Thursday, 13 February 2025

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी

 ‘रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी

- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. 12 : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार होईल यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती द्यावीअसे  रोजगार हमीफलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी  सांगितले.

मंत्रालयात मनरेगा अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सचिव गणेश पाटीलउपसचिव ज. जि. वळवी तसेच विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कुशल आणि अकुशल कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच धडक सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधीच्या अडचणी असल्यास तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. गोगावले यांनी दिले.

 पीटीओची (प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर) माहिती सादर करण्याचे तसेच राबविण्याचे विभागातील विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात आणि १०० दिवसांत पूर्ण करावयाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश रोहयो मंत्री गोगावले यांनी दिले.

महिला बचतगटांचे आदर्श कम्युनिटी किचन

 महिला बचतगटांचे आदर्श कम्युनिटी किचन

 महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावेयासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

भिवंडी निजामपूर महानगर पालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीनुसार अंगणवाडी संख्या वाढविण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. एकूण ३४१ केंद्रे असून लोकसंख्येनुसार १०२ अतिरिक्त अंगणवाड्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक नगरपालिकेत महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावातसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावापिण्याचे पाणीस्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले.

यावेळी आमदार प्रवीण दरेकररईस शेखसचिव अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारेबचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

००००

एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत १८ हजार ८८२ पदे भरणार

 एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत

१८ हजार ८८२ पदे भरणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. १२ : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करीत असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

१४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परिक्षा होणार आहे. 

मंत्रालयात महिला सहकारी संस्थामहिला बचत गटमहिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसेचभिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबतकर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.

महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीमुख्यसेविका यांची सरळसेवेने १०२ म्हणजे ८० टक्के पदेतर निवडीद्वारे २७२ म्हणजेच १०० टक्के पदे भरावयाची आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

 याचबरोबर राज्य महिला आयोगमहिला आर्थिक विकास महामंडळबाल कल्याण समितीबाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा

 नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी 

जमीनीचा प्रस्ताव सादर करा

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. १२ : ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागामध्ये उद्योगक्षेत्र वाढावेआदिवासी समाजातील उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी प्रोत्साहन मिळावेयादृष्टीने ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) जमीन हस्तांतरीत करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईलअसे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी शासकीय जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करण्याबाबत श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक झाली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळउद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगनएमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात औद्योगिक विकास होणे आवश्यक असल्याचे सांगून जांबुटके येथे मोफत जमीन देण्याबाबत प्रस्ताव सादर करावातसेच येथे आदिवासी समाजातील उद्योजकांना 50 टक्के प्राधान्य देण्यात यावेअसे निर्देश यावेळी दिले.

00000

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू

 कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन 

फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. १२ - नागपूर येथील फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाले असल्याचे आढळून आले असूनयाबाबत पाहणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावीअसे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या अतिक्रमणासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नागपूरच्या फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीसंदर्भात श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. यावेळी आमदार विकास ठाकरे उपस्थित होते.

श्री.बावनकुळे म्हणालेया प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे अतिक्रमणासाठी जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

जागा नागपूर जिल्हाधिकारी यांच्या मालकीची असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. तसेच ३० वर्षे मुदतीकरिता फुटाळा जलाशय परिसर एकात्मीकृत प्रकल्पाकरिता महामेट्रो महामंडळास हस्तांतरीत केलेली आहे. या परिसरात महामेट्रो महामंडळामार्फत एकात्मीकृत प्रकल्पांतर्गत विविध कामांचे कार्यान्वयन सुरू आहे. तेलंगखेडी येथे फुटाळा तलाव परिसर तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आल्याच्या अनुषंगाने अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके

विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार

- माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी नूतन इमारतीचे लोकार्पण

मुंबई उपनगर 'ग्रंथोत्सव २०२४चे उद्घाटन

 

