Sunday, 23 February 2025

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

 राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत

10 मार्च रोजी अर्थसंकल्प

 

            मुंबई, दि. 23 :- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलगिरीष महाजनशंभुराज देसाईआमदार सर्वश्री प्रसाद लाडप्रवीण दरेकरॲड.अनिल परबहेमंत पाटीलश्रीकांत भारतीयछगन भुजबळजितेंद्र आव्हाडडॉ.नितीन राऊतरणधीर सावरकरअमिन पटेलविधिमंडळ सचिव (1) जितेंद्र भोळेसचिव (2) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. 13 मार्च 2025 रोजी होळी निमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात

*खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे*

 *खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे*


व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला डॉ. भूषण सोहनी यांचा हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.  अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार 


’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !


 मांसाहार्‍यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा समावेश करण्याची ही ’८′ कारणं जरूर जाणून घ्या.


 *१) मधूमेहींसाठी फायदेशीर –*


खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम  आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यातील मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेट कमी असते त्यामुळे मधूमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा.


* *२) कॅन्सरचा धोका कमी होतो –*


खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्स

नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकार व राज्य शासन प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

 नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकार व राज्य शासन प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री. पवार म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताअंतर्गत नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्नपुर्तीकरीता देशामध्ये २ कोटी घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी अधिकाधिक घरे राज्यातील नागरिकांना मिळवून देण्याकरीता राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्यशासनाने १०० दिवसाचा विशेष कृती उपक्रमाअंतर्गत लोककल्याणकारी योजना व विकास कामांना गती देण्यात येत आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने घरकुलांना मंजुरीहप्ता वितरणघरकुले पूर्ण करण्यासोबतच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याबाबतची कामे करण्यात येत आहेत.

 

महाआवास अभियानाअंतर्गत १ जानेवारी ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असून १००  दिवसाचे उद्ष्टि केवळ 45 दिवसात पूर्ण केले आहे. लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम चांगल्या पद्धतीने करुन घ्यावे. कामे करीत असतांना अडचणी असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कळवाव्यातत्या प्राध्यान्याने सोडविण्यात येतील. नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकार व राज्य शासन प्रयत्नशील आहेनागरिकांनीही सहकार्य करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

राज्यातील एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

श्री. गोरे म्हणाले,  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत एकाच वर्षामध्ये २० लाख घरकुलाचे राज्याला उदिष्ट देण्यात आले आहे. याकरीता ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनानी घरकुल मंजूरी तसेच प्रथम हप्ता वितरणासाठी जागा उपलब्धतालाभार्थ्यांचे बॅंक खाते उघडणे आदींकरीता विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. पंडीत दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत ५०० चौ. फूट. जागा उपलब्ध करुन देण्यासाठी १ लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरेहे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास विभागास १०० दिवसाचा विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. यामाध्यमातून राज्यातील एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही,  याकरीता ग्राम विकास व पंचायत राज विभाग प्रयत्नशील आहेअशी ग्वाही श्री. गोरे यांनी दिली.

 

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या ५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी पत्राचे वाटप आणि १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे कळ दाबून वितरण करण्यात आले. तसेच महाआवास अभियान २०२४-२५ पुस्तिका आणि पोस्टरचे अनावरणही करण्यात आले.

 

यावेळी माजी आमदार अतुल बेनकेग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. राजाराम दिघेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य गरीब माणसाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 सर्वसामान्य गरीब माणसाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 श्री. शिंदे म्हणालेप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्राला २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यात या घरकुलांसाठीचा प्रत्यक्ष हप्ता जमा होणे हा क्षण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक सोहळा आहे. या योजनेतून सर्वसामान्य गरीब माणसाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात प्रत्येक बेघराला घर देण्याचा संकल्प हाती घेतला असून त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात २० लाख नागरिकांना आपल्या स्वतःच्या घरात प्रेमाचा संसार फुलविता येणार आहे.

या योजनेसोबतच राज्यातील अन्य आवास योजनेतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घरकुले साकारली जात आहेत. सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत परवडणारी व पर्यावरणपूरक घरेज्येष्ठ नागरिकांकरीता घरे साकारण्यात येत आहेत. प्रधानमंत्री यांनी राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना चालना दिली आहे. अन्नवस्त्रनिवारा या मानवाच्या तीन महत्त्वपूर्ण गरजा असून त्यापैकी घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. याबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे श्री. शिंदे यांनी आभार मानले.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ मोफत वीजेसाठी सौर पॅनलकरीता अनुदान देण्याचा निर्णय

 प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

मोफत वीजेसाठी सौर पॅनलकरीता अनुदान देण्याचा निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री. फडणवीस म्हणालेप्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी १ लाख २० हजार रुपयेनरेगामधून २८ हजार आणि शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येतेआता यामध्ये ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत्यामुळे आता यापुढे लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये आता मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत्यासाठी सोलर पॅनलकरीता आवश्यक असणारी रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. तसेच ही घरे पुरुषांसोबतच महिलांच्या नावावर करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना प्राधान्याने वाळू उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावीअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

