Monday, 24 February 2025

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई,  दि.24 : माथाडी कायद्यामुळे अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळाला असून या कायद्यामुळे माथाडी कामगारांचे जीवन सुकर झाले आहे. माथाडी कायदा एक चळवळ आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मकअसे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त सांगितले.

            सह्याद्री अथितीगृह येथील दालनात माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत माथडी कायदा बचाव कृती समिती पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी  कामगार विभागाचे प्रधान सचिव आय.ए.कुंदन,  कामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोडउपसचिव स्वप्नील कापडणीसअवर सचिव दिलीप वणीरेसहआयुक्त शिरीन लोखंडेमहाराष्ट्र राज्य माथाडीट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटीलमहाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे बाबासाहेब आढाव व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणालेमाथाडी कायदा रद्द होईल अशा अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये. माथाडी कामगार कायदा हा एकमेव महाराष्ट्रात लागू आहे. त्यामुळे हा कायदा रद्द होणार नसून  सर्व संबंधितांशी चर्चा करून यासंदर्भात सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे श्री. फुंडकर यांनी नमूद केले.

पदभरतीत अंशतः न्याय

माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व पुनर्रचित सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याबाबत अंशत: तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार माथाडी कामगारांच्या मुलांना पदभरतीत अंशतः न्याय दिला जाईलअसेही कामगार मंत्री  फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

माथाडी मंडळांशी विभागवार संवाद साधणार

माथाडी कामगारांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी माथाडी मंडळाशी विभागवार संवाद साधणार असून प्रत्येक मंडळासाठी बैठकीचे आयोजन करून चर्चा करण्यात येईल. तसेच सुरक्षा रक्षक मंडळाच्या समस्यांबाबत देखील विचार करून मार्ग काढण्यात येईल असेही यावेळी श्री. फुंडकर यांनी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनमहाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन,ट्रान्सपोर्ट अँण्ड डॉक वर्कस युनियनसुरक्षा रक्षक कामगार युनियनअखिल महाराष्ट्र माथाडीट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल

 एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २४ :   तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून  राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच देशाच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हॉटेल ग्रॅंड हयात येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यात डिजिटल सेवांचे प्रमाण वाढले असूनबहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. राज्य शासनाने मुंबई विद्यापीठात एआय सेंटरची स्थापना केली आहे. जागतिक आर्थिक मंचासोबत भागीदारीतून इंडस्ट्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्याने नीती आयोगाच्या सहकार्याने नवीन आर्थिक रोडमॅप तयार केला जात आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्राला (MMRDA) १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डेटा सेंटर आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

देशातील ६०% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. नवीन मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारण्यात येत असून२०३० पर्यंत राज्यातील ५०% वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल. मुंबई ही भारताची फिनटेक राजधानी’ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

नाशिक कुंभमेळा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नाशिक येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या ठिकाणी गर्दी व्यवस्थापनसुरक्षाआणि आभासी  अनुभव यासाठी अत्याधुनिक उपाययोजना केल्या जातील. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महाकुंभमेळा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेशेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अ‍ॅग्री-स्टॅट’ उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. 'ड्रोन शक्तीकार्यक्रमांतर्गत ड्रोन प्रशिक्षण देऊन कृषी फवारणी खर्च कमी करण्याचा मानस आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेही 'इनोव्हेशन सिटी'  देशातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक ठरेल. तीनशे एकरमध्ये ही सिटी विकसित केली  जाणार असून या सिटीमध्ये तंत्रज्ञाननाविन्यपूर्ण संशोधनआणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर भर दिला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबईपुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरनाशिक येथे जीसीसी पार्क विकसित करणार असल्याचेही ते म्हणाले. यासाठी उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या कल्पना आणि योगदान द्यावेअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा

 अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा

-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई दि. 24:- राज्यातील अल्पसंख्याक घटकाचा सर्वांगिण विकास व्हावायाकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यातअसे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

आज अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपसचिव मिलींद शेणॉयजिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळाकनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेंतर्गत प्राप्त प्रशिक्षण संस्थाचे प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणे. (मुंबईठाणेपुणेछ. संभाजीनगरनागपूरनाशिक व अमरावती) निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थाच्या प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणेप्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK), शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थीनी  यांच्या आहाराकरिता थेट रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करणे अशा विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

000

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा



 सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा

                                                                               -         मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 24  सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज सागर किनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरी सुरक्षा बळकट करणेतसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर या विषयी मंत्री श्री. राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानाविषयी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

            चर्चेच्या सुरवातील मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाची एआय तंत्रज्ञानाबाबतची गरज व्यक्त करुन मंत्री श्री. राणे म्हणाले कीमत्स्योत्पादनात वाढ आणि सागरी सुरक्षा ही विभागाची प्राथमिकता आहे. सागरी मासेमारी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी असे दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा प्रकारे नियोजन करता येईल. राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे. या सागर किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सध्या ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यातून जमा झालेल्या माहितीचा वापर करून सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याविषयी विद्यार्थ्यांनी विचार करावा. तसेच विभाग स्वयंपूर्ण करणेविभागाचा महसूल वाढवणेमत्स्य व्यवसायातीलबंदरांच्या विकासातील अडचणी सोडवणेअंमबजावणीमध्ये असलेल्या काही त्रुटींची पुर्तता करणेविभागाचा संपूर्ण कारभार पारदर्शक करणे यासह अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून विभागाचे कामकाज आणखी प्रभावीपणे करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे याविषयीही सविस्तर सादरीकरण विद्यार्थ्यांनी तयार करावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            पारंपरीक मच्छिमार आणि पर्ससिन मच्छिमार असा एक फरक असला तरी राज्यातील किनारपट्टीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मासेमारीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे एकाच पद्धतीची योजना किंवा व्यवस्था सर्वच जिल्ह्यांमध्ये लागू करणे व्यवहार्य ठरणार नाही. तर प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे एआय तंत्रज्ञानाची प्रणाली विकसीत करण्यात यावी असेही मंत्री राणे म्हणाले.

            यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुरक्षा आणि उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावयाच्या उपायांविषयी नवनवीन संकल्पना सुचविल्या. त्यामध्ये मच्छिमारांसाठी मुख पडताळणी (फेस रेक्गनिशन) प्रणाली तयार करणेकिनारा मॅपिंग करणेजीपीएस फेन्सिंग लावणेतलावांचे मॅपिंग करणेराज्यातील एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर एआय तंत्रज्ञान अधारित विकास प्रकल्प राबवण्यात यावा आणि त्यातून होणारे फायद्यांचे एक रोल मॉडेल तयार करून संपूर्ण राज्यात त्याप्रमाणे योजना राबवावीसागरी सुरक्षेविषयी एक स्वंतंत्र एआयचे मॉडेल तयार करावेमॅपिंगच्या माध्यमातून मासेमारी क्षेत्राची माहिती देणारे मॉडेल तयार करणेमासेमारीसह हवामान आणि योग्य परिस्थितीचा अंदाज वर्तवणारे एआय अधारित मॉडेल तयार करणे अशा संकल्पना विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या.

            विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या संकल्पनांच्या दृष्टीने जीवायएएन (GYAN) यांनी एक परिपूर्ण सादरीकरण तयार करावे. या संकल्पनांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा बळकटीकरण आणि मत्स्योत्पादन वाढ यासाठी कसा वापर करता येईल याचा प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करावा. आपण तयार करत असलेले हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरणारे असेल. तसेच राज्याला मासेमारी क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठीही याचा उपयोग होणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

            यावेळी जीवायएएन (GYAN) चे योगेश राव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तर डॉ. उमेश राऊतनकुल प्यासी यांच्यासह देशभरातील विविध शहरातील विद्यार्थी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

नागपूर स्पोर्ट्स हब" विहित वेळेत उभारणार कामचा दर्जा, गुणवत्ता राखावी

 नागपूर स्पोर्ट्स हब" विहित वेळेत उभारणार

कामचा दर्जागुणवत्ता राखावी

-         क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. 24 :- नागपूरमानकापूर विभागीय क्रीडा संकुलात वसतीगृहअद्ययावत जिम्नॅशियम सुविधाप्रशासकीय इमारतआंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्यरेनवॉटर हार्वेस्टिंगग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे नागपूर स्पोर्ट्स हब" उभारण्यात येत आहे. हे स्पोर्ट्स हब पूर्णत्वाला नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केले. त्याचबरोबर नागपूर स्पोर्ट्स हब" ची उभारणी विहित वेळेत करावीकामचा दर्जागुणवत्ता यात कोणतीही तडजोड करू नयेअसे निर्देशही श्री. भरणे यांनी दिले.

            आज मंत्रालयात नागपूर स्पोर्ट्स हब"उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटीलकार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार,  उपअभियंता प्रशांत शंकरपुरेवास्तूविशारद नुपूर वैद्यनम्रता शेट्टी उपस्थित होते.

            मंत्री श्री. भरणे म्हणाले कीनागपूरमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटरक्रीडा विद्यापीठाशी संलग्नीत कोर्सेससाठी अॅकेडमी सुरु करुन त्यात स्पोर्ट्स मीटस्पोर्ट्स फिजीयोथेरेपीस्पोर्ट्स सायकॉलॉजीस्पोर्ट्स इव्हेंटस्पोर्ट्स कोचींग इत्यादी कोर्सेस सुरु करुन खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करीयरची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी विशेष इनोव्हेटिव्ह स्पोर्ट्स स्कूलची उभारणी करण्यात येत आहे. स्पोर्ट्स इन्फॉरमेशन सेंटर उभारुन नवोदित खेळाडूंना व पालकांना विविध खेळाची अद्ययावत माहितीशासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनाविविध पुरस्कारशासकीय व खाजगी क्षेत्रातील सेवेच्या संधी इत्यादीबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

*श्री. कमलेश्वर महादेव मंदिर* श्रीनगर, जिल्हा पौडी गढवाल, उत्तराखंड

 *श्री. कमलेश्वर महादेव मंदिर* 

श्रीनगर, जिल्हा पौडी गढवाल, उत्तराखंड 

    

संकलन - सुधीर लिमये पेण 


देवप्रयाग पासुन ४८ किमी अंतरावर किर्तिमुख त्यानंतर पांच किमी अंतरावर श्रीनगर हे गांव आहे. या गांवाचे धार्मिक महत्व आहे ते म्हणजे तेथील कमलेश्वर महादेव मंदिर.

