Monday, 10 February 2025

यशासाठी मनातील भीतीवर विजय मिळवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 यशासाठी मनातील भीतीवर विजय मिळवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाने ही सर्वांसमोर असतात. सकारात्मकतेने त्यावर मात करावीविद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातील भीतीवर विजय मिळवावा. सरावाने सामान्य माणूस देखील असामान्य काम करून असामान्य बनू शकतोयामुळे प्रधानमंत्री यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःला ओळखून स्वतःमधील क्षमता वाढविण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेवळ परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हानांशी कसा सामना करावा यादृष्टीने प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद हा अतिशय उपयुक्त आहे. प्रधानमंत्री अतिशय संघर्षमय जीवनातून यशस्वी झाले असून त्यांनी जगात भारताची नवी ओळख तयार केली आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनाचे ज्ञान मिळावेहा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ.अदिती सावंत यांच्या कॉटन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला


 योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 

मुंबईदि. 10 : जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा, उद्दिष्टांचे लहान लहान टप्पे करुन ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करात्यातून नक्की यश मिळेलअसा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी नवी दिल्ली येथे शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या मुंबईत शिवाजी पार्क येथील स्काऊट आणि गाईडच्या सभागृहात झालेल्या प्रसारण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा हेच अंतिम ध्येय न ठेवता सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा सल्ला दिला. ते म्हणालेविद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला ओळखून वर्तमानातील प्रत्येक क्षण उत्तम पद्धतीने जगावा. लिहिण्याच्या सवयीतून  आपले मत व्यक्त होत असते.

अपयश हे जीवनात यशस्वी होण्यासाठीचे इंधन असतेअसे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता त्याला आपला गुरू बनविण्याचा सल्ला दिला. एकाग्रतेसाठी ध्यान धारणेला महत्त्व असल्याचे सांगून निसर्गसंतूलित आहारनवनवीन तंत्रज्ञाननेतृत्व करताना टीम वर्क आदी बाबींचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘एक पेड मा के नाम’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. पालकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमतात्यांच्या इच्छा ओळखावी आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावीअसे आवाहन त्यांनी पालकांना केले.

मुंबई भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन



 मुंबई भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल'

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन

 

मुंबई, दि.10 : मुंबई ही भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटलम्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

           ‘ताज’ ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरनमाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलारमाजी मंत्री दीपक केसरकर ,इंडियन हॉटेल्सचे सीईओ  पुनीत चटवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे, पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे हे हॉटेल भविष्यात मुंबईची  एक नवी ओळख निर्माण करेल. टाटा समूह आणि विशेषतः ताज हॉटेल्सचा भारताच्या विकासात मोठा वाटा आहे. "ताज हे केवळ एक हॉटेल नसूनप्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे," "20 व्या शतकातील कुलाब्यातील ताजप्रमाणे, 21 व्या शतकातील हे हॉटेल नवे प्रतिक ठरेल," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आणखी नव्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेल्या हॉटेल्सची गरज असूनही संधी हेरून या क्षेत्रातील कंपन्यांनी नव्या प्रकल्पांची उभारणी करावीअसे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

          या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई महानगरपालिका वेगवान निर्णयात सकारात्मक असेल. अशा प्रकल्पांच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. प्रशासन ही केवळ नियामक संस्था नसूनविकासातील भागीदार आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या संपूर्ण प्रकल्पामागे टाटा समूहाचे मार्गदर्शकअध्वर्यू दिवंगत रतन टाटा यांचे महत्त्वाचे योगदान असून रतन टाटा यांचे हे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होईल. या सोहळ्याच्या माध्यमातून मुंबईच्या पर्यटन आणि व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहेअसा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन हॉटेल्स आणि टाटा समूहाचे अभिनंदन केले.

नागपूरमध्येही अत्याधुनिक सुविधांसह हॉटेल उभारण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मनोगत व्यक्त केले. तर इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांनी प्रास्ताविक केले.