 

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण १३ लाख ५७ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होतेत्यापैकी १२ लाख ६५ हजार घरांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात एकाच वर्षामध्ये विक्रमी २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सोबतच रमाई आवास योजनाशबरी आवास योजनापारधी आवास योजनाआदिम आवास योजनायशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनामोदी आवास योजनाअटल बांधकाम कामगार आवास योजना अशा योजनेच्या माध्यमातून १७ लाख घरे बांधण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य शासन मिळून राज्यात ५१ लाख घरे बांधत आहे. याकरीता ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सोलर पॅनलचा समावेश केल्यास सुमारे १ लाख कोटी रुपयांचा वापर करण्यात येणार आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरेहे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास विभागाने एकूण २० लाख घरांच्या मंजुरीचे काम वेळपूर्वी पूर्ण केले आहे. आज रोजी १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून उर्वरित १० लाख लाभार्थ्यांनाही येत्या १५ दिवसात पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात यावे तसेच घरांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नियोजन ग्रामविकास विभागाने करावेअसे श्री. फडणवीस म्हणाले.

संविधान जागर अभियानातून स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण

 संविधान जागर अभियानातून स्वातंत्र्यासाठी  दिलेल्या बलिदानाचे स्मरण

उपराष्ट्रपती जगदीप धनखड

छत्रपती संभाजीनगर दि.२२ (जिमाका)- स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण संविधान जागर अभियानातून करावे. हा संविधान जागर तरुण पिढीमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे जाणीव करून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल,असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरस्वती भुवन  या शिक्षण संस्थेत आज केले.

            ‘जागर संविधान संविधानाचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते करण्यात आले. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखडराज्यपाल सी.पी. राधाकृष्णनसामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठइतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावेराज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराडसरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकीलसचिव श्रीरंग देशपांडे यांच्यासह विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            उपराष्ट्रपती म्हणालेक्रांतीकारकांनी केलेल्या बलिदानाचे सार्थक देशाच्या स्वातंत्र्यात झाले. विविध क्षेत्रातील धुरीणांनी भारतीय संविधान निर्मितीचे महान कार्य केले. संवाद समन्वयसामंजस्यसंभाषण यातून आपले प्रजासत्ताक निर्माण झाले. देशात  शांततापूर्ण वातावरण राखण्यात  राष्ट्रहित  असून प्रजासत्ताक स्थापनेचा हाच मूळ उद्देश आहे. म्हणूनच प्रत्येक नागरिकांनी भारतीय संविधानाप्रति आदर ठेवून देशात मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्य पार पाडणे आवश्यक असल्याचे श्री. धनखड यांनी सांगितले. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क नागरिकांनी जागरुकपणे बजावला पाहिजे. यातून लोकप्रतिनिधीची निवड होत असते. आपण भारतीय असल्याची ओळख लोकशाही राज्यव्यवस्था ही संविधानाने दिलेली देणगी असून प्रत्येक भारतीयांनी राष्ट्रहित प्रथम मानून कर्तव्य बजवावे. संविधान जागर अभियान राष्ट्रवादाला प्रज्वलित करणारे ठरेल असेही श्री. धनखड यांनी सांगितले.

            याप्रसंगी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या आवारात उपराष्ट्रपती जगदीप धनखडत्यांच्या पत्नी सुदेश धनखडराज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांनी एक पेड मा के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण केले. प्रास्ताविक दिनेश वकील यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभएक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण

  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ

भारत विकासाच्या अमर्याद संधींचा देश

उपराष्ट्रपती जगदीप धनखड

प्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी व्हावा

-राज्यपाल राधाकृष्णन

छत्रपती संभाजीनगर दि.२२ (जिमाका)- वेगाने विकास होत असलेला आपला भारत देश विकासाच्या अमर्याद संधी असलेला देश आहे. या संधी युवक युवतींनी ओळखाव्या व आपल्या व देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे,असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

            भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांच्या प्रमुख उपस्थित  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखडराज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णनखासदार डॉ. भागवत कराडकुलगुरू डॉ. विजय फुलारी उपस्थित होते.

            श्री. धनखड म्हणाले कीगेल्या दशकात देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती केली आहे. आपण जगातील पाचवी अर्थव्यवस्था झालो असून तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहोत. देशात प्रचंड क्षमता असून आता आपण विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहोत. पायाभूत सुविधादळणवळणइंटरनेट सुविधातंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात करुन आपण पुढे जात आहोत. जगाच्या एकूण व्यवहारापैकी १५ टक्के आर्थिक व्यवहार आपल्या देशात होत आहेत. आपल्या देशात उपलब्ध असलेल्या विकासाच्या संधी जोपर्यंत देशातील युवकांना लक्षात येत नाही तोपर्यंत वेगाने पुढे जाता येत नाही. युवकांसमोर अमर्याद संधी आहेत. ग्रामीण भागातूनलहान शहरातून स्टार्ट अप पुढे येत आहेत. सागरी तंत्रज्ञान ते अंतरीक्ष तंत्रज्ञानापर्यंत विविध क्षेत्रात संधी आहेत. विकसित भारत हे आपले स्वप्न असून त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. नव्या संधींचा उपयोग करीत देशाच्या विकासाचे नेतृत्व युवकांनी स्वीकारणे आवश्यक आहे.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यापीठाला असलेले नाव आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव शहराला असल्याने इथे भेट देणे विशेष असल्याचे नमूद करून उपराष्ट्रपती श्री.धनखड म्हणाले,वैयक्तिक प्रयत्नपालक आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने स्नातकांना यश मिळाले आहे. दीक्षांत समारंभ म्हणजे शिक्षणाचा अंत नव्हे. शिक्षण हे आयुष्यभर सुरुच राहणार आहेहे लक्षात ठेवून जीवनात सातत्याने ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करावा. विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे. या महान विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने या प्रक्रियेत आपले योगदान देणे गरजेचे आहे.

 

राष्ट्रप्रथम हाच प्रगतीचा विचार

राष्ट्र प्रथम हा विचार करून दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्याला वेगाने आणि निश्चयाने पुढे जावे लागेल. सामाजिक सहचर्यविविधतेत एकतासांस्कृतिक मूल्यांची जपणूकज्येष्ठांचा सन्मानपर्यावरण रक्षण या मुल्यांचा अंगिकार करुन आपण प्रगती करु शकतो.  स्वदेशीभारतीयत्वाचा अभिमान आणि समर्पित भावनेद्वारे देशाला सर्वोच्च स्थानावर पोहोचविता येईल. देश विरोधातील शक्तींना बाजूला सारून हे साध्य करता येईलयासाठी युवकांना पुढाकार घ्यावा लागेल.

            देशाला अस्थिर करणाऱ्या बाबींपासून आपल्याला सजग राहावे लागेल. भारतात प्रगतीच्या अनेक संधी असल्याने जगाचे लक्ष आपल्याकडे आहे. विद्यापीठाने या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांना पंख फुटतील आणि ते यश संपादन करू शकतील. प्रत्येक युवक-युवतीने आपल्या क्षमता ओळखून या संधींचा उपयोग करून यशस्वी व्हावे. आपल्या पालकांना आनंदाचे क्षण द्यावे. जीवनातील अपयश तात्पुरते असतेआपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने त्यावर मात करता येईलअशा शब्दात उपराष्ट्रपत धनखड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करा- राज्यपाल राधाकृष्णन

राज्यपाल तथा कुलपती राधाकृष्णन यांनी स्नातकांना दीक्षांत संदेश दिला. ते म्हणाले कीजीवनातील विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आज तुम्हाला पदवी प्रदान करण्यात येत आहे. आपल्या शिक्षणाचा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा देशाच्या विकासासाठीसमाजाच्या भल्यासाठी उपयोग करावा. आपले आईवडीलगुरुजन यांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करा. सत्याधारीत कृती करतांना जीवनात चांगल्या गोष्टींचे अनुसरण करावेअसे त्यांनी सांगितले.

 कुलगुरू डॉ.फुलारी यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितांचे स्वागत केले.

पीएम उषा मेरु योजनेअंतर्गत चार इमारतींचे भूमिपूजन

उपराष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पी.एम.उषा मेरु योजने अंतर्गत मंजूर चार इमारतींचे दृकश्राव्य पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यापीठाला १०० कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. यामध्ये स्ट्रेस बस्टर रिक्रेशन फॅसिलीटी सेंटर (९ कोटी ४८ लाख)सेंटर फॉर फोक अ‍ॅकण्ड कल्चरल स्टडीज ऑफ मराठवाडा (६ कोटी ६२ लाख)स्टूडंटस् फॅसिलीट इन लायब्ररी अ‍ॅअण्ड रिडींग रुम (३ कोटी ७५ लाख) तसेच सेंटर फॉर डिजीटल ट्रासफॉर्मेशन (७ कोटी ७४ लाख) अशा चार इमारतीचा समावेश आहे.

एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण

या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखडकुलपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंबाचिकु व जांभुळची रोपे लावण्यात आली.

५६ हजार १२२ पदवीधारक

दीक्षांत समारंभात ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२३ व मार्च-एप्रिल २०२४ या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. या दोन्ही परीक्षेत पदविकापदवीपदव्यूत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच १४ जून २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान पीएच.डी प्राप्त करणा-या एकशे सहा संशोधकांनी पदव्यांचे वितरण करण्यात आले.यंदाच्या दीक्षांत सोहळयास पदवी प्राप्त करण्यासाठी एकुण ५६,१२२ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र दाखल केले. यामध्ये पदवीधर  ४२ हजार ६६६पदव्यूत्तर पदवी १३ हजार १८७एम.फिल धारक १६ व पीएच.डी. धारक १०६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

            कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदेपरीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळीडॉ.कुलसचिव प्रशांत अमृतकरविद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्यविविध विद्याशाखांचे अधिष्ठाताप्राध्यापकस्नातक उपस्थित होते.

०००००


 


Featured post

Lakshvedhi