आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय :
उद्योगमंत्री उदय सामंत
आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. शासन म्हणून आनंदवनला पाठबळ देण्याची आमची जबाबदारी आहे. आनंदवन येथील किमान 2 टक्के काम, इतर ठिकाणी करू शकलो, तर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली ठरेल. सकारात्मक पध्दतीने राज्य चालविणारे आनंदवनला कोणतीही मदत कमी पडू देणार नाही. आनंदवनची उर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहे, असे उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले.
विविध बाबींचे ऑनलाईन उद्घाटन :बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटल, सोमनाथ येथील श्रमतीर्थ, आनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment