससाठी जास्तीत जास्त एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. ज्या भागातून जास्त गर्दी होते त्या रस्त्यांवर गर्दीच्या नियोजनासाठी व भाविकांना वेळ घालविता यावायासाठी त्या ठिकाणी डिजिटल कुंभसंदर्भातील प्रदर्शन तयार करावे. सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या लोगो निर्माण करण्यासाठी स्पर्धा घ्यावीअशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

सन 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माहितीचे विश्लेषण करून पुढील कुंभमेळ्यासाठी कसे नियोजन करता येईलयाचा अभ्यास करावा. सिंहस्थ दरम्यान गोदावरी नदीचे पाणी वाहते राहिले पाहिजेजेणेकरून भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येईलयासाठी नियोजन करावे. तसेच साधुग्रामसाठी भूसंपादनसाधुग्राम व इतर महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य केंद्रेअग्निशमन सुविधा आदीसंदर्भातही सुयोग्य नियोजन करून आराखडा तयार करावे. तसेच कुंभ कालावधीत नागरिकांपर्यंत माहिती जलदगतीने मिळण्यासाठी संपर्क यंत्रणा (पब्लिक अँड्रेस सिस्टीम) निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.

कुंभमेळा कालावधीत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. तसेच कुंभ कालावधीत काम करणाऱ्या मनुष्यबळास प्रशिक्षण देण्यात यावे. कुंभमेळ्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यासाठीचे नियोजन करावे करण्याची सूचना जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केली.

०००नंदकुमार वाघमारे

Wednesday, 26 February 2025

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची तत्परता* pl शेअर, जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्कटोल फ्री क्रमांक – ९३२११०३१०३ कार्यालयाचा पत्ता

 जनता दरबारात आलेल्या पाच रुग्णांना मिळाली उपचारांसाठी तातडीने मदत*

*नातेवाईकांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार*

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची तत्परता*

मुंबईदि. 24 : शासकीय योजनांच्या वैद्यकीय मदतीच्या निकषात आजार बसत नसल्याने आर्थिक विवंचनेतील पाच रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे पाच लाखांची मदत मिळवून देण्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे आभार मानले आहे.

या रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात मदतीसाठी विनंती केली होती. त्यावर  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायकता कक्षास कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तत्परतेने कार्यवाही केली. त्यामुळे आरव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांची मोलाची मदतधीर देणारा आधार

'आमच्या बिकट परिस्थितीमुळे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया व उपचार थांबण्याची भीती निर्माण झालेली असताना वेळीच मिळालेली ही मदत मोलाची आणि तेवढीच धीर देणारी आहे,' अशा शब्दांत एका २८ वर्षीय रुग्णाच्या पतीने मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

ठाण्यातील 12 वर्षीय चिमुकला रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत असून त्याच्या उपचारासाठीही मदत मिळाली. 'मित्रपरिवार-नातेवाईकांकडे मदत मागून थकलो पण उपयोग झाला नाहीमात्र मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या तत्परतेमुळे मदत मिळाली आणि पुढील उपचारासाठी धीरही मिळाला,' अशी भावना या चिमुकल्याच्या वडिलांनी व्यक्त केल्या. त्याला पुढील उपचाराकरिता शासनस्तरावर त्याला सर्व मदत केली जाणार आहे.

याबरोबर ठाणे जिल्ह्यातील रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पायावरील शस्त्रक्रीयेकरिताकोल्हापूर येथील रुग्णाला किडनी प्रत्यारोपणासाठी तसेच छत्रपती संभाजीनगरमधील एका चिमुकल्याला वैद्यकीय उपचाराकरिता मदत करण्यात आली असून या रुग्णांच्या नातेवाइकांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे तसेच आरव संस्थेचे आभार मानले आहे. या मदतीमुळे या पाचही रुग्णांच्या कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान,  गरजू रुग्णांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तीउद्योजक आणि खाजगी संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने समोर यावेअसे आवाहन कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क

Mail ID -  cmhelpdesk.mh@gmail.com

Facebook -  Cmrf Maharashtra

Facebook Page – CMRFmaharashtra

Instagram – cmrfmaharashtra

Youtube - Chief Minister Relief & Charity Hospital Helpdesk

X- @CmrfMh

Website -  https://cmrf.maharashtra.gov.in

Mail-ID - aao.cmrf-mh@gov.in

टोल फ्री क्रमांक – ९३२११०३१०३

कार्यालयाचा पत्ता  :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षमुख्यमंत्री कार्यालय७ वा मजलामंत्रालयमुख्य इमारतमुंबई-४०००३२ दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८

000


नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढविणार

 नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढविणार

                                          -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15 हजारांचा सन्मान निधी

·         पीएम किसान सन्मान योजनेचा’ 19 वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम

·         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे’ 22 हजार कोटी वितरीत

·         राज्यातील शेतकरी कुटुंबांना पीएम किसान सन्मान निधीचे’ 1 हजार 967 कोटी वितरीत

नागपूरदि. 24 : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरणझाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीप्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरेकृषी आयुक्त सूरज मांढरे,  वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणीस म्हणालेपीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6 हजार रुपये वितरीत करते. तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.  आता राज्य शासन या निधीत 3 हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9 हजार आणि केंद्रशासनाचे 6 हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना’ आणली, त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. केंद्र शासनाकडून बळीराजा जलसंजीवनी योजना’ मंजूर करून घेतली. या योजनेतून विदर्भातील 89 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत कृषी औजारशेततळी आदी अनुदान पद्धतीने लक्षांक न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 6 हजार कोटींच्या खर्चातून या योजनेंतर्गत आतापर्यंत कामे झाली असून येत्या काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                                                                                  

शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योगग्रेडींग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी स्मार्ट योजना’ आणली असून त्याचा बहुतांश शेतकरी लाभ घेवून विकास साधत आहेत. ॲग्रीस्टॅक ही महत्वाची योजना हाती घेण्यात आली आहे. याद्वारे संपूर्ण शेतीचे डिजीटायजेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देण्यात येणार आहे. मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्याला लाभ मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत ॲग्रीस्टॅक अंतर्गत 54 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच 100 टक्के उद्दीष्ट गाठण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला सौरपंप योजना सुरू असून मागील 1 वर्षात 1 लाख शेतकऱ्यांना याअंतर्गत सौरपंप देण्यात आले आहेत.

सौरपंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील 25 वर्षात वीज बिलाची चिंता नसणार असे ही त्यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षात 150 पेक्षा जास्त सिंचन योजनांना फेर प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण सहज उपलब्ध

 राज्यातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण सहज उपलब्ध

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यातील एक लाखहून अधिक ‘आयटीआय’ विद्यार्थ्यांसाठी कोडिंग आणि रोबोटिक्स’ राज्यस्तरीय वेबिनार

मुंबईदि.२४ : महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १०४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी कोडिंग आणि रोबोटिक्स’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

 या वेबिनारमध्ये ५०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त सांगितले.

 दक्षिण मुंबईतील इयत्ता नववीतील ११ विद्यार्थ्यांनी स्वतः एक ५ तासांचा मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केला आहेजो महाराष्ट्रभरातील युवकांना कोडिंग आणि रोबोटिक्स शिकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कौशल्य विकासउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. उपक्रमाचे कौतुक करत या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व त्यांचे ज्ञान हजारो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेयासाठी प्रेरणा दिली.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली  हा विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला. वेबिनारमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्स’ क्षेत्राचे महत्त्वसंधी आणि भविष्यातील रोजगाराच्या शक्यता यावर चर्चा करण्यात आली. टीम सिग्मा या विद्यार्थ्यांनी वेबिनारमध्ये या क्षेत्रातील संधींचे सखोल मार्गदर्शन केले.

कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणालेही मुले पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि त्यानंतर अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेतयाचा मला अभिमान आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! कोडिंग आणि रोबोटिक्ससारख्या नाविन्यपूर्ण क्षेत्रात आजची युवा पिढी सक्रिय सहभाग घेत आहे. विशेष म्हणजेया विद्यार्थ्यांनी स्वतः संकल्पना तयार करून राज्यभरातील ITI विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलली आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारामुळेराज्यभरातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण आता सहज उपलब्ध झाले आहे.

Featured post

Lakshvedhi