  

रावण वधानंतर श्रीराम या परिसरात आले, तेव्हा येथील प्रसन्न वातावरण व वनश्री पाहुन काही दिवस येथे रहावे असा मोह झाला. येथील शंकराचे मंदिर पाहुन 'सहस्त्राक्ष' स्वरूपातील प्रदोष काळी शंकराची पुजा करावी व सहस्त्रकमले वहावी अशी इच्छा झाली. त्यासाठी सहस्त्रकमले गोळा केली व पुजेस सुरूवात केली. 


शिवपुजनात मग्न असलेल्या श्रीरामांची परिक्षा घेण्याचे भगवान शंकरांनी ठरविले. पुजेसाठी आणलेल्या सहस्त्रकमलापैकी एक कमळ भगवान शंकरांनी लपवुन ठेवले. श्रीरामांनी ९९९ कमळे वाहिली व हजारावे फुल पाहतात तर तेथे एक ही फुल शिल्लक नव्हते. प्रदोष काल संपायला थोडाच अवधी शिल्लक असल्याने श्रीरामांनी आपला उजवा डोळा लगेच काढुन वाहण्याचे ठरविले, हे भगवान शंकरांच्या लक्षात येताच त्यांनी तेथे हजारावे फुल ठेवले व आपण त्यांच्या शिवभक्तीवर प्रसन्न आहोत असे सांगितले.  तेव्हापासुन या मंदिराला कमलेश्वर महादेव मंदिर म्हणतात. 


त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती. तेव्हापासुन वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेला संतानहीन मातापिता रात्री तुपाचा पेटता दिवा हातात धरून संपुर्ण रात्रभर, या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उभ्या असतात. ज्यांच्या हातातील दिवा रात्रभर तेवत राहतो, त्यांची प्रार्थना परमेश्वरांनी ऐकली असे समजतात. त्यांना संतती होते अशी श्रध्दा आहे. त्याला 'खडा दिपक पुजन' असे म्हणतात. त्याची वेळ मंदिर व्यवस्थापनातर्फे अगोदर काही दिवस जाहीर केली जाते. 

                                                 

माहिती:

१) 'मथुरा ते केदार' रा.का.बर्वे,पुणे

२) गुगलच्या सहकार्याने    

      

   

श्री. पुरुषोत्तम लेले, पुणे

विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे –

 विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे

– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ उत्साहात साजरा

अमरावतीदि. २३ : पदवी पूर्ण होणे ही विद्यार्थ्याच्या आयुष्याची सुरुवात आहे. पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञानशाखांमध्ये पारंगत होऊन ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा. तसेच राष्ट्र निर्माणासाठी अविरत कार्यरत रहावेअसे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईराज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरेकुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना परवडणारे उच्च शिक्षण दिले जात आहे. दर्जेदार शिक्षण देऊन विद्यापीठाने नागरिकांचे जीवनमान बदलण्यात आणि संपूर्ण प्रदेशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगडेटा सायन्ससायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स या प्रगत क्षेत्राचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील गुणवत्तेसोबतच खेळामध्येही प्राविण्य मिळवावे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संत ज्ञानेश्वरसंत नामदेवसंत तुकारामसंत जनाबाईसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदींनी मराठी भाषेतून विपूल लेखन आणि उपदेश केले आहे. मातृभाषा ही प्रत्येकाच्या हृदयस्थानी असते. त्यामुळे भाषेला अभिजात दर्जा मिळणे गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनी जगातील विविध भाषा शिकून प्रगती करावी. भाषेसोबतच विविध बोलींचा अभ्यास आणि  तिचे जतन करावे. इतर भाषांमधील ज्ञान मराठीत भाषांतरीत केल्यास त्याचा सामान्यांना फायदा होईल. भाषेसोबतच विद्यापीठाने उद्योगांच्या गरजा पूर्ण होतील असे अभ्यासक्रम तयार करावेत. स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांमुळे स्थानिक उद्योगांना पूरक वातावरण तयार होईल. रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करताना काम आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन येणेही गरजेचे आहे. या सर्व प्रयत्नांतून प्रधानमंत्र्यांचे 2047 मधील विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होईल, असेही राज्यपाल म्हणाले.

न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले की, जिल्ह्याला संतांची महान परंपरा लाभली आहे. त्यांनी समाजाचे प्रबोधन करून मत परिवर्तन केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनस्वच्छता आणि शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती बाळगून शिक्षणातून प्रगती करावीतसेच शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा.

यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींचे वसतीगृह आणि विस्तारीत इमारतीचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. बारहाते यांनी स्वागत करुन अहवालाचे वाचन केले. सुरवातीला राज्

Featured post

Lakshvedhi