            मुंबईदि. 12 : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामधील 'किऑक्समध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तक ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व संदर्भग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयमध्येत्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील सर्व ग्रंथालयात लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगरव जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर 'ग्रंथोत्सव २०२४चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले कीमहानगरपालिकेच्या सर फिरोजशहा मेहता ग्रंथालय इमारतीमध्ये मुंबई उपनगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सोयी सुविधा देवून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. या परिसरातील वाचकविद्यार्थी, ग्रंथ प्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून सर्व सोयी सुविधायुक्त ग्रंथालय उभे राहिले आहे. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या. स्पर्धा परीक्षांची माहिती आणि पुस्तके देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांची मागणी विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. मुंबई उपनगर, मुंबई शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन श्री.शेलार यांनी केले.असल्याचे ॲड.शेलार यांनी सांगितले.

  सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटीलप्रकाश गंगाधरेलेखक चंद्रकांत भोंजाळबृहन्मुंबई महापालिकेच्या ग्रंथालय अधिकारी साधना कुदळेनगरसेवक भालचंद्र शिरसाटप्रभाकर शिंदेप्रकाश गंगाधरे यासह मुंबई उपनगर मधील विविध ग्रंथालयांचे अध्यक्षविविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

विलेपार्ले येथील श्री. वा. फाटक ग्रंथालयाच्या मंजिरी वैद्य यांना  'ग्रंथ मित्रपुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने गौरवण्यात आले. तर जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार वटकर यांचा तर ग्रंथालयाचे कर्मचारी संपत जाधव यांची 25 वर्षे सेवा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले.

            दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठया विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळप्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळेप्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रया विषयावर व्याख्यान झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासंदर्भात श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान पार झाले. अभिजात मराठीतील शब्द वैभवया विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान पार पडले. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ग्रंथोत्सव 2024 मध्ये 13 फेब्रुवारी चे कार्यक्रम

  दि. १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यातया विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमानया विषयावर अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समजून घेतानाया विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेतीया विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुकेमालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर 'कोवळ्या पालेभाज्याया विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधूनया कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे.  कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

  या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.

दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार

 दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आयुष्मान भारत योजना व पीसीपीएनडी कायद्याबाबत आढावा बैठक

 

 मुंबईदि. 12 : विद्यार्थ्यांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची दरवर्षी तपासणी करण्यात येते. याच अनुषंगाने यावर्षी दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची मोहीमस्तरावर तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे आयुष्मान कार्डच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाहीयासाठी नियोजन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

मंत्रालय येथे आरोग्य विषयक विविध विषयांच्या आढावा बैठकीत श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाणआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या उपसंचालक रेखा गायकवाड आदी प्रत्यक्ष तर आरोग्य विभागाचे सचिव विरेन्द्र सिंहतसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीसर्व मंडळांचे उपसंचालकजिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीमहापालिकेचे वैद्यकीय अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणी करण्यात येते. या तपासणी दरम्यान आरोग्य विषयक समस्या आढळून आलेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतात. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने राज्यातील 0 ते 18 वयोगटातील साधारण दोन कोटी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. तसेच या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या जाणवतीलत्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी व उपचारांचे नियमीत मॉनिटरींग होण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने तयार केलेले ॲपची माहिती घेण्यात यावी. तसेच आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांची येत्या आठ दिवसांत सर्व माहिती अद्ययावत करून मोहिमस्तरावर या तपासणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. यासाठी शालेय आणि महिला व बाल विकास विभाग यांचे देखील सहकार्य घेण्यात यावेअशा सूचनाही श्री. आबिटकर यांनी दिल्या.

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या आरोग्यविषयक महात्वाकांक्षी योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून राज्यतील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याबाबत नियोजन करण्यात यावे. या अनुषंगाने आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड मिळण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर आयुष्मान कार्ड काढण्याचे काम हाती घ्यावे व या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करावाअसेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत (पीसीपीएनडीटी) नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. या कायद्याची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्यपोलीस यंत्रणाविधी तज्ज्ञ व सामाजिक संस्था यांच्या मदतीने भरारी पथके नियुक्त करण्यात यावीअसे निर्देश ही श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. आपत्कालीन सेवांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi