Saturday, 15 February 2025

बालभारती : ज्ञानाचा वैभवशाली वारसा

 बालभारती : ज्ञानाचा वैभवशाली वारसा

 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारतीच्या स्थापनेला नुकतीच ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील अठ्ठावन्न वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणालीकालसुसंगत शैक्षणिक धोरणेनवीन अध्ययन- अध्यापन पद्धती  अशा विविध बाबींचा विचार करून बालभारतीने पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपातआशयात अनेक बदल केले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.

              शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहेतर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो. लहानपणी शिकलेल्या कथाकविताचित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचेसाहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातचशिवाय जीवनाचेजगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतातअशी ही आयुष्यभर साथसंगत करणारीउत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात.दरवर्षी अंदाजे 6.55 कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही खडतर आणि विलक्षण प्रक्रिया आहेप्रतिवर्षी एकाचवेळी राज्यातील लाखाहून अधिक शाळांमधील शिक्षककोट्यवधी विद्यार्थी आणि तितकेच पालक यांच्याशी आपुलकीच्या अतूट धाग्यांनी बालभारती जोडली गेली आहे.  

मंडळाची स्थापना

              स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकात देशातील शैक्षणिक वाटचालीची जडणघडण झाली. अनेक जातीअनेक भाषाविविध रूढीपरंपरा इत्यादींमुळे सामाजिक आणि शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी नेमके काय स्वीकारावेकाय स्वीकारू नयेयाबाबत निश्चित दिशा आणि धोरण नव्हते. वेगवेगळ्या राज्यांतील भाषाविषयक धोरणशैक्षणिक आकृतिबंअभ्यासक्रम यामध्ये एकसमान असे सूत्रही नव्हते. कोठारी आयोगाने शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खागी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जाकिमतीमधील तफावतत्यांची उपलब्धताशाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार या बाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आलीशालेय पाठ्यपुस्तकांचे राष्ट्रीयीकरण झाले. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळपुणे या संस्थेची स्थापना झाली. याचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी 1967 रोजी  झाले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष या नात्याने तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांचे संस्था उभारणीत आणि मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक बापूराव नाईक यांचे संस्थेच्या प्रारंभीच्या वाटचालीत मोलाचे योगदान राहिले.

            राज्यातील प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व इतर सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करून वितरित करणे हे मंडळाचे मुख्य उद्‌दिष्ट आहे. मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक 1968 मध्ये प्रकाशित झाले. आजपर्यंत बालभारतीच्या पाच माला प्रकाशित झाल्या असून २०१३ पासून सहाव्या मालेचे प्रकाशन सुरु आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे. 1968 पासून पाठ्यपुस्तक मंडळ दर्जेदारसंस्कारक्षम आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पाठ्यपुस्तके अल्प किमतीत उपलब्ध करून देत आहे. गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणालीकालसुसंगत शैक्षणिक धोरणेनवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून पुस्तकांच्या स्वरूपातआशयात अनेक बदल करण्यात आले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.

 संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असे असलेतरी `बालभारतीया नावाने प्रकाशित होणारी भाषेची पाठ्यपुस्तके अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झालीकी मंडळ `बालभारतीयाच नावाने ओळखले जावू लागले. पाठ्यपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक पायाभूत स्वायत्त संस्था असा मंडळाचा उल्लेख करावा लागेल.  मंडळाने स्थापनेपासूनच संस्कारक्षम आकर्षक व दर्जेदार पाठ्यपुस्तक तयार करण्याचे व्रत घेतलेअनेक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तक प्रकाशनाचा पाया मजबूत केला. निव्वळ मुलांवरील प्रेमापोटी राज्यातल्या अनेक ख्यातनाम लेखककलावंत आणि विचारवंतानी बालभारतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. कल्पना कार्यक्षमता व कर्तृत्व यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम मंडळाच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतो.

पाठ्यपुस्तक  मंडळाची  रचना

              पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्‌ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातातपाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्याविभागात चालते. विद्याविभागांतर्गत मराठीहिंदीइंग्रजीउर्दूकन्नडसिंधीतेलुगूगुजराती या आठ भाषा आणि इतिहासभूगोलगणितविज्ञानकार्यानुभवआरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत.

 विषय समित्या

              पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीततोपर्यंत या समित्या कार्यरत असतात. पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील प्रक्रिया आहे. मुलांचा वयोगटत्याचं भावविश्वत्यांची आकलन क्षमतामजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे दिव्यच असते.

 

14February का सच, एक सॅल्युट,pl share

 


शहीद दिन,, एक सॅल्युट शाहिदासाठी ,pl share

 



एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करावा

 एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करावा

-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबई, दि. 14 : मराठी चित्रपटांसाठी एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारनिर्मातेदिग्दर्शक यांनी वेळोवेळी मांडलेल्या समस्यांपैकी एक पडदा चित्रपटगृहाच्या समस्यांसंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक झाली.

 राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु आहेत. उर्वरित सिनेमागृहांच्या सद्यस्थितीबद्दल उपलब्ध माहिती मिळवावी आणि बंद असलेली चित्रपटगृहे चालू करून त्यांनी फक्त मराठी सिनेमा दाखवावा आणि या चित्रपटगृहांना सवलती देण्याबाबतच्या स्वतंत्र योजनेचा मसुदा तयार करण्यात यावाअसे निर्देश ॲड. शेलार यांनी दिले.


रायगड किल्लासंवर्धन आराखडा अंमलबजावणी लवकरच

 रायगड किल्लासंवर्धन आराखडा अंमलबजावणी लवकरच

-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबई, दि. 14 : रायगड किल्ला संवर्धन व परिसराच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याचा अभ्यास करून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

रायगड किल्ला संवर्धन व परिसर विकास यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणालेरायगड विकास प्राधिकरणातर्फे ६०० कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार रायगड किल्ला व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. याचा सखोल अभ्यास करून सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.

०००

तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या जिर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक

 तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या

जिर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

 

मुंबई दि. १४ : तुळजापुरच्या भवानी माता मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारीतुळजाभवानी मंदिर ट्रस्टस्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.

मंत्रालय येथील दालनात बैठक झाली.

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सीमार्फत दुरुस्ती आणि डागडुजीचे काम सुरु आहे. यामध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध नियोजन घेण्याचे निर्देश ॲड.शेलार यांनी दिले.

यासंदर्भात सर्व संबंधित घटकांशी चर्चा करुन कामाची आखणी करण्यात येईल असेही ॲड शेलार यांनी सांगितले

साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी

 साधूग्रामसाठीचे भूसंपादनरस्ते कामांना गती द्यावी

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा

 

नाशिकदि. १४ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा  सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईलअसे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्तेसाधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिकानाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेआमदार किशोर दराडेआमदार प्रा. देवयानी फरांदेआमदार सुहास कांदेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामपोलिस आयुक्त संदीप कर्णिकजिल्हाधिकारी जलज शर्मामहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीनाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळपोलिस अधीक्षक विक्रम देशमानेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदेमाजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीकुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार  देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारणजलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्हीध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  रामकालपथनाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमोनोरेलचाही आढावा घेतला.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले कीगोदावरी नदी पात्रात दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावीअसे सांगितले. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा शून्य अपघातसुखद आणि अध्यात्मिक होण्यासाठी तसेच नाशिक शहराला जागतिक पातळीवर आणून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्यासाठीच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्रीमती फरांदे यांनीही विविध सूचना केल्यातर महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

०००००

Featured post

Lakshvedhi