घाटकोपरमध्ये प्रथमच साई उत्सवात अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न

 घाटकोपरमध्ये प्रथमच साई उत्सवात अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न


दि. १० फेब्रुवारी, मुंबई- घाटकोपरमधील जांभळीपाडा येथील कैलास बाल मित्र मंडळातर्फे १६ व्या साई उत्सव वर्धापन दिनाच्या औचित्याने ७ ते ९ फेब्रुवारी असा तीन दिवसीय सोहळा नुकताच पार पडला.
‘शिर्डी माझे पंढरपूर’ या संकल्पनेवर आधारीत प्रवेशद्वारावरील नयनरम्य सजावट नागरीकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. ज्यात विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती, ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले ह्या दृष्याचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता. यंदाच्या उत्सवात साई सच्चरित्र पारायण, महिलांचा हळदी-कुंकू समारंभ, गजर साईनामाचा भजन कार्यक्रम, जागरण-गोंधळ, आरोग्य तपासणी शिबीर, भव्य पालखी मिरवणूक सोहळा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले.
भव्य पालखी मिरवणूकीत घाटकोपरमध्ये प्रथमच वर्षानुवर्षे पंढरीच्या वारीत जसा रिंगण सोहळा पार पडतो अगदी तसाच शेकडो वारकरी, टाळकरी, मृदुंगवादक आणि साईभक्तांच्या उपस्थितीत अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला ज्याची सर्वत्र चर्चा झाली.


मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी

 मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या

डीजिटलायझेशनची प्रक्रिया तातडीने सुरू करावी

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 10 – राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. 

मंत्रालयात राज्यातील तलावांचे ठेके आणि मत्स्य उत्पादन वाढीबाबत झालेल्या बैठकीमध्ये मंत्री श्री. राणे यांनी या सूचना दिल्या. यावेळी मत्स्य आयुक्त किशोर तावडेमत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राममत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्त अभय देशपांडेसंदीप दफ्तरदारउप आयुक्त ऋता दीक्षित आदी उपस्थित होते.

   राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की,  या व्यवसायमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची माहिती विभागाकडे उपलब्ध होत नाही. व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणेही महत्वाचे आहे. यासाठी या व्यवसायाचे डीजिटललायझेशन’ होणे गरजेचे आहे. तलावाचा ठेका कोणाला दिलाकिती कालावधीसाठी दिलाकशा स्वरुपाचा होताउत्पादन किती तसेच मासेमारी व्यवसाय कराणारेमासळी विक्रेतेमासळी वाहतूकदार यांची माहितीया सर्व बाबींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असली पाहीजे. यासाठी राज्यभर मोहिम स्वरुपात डीजिटललायझेशन’ करण्याची प्रक्रिया राबवावी. हे डीजिटललायझेशन’ कशा प्रकारे करता येईल यासाठी विभागाने आराखडा तयार करावा. त्यासाठी एक एजन्सी नेमावी.नेमण्यात येणाऱ्या एजन्सीला या कामातील चांगला अनुभव असावा. तसेच गुगल मॅपिंगच्या धर्तीवर नकाशे मागवावेतत्यांचे वर्गीकरण करावेअसे आदेशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

मंत्री श्री. राणे म्हणाले कीतलावांमधील गाळ काढणे आणि तलावांवर असलेले अतिक्रमण यांचीही माहिती विभागाने तयार करावी. ही माहिती तयार करताना टप्प्या टप्प्याने अतिक्रमण काढणे आणि राज्यभर मत्स्य व्यवसायाचे अधुनिकीकरण कशा प्रकारे करता येईल याचाही कृती आराखडा तातडीने तयार करावा. विभागाला सक्षम करण्यासाठी डीजिटललायझेशन’ सोबतच अधुनिकीकरण आणि व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.  अधुनिकीकरणासाठी संस्थातज्ज्ञअभ्यासक यांच्याकडून अभिप्राय मागवावेत. सध्या सुरू असलेली प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवावी. तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा करून कार्यवाही सुरू करावी. गाळ  काढणे आणि अतिक्रमण हटवणे यासाठी विभागवार कृती आराखडा तयार करावा. तसेच तलाव ठेक्यातील अटींचे पालन होत आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी एक सक्षम यंत्रणा विभागाने उभी करावी.

