Monday, 10 February 2025

उन्हाळा आला कलिंगड जपून खा. वरील व्हिडिओ अवश्य पहा.

 उन्हाळा आला कलिंगड जपून खा.

वरील व्हिडिओ अवश्य पहा.


*कर्करोग हा धोकादायक आजार नाही!* Pl share

 *कर्करोग हा धोकादायक आजार नाही!*


डॉ. गुप्ता म्हणतात, " कोणाचाही कर्करोगाने मृत्यू होऊ नये. निष्काळजीपणा पुढे 

मात्र हात टेकावे लागतात. " 

हे वाचा, दुसऱ्यांना ही सांगा. 


*ह्या पायऱ्या लक्षात घ्या.*


(1) पहिली पायरी म्हणजे साखरेचे सेवन बंद करणे. साखरेच्या अभावाने कर्करोगाच्या पेशी नैसर्गिकरित्या मरतात. 


(2) दुसरी पायरी म्हणजे एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून सकाळी रिकाम्या पोटी जेवणाआधी घेत जा. 

1 ते 3 महिन्यात कर्करोग नाहीसा होईल. मेरीलँड मेडिकल रिसर्चनुसार, कोमट लिंबू पाणी केमोथेरपीपेक्षा 1000 पट चांगले, प्रभावी आणि सुरक्षित आहे. 


(3) तिसरी पायरी म्हणजे 3 चमचे घाणीचे [नैसर्गिक] खोबरेल तेल सकाळी आणि रात्री घ्या [प्या], कॅन्सर नाहीसा होईल.


*पहिली पायरी महत्वाची आहे.* 


*इतर दोन उपचारांपैकी कोणताही एक उपचार निवडू शकता.* 

*अज्ञान ही सबब नव्हे.*


*मी [Dr Gupta] ही माहिती 5 वर्षांहून अधिक काळ शेअर करत आहे.*

*तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला ही माहिती सांगा. कॅन्सरने मरू नका, उपायाने तरून जा. कॅन्सरने मरणे हे कोणासाठीही लाजिरवाणे आहे. जीवाना वाचवण्यासाठी ही माहिती अनेकजणा पर्यंत पोचवा!सर्व सामान्यांना दिलासा मिळेल!*

🙏🏻 💧📌💧🙏🏻

एक९४वर्शिय म्हातारा त्यांची दयनीय अवस्था , ओळखा पाहू

 घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले.  म्हातार्‍याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, एक प्लॅस्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते.  म्हाताऱ्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली.  शेजाऱ्यांनाही म्हातार्‍याची दया आली आणि त्यांनी घरमालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ दिला.  घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.


 म्हातार्‍याने सामान आत घेतले.


 तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून सर्व दृश्य पाहिले.  ही बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले.  त्याने एक मथळा देखील विचारला, "क्रूर जमीनदार पैशासाठी म्हातार्‍याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो."  मग त्याने जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचे काही फोटोही काढले.


 पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला.  प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला.  त्यांनी पत्रकाराला विचारले, म्हाताऱ्याला ओळखते का?  पत्रकार नाही म्हणाला.


 दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली.  "गुलझारीलाल नंदा, भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत" असे शीर्षक होते.  या बातमीत पुढे लिहिले आहे की, माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले.  आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात, अशी टिप्पणी केली गेली.  तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.


 वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु.  500/- प्रति महिना भत्ता, .परंतु स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी आपण लढलो नाही असे सांगून त्यांनी हे पैसे नाकारले होते.  नंतरच्या मित्रांनी त्याला असे सांगून स्वीकारण्यास भाग पाडले की त्याचे मूळ दुसरे कोणतेही स्त्रोत नाही.  या पैशातून तो घरभाडे देऊन गुजराण करत असे.


 दुसऱ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले.  एवढ्या व्हीआयपी वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला.  तेव्हाच त्याला कळले की त्याचे भाडेकरू श्री.  गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते.  घरमालकाने त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.


 अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली.  श्री.  गुलझारीलाल नंदा यांनी या वृद्धापकाळात अशा सुविधांचा उपयोग काय, असे सांगून त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही.  शेवटच्या श्वासापर्यंत ते सामान्य नागरिकासारखे साधे जीवन जगले.  1997 मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.


 त्यांच्या आयुष्याची तुलना सध्याच्या राजकारण्यांशी करा.


  *त्यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त.*🙏

Sunday, 9 February 2025

आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय :

 आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय :

उद्योगमंत्री उदय सामंत

 आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. शासन म्हणून आनंदवनला पाठबळ देण्याची आमची जबाबदारी आहे. आनंदवन येथील किमान टक्के कामइतर ठिकाणी करू शकलोतर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली  ठरेल. सकारात्मक पध्दतीने राज्य चालविणारे आनंदवनला कोणतीही मदत कमी पडू देणार नाही. आनंदवनची उर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहेअसे उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले.

 

विविध बाबींचे ऑनलाईन उद्घाटन :बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटलसोमनाथ येथील श्रमतीर्थआनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्टएस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर

 आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर


 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


आनंदवनला आर्थिक पाठबळ देणाची ग्वाही


 


चंद्रपूर, दि. 09 : अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज 75 वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.


बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या 75 व्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभाग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी उपस्थित होते.


मानवी संवेदनाची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी विविध उपक्रमातून संपूर्ण समाजासाठी संवेदना तयार केली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. 75 वर्षाची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात हा भाग अतिशय मागासलेला असताना बाबांनी हा प्रकल्प हाती घेतला. केवळ कुष्ठरोगांची सेवा नव्हे तर समाजसेवेची विविध क्षेत्रे जलसंधारण, पर्यावरण रक्षण असे अनेक प्रयोग येथे सुरू आहेत. आनंदवनच्या सकारात्मक कामातून हजारो तरुणांना समाजासाठी उत्तरदायित्व केले आहे. आपले संपूर्ण जीवन आमटे कुटुंबियांनी या प्रकल्पासाठी समर्पित केले आहे.


अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा प्रधानमंत्री यांचा संकल्प :


प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शासनाला आनंदवन सारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे. सन 2015 मध्ये भारतात प्रती लक्ष 9.73 कुष्ठरुग्ण सापडायचे. आज प्रती लक्ष 5.52 रुग्ण आढळतात. त्यामुळे आपल्याला मोठे काम करावे लागेल. यात आनंदवनचा मोठा सहभाग राहील.


आनंदवनच्या अनुदानात वाढ :


आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र, निवासी 500 लोकांचे केंद्र सुद्धा येथे सुरू होणार आहे. सन 2012 पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रती रुग्ण 2200 ऐवजी आता सहा हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रती रुग्ण दोन हजार वरून सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. आनंदवनला 10 कोटी रुपये कॉर्पस फंड लगेच देण्यात येईल. उर्वरित 65 कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरीता शासन पुढाकार घेईल. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी 10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

 महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी

10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

मुंबई दि 9 – महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 1013 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.

संरक्षण अधिकारी गट-ब (अराजपत्रित)  दोन पदेपरिविक्षा अधिकारी गट-क 72 पदेलघुलेखक (उच्चश्रेणी) गट -क एक पदलघुलेखक (निम्नश्रेणी) गट -क दोन पदेवरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहाय्यक गट-क 56 पदेसंरक्षण अधिकारी (कनिष्ठ)गट- क  57 पदेवरिष्ठ काळजी वाहक गट -ड चार पदेकनिष्ठ काळजी वाहक गट -ड 36 पदेस्वयंपाकी गट -ड सहा पदे या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील 236 रिक्त पदे भरण्याकरीता कॉम्पुटरबेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परिक्षा टीसीएस मार्फत घेण्यात येणार आहे.

परिक्षार्थी यांचे स्थानिक व जिल्ह्यात व लगतच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत केंद्र समवेक्षक व पर्यवेक्षकतर आयुक्तालयामार्फत निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व केंद्रांवर सिग्नल जॅमर बसविण्यात येणार असून यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार आहे. तसेचकेंद्रांवर बायोमेट्रीक व आय स्कॅनिंग व फेस रिडींग केले जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तपोलीस अधिक्षक यांना पुरेसा बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.

उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला अथवा अफवांना बळी पडू नयेकुणीही गैरमार्गाने नोकरी देण्याचे अथवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष दाखवित असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त श्री. मोरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालय कार्यालय अथवा 020-26333812 या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

 

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

लोकेश चंद्र यांची मुलाखत


मुंबई दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. यामध्ये ऊर्जा विभागाचे देखील सादरीकरण करण्यात आले.  राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णयसौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्पमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडायाविषयी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्र यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

000

Featured post

Lakshvedhi