पहिल्या टप्प्यात तलावांचे डीजिटललायझेशन’ करून त्यानंतर अधुनिकीकरण करायचे आहे. तसेच तलाव ठेक्यांसाठी किमान शुल्क आकारणीस्पर्धात्मकता आणणे अशा पद्धतीने काम करावयाचे असल्याचे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

राज्यात सध्या 500 हेक्टर पेक्षा कमी आकाराचे 2 हजार 410 तलाव आहेत. तर 500 ते 1000 हेक्टरचे 41 आणि 1000 हेक्टर पेक्षा मोठ्या आकाराचे 47 तलाव आहेत. तलावांचे अब आणि क वर्ग असे वर्गीकरण करण्यात येत आहे. मासळीचा किमान दर ठरवण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. तावडे यांनी दिली. तसेच संगणकीकरणअधुनिकीकरण या माध्यमातून गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी घ्यावयाच्या निर्णयांची माहिती विभागाने दिली.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी

 मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प आढावा बैठक

 

मुंबईदि. 10: रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होवून मत्स्यउत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड’ ठरणारा आहे. या प्रकल्पाचे काम विहीत कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावेअसे निर्देश मत्सव्यवसायबंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला. बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेसहआयुक्त महेश देवरेमिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती अक्षया मयेकर,  कोकण प्रादेशिक मत्स्य उप आयुक्त नागनाथ भादुले आदी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत मंत्री राणे म्हणालेप्रकल्पाअंतर्गत संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात यावे. निविदा स्तरावरील कामे कशाप्रकारे लवकर सुरू होतीलयाबाबत नियोजन करावे. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामे पूर्ण झाली पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये. पावसाळ्यात कामे करता येणार नाही. त्यामुळे सूक्ष्म नियोजन करून कामे सुरू करावीत. या कामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा. परवानग्या मिळविण्याची कार्यवाही पुढील 15 दिवसांत पूर्ण करावी.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील टप्पा दोनमधील पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढविणेउत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणेनौकानयन मार्गातील गाळ काढणेभराव व सपाटीकरणलिलावगृहजाळी विणण्यासाठी दोन शेडसांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणेमच्छिमारांसाठी दोन निवारा शेड बांधणेपुर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासित करणेअस्तित्वातील धक्का व जेट्टीदुरूस्ती आदी कामे प्रस्तावित आहेत. टप्पा दोन अंतर्गत एकूण कामे 22 असून कामे पूर्ण झाली आहेतअशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

०००

प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार

 प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार

-         पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन व

शाश्वत उपाययोजना विषयक कार्यशाळा संपन्न

 

मुंबईदि.१० : नद्यातलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नयेसांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असून. नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायतीनगरपालिकामहानगरपालिका यांच्या कार्य क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण  नियंत्रणासाठीप्रदूषित पाण्याचा पुर्नवापर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

आय. आय. टी.पवई येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आय. आय. टी.पवई यांच्या संयुक्त वि‌द्यमानाने स्थानिक स्वराज्य संस्थां प्रामुख्याने नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात सांड पाण्याचे व्यवस्थापन  व शाश्वत उपाययोजना  (मुन्सिपल वेस्ट वॉटर मॅनेजमेंट गॅप्स,  सस्टेनबिलिटी अँड वे फॉरवर्ड) या विषयावर एक दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली होतीया कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

यावेळी नगर विकास (२) विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव  डॉ. अविनाश ढाकणेआय. आय. टी.पवई च्या पर्यावरण विभाग व इंजिनिअरिंगचे प्रोफेसर मुनेश कुमार चंदेलप्रोफेसर अनिल कुमार दीक्षितराज्यातील महानगरपालिका,नगरपालिका या क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण अधिकारी तथा तंत्रज्ञ या कार्य शाळेला उपस्थित होते.

            पर्यावरण  मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीग्रामपंचायती,नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या त्या स्थानिक भागातील प्रदूषित पाणी या नद्यांमध्ये थेट मिसळले जाते. प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषित पाणी थेट पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नद्या व तलावांचे संवर्धनही भविष्याची गरज ओळखून त्याचा सुनियोजित तांत्रिक आराखडा पर्यावरण विभागाकडून बनवला जाणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये लोकांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी पर्यावरण विभाग एक तांत्रिक कक्ष देखील स्थापन करून करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरून प्रदूषणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवता येतील असेही मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीशेतीमध्ये पिकांवर फवारणी करण्यात  येणारी  कीटकनाशके यामुळे देखील पाणी प्रदूषित होत आहे. जल,वायू,मृदा प्रदूषण रोखण्यासाठी परस्पर संबंधित शासनाच्या विभागांच्या समन्वयाने प्रदूषण टाळण्यासाठी काटेकोरपणे उपायोजना  करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आवश्यक तिथे जनजागृती करणे.जिथे कायद्याची गरज भासल्यास कायदेशीर दृष्ट्या कारवाई करणे. त्याचप्रमाणे कायदा व नियमांची माहिती लोकांना करून देणे यासाठी देखील पर्यावरण विभाग भर देणार आहे. पर्यावरणावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.प्रत्येकाने हे प्रदूषण रोखण्यासाठी काळाची गरज ओळखून आत्तापासूनच काम केले तर आपण पुढील पिढीला आपण चांगले वातावरण आणि चांगले आरोग्य देऊ शकतो.पर्यावरणासाठी काम करून आपण सर्वांचे जीवन सुसह्य करणार आहोत त्यामुळे या कार्यशाळेचा नक्कीच सर्वांना लाभ होईल असेही त्या म्हणाल्या.

प्रधान सचिव के. एच. गोविंदराज म्हणाले कीशहरामध्ये निर्माण होणारे सांडपाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्रात मिसळले जाते.मात्र प्रदूषित झालेल्या सांड पाण्याचा जर आपण त्याच ठिकाणी पुनर्वापर केला तर प्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी मदत होऊ शकेल. आपल्याला प्रदूषणाची वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही माहिती आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने या समस्यावर मात करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे. स्थानिक ठिकाणी प्रदूषण कमी होण्यासाठी जनजागृती करणे यासारखे उपाय करणे गरजेचे आहे.आज झालेल्या कार्यशाळेतून मिळणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या क्षेत्रांमध्ये पोहोचवा असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी महाराष्ट्रातील पालिका क्षेत्रातील प्रदूषित पाण्याचे सद्यस्थिती आणि त्याचा होणारा परिणाम याविषयी सादरीकरण केले. इंदोर येथील  डॉ. राकेश कुमारआयआयटी मुंबईचे प्रोफेसर अनिल कुमार यांनी नैसर्गिक रित्या प्रदूषण आपण कसे थांबवू शकतो यावर आधारित आपले विचार मांडले.

 'प्रदूषित पाणी शुद्धीकरणासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणेया विषयावरती आय.आय.टी खरगपूरचे इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रोफेसर ब्रिजेश दुबेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळेइको एन्व्हायरमेंट प्रॅक्टिस चे मुख्य अधिकारी कैलास शिरोडकर, 'राज्यातील प्रदूषित पाण्यावरती राबवण्यात आलेले नाविन्यपूर्ण प्रयोग यशोगाथाची माहिती मुंबईकोकणपश्चिम महाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र,मराठवाडा नागपूरअमरावती  या भागातील पालिका अधिकाऱ्यांनी यांनी सादर केल्या. 'शाश्वत शुद्ध पाण्यासाठी उपाय योजना'  या विषयावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सादरीकरण केले.

००००

Featured post

Lakshvedhi