Saturday, 8 February 2025

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 जयपूर डायलॉग हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जयपूर डायलॉग डेक्कन समिट

 

पुणेदि. 8 : जयपूर डायलॉगने राष्ट्रीय विचारांना एक व्यापक मंच उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीसमोर आणण्याचे कार्यही या माध्यमातून केले जात आहे. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हॉटेल हयात येथे  आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या 'जयपूर डायलॉग'च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधलात्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेप्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणे आवश्यक आहे. जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याचीखात्री करून घेण्याचीशोध घेण्याचीनवनवीन विषय हाताळण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे. महाराष्ट्रातील नव मतदारांच्या संख्ये संदर्भात ते म्हणालेभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये व्यापक मतदार जनजागृती अभियान घेऊन मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली. याआधी फक्त १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवाराला मतदार यादीत नाव नोंदणी करता येत होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार १ जानेवारी१ एप्रिल१ जून  व १ सप्टेंबर रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवा मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली असेही त्यांनी सांगितले.

 

एक होतं गाव.* *"महाराष्ट्र" त्याचं नाव.*

 (a forward)  *नम्र विनंती ह्या पोस्ट ला लॉईक कॉमेट नाही केलात तरी चालेल पण वाचुन फॉरवर्ड कराच*


*एक होतं गाव.* 

*"महाराष्ट्र" त्याचं नाव.* 

*गाव खूप छान होतं,*

*लोक खूप चांगले होते.* 

*"मराठी" भाषा बोलत होते,*

*गुण्यागोविंदानं  नांदत होते.* 

*त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं.*

*वृत्ती खूप दयाळू होती.*

*दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या*

*हाकेसरशी धावून जायचे.* 

*आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे.*

*एकमेकांना साथ देऊन* 

*जगण्याचं गाणं शिकवायचे,*


*महाराष्ट्रात होता एक भाग.* 

*"मुंबई" त्याचं नाव.*

*मुंबईसुद्धा छान होती;*

*महाराष्ट्राची शान होती.*

*सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.*

*आजूबाजूचे* *सगळेच मुंबईसाठी* 

*धडपडत होते.*

*इथं आले की* 

*इथलेच होऊन राहत होते.*

*"अतिथी देवो भव...!"* 

*या उक्तीनुसार महाराष्ट्रातील*

*लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.*

*पाहुण्यांचा मान म्हणून* 

*मागतील ते देऊ लागले.*


*हळूहळू परिस्थिती बदलू लागली.*

*"अतिथी" जास्त आणि* 

*"यजमान" कमी झाले.*

*मुंबई  कमी पडू लागली,* 

*आजूबाजूला पसरू लागली.* 

*सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.*


*मराठी आपली वाटत नव्हती.*


*प्रश्न मोठा गहन होता,*

*पण माणसं मात्र हुशार होती,* 

*दूरदृष्टीची होती.*

*त्यांना एक युक्ती सुचली.*

*दूरदेशीची* *परदेशातील भाषा*

 *त्यांना जवळची वाटली.*


*त्यांना वाटलं आपली मुलं* *शिकतील,  परदेशात जातील,* 

*उच्चशिक्षित होतील.* 

*सर्वांचाच, अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल,* 

*म्हणून त्यांनी याच भाषेतील* 

*शिक्षणाची सोय केली.*

*आजूबाजूला या भाषेत बोलणारे* 

*पाहून मराठी माणसंही खंतावली.*

*आपल्यालाही हे आलंच पाहिजे* 

*म्हणून याच भाषेत शिकू लागली,* 

*शिकवू लागली.* 

*मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना,* 

*मराठी कोणीच बोलेना,*

*बोलीभाषा ही बदलली.*

*सगळ्याचा नुसता काला झाला.* 

*शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.*


*अशा या* *महाराष्ट्रातील एक* 

*छोटा मुलगा* *आपल्या आईबरोबर*

*माफ करा हं........*

*आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा*

*वाचनालयात गेला.*

*चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला* 

*त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,*

*पानं फडफडली, आनंदित झाली.*

*त्यांना वाटलं* 

*निदान आज तरी आपल्याला* 

*कोणी वाचेल.* 


*इतक्यात त्या मुलानं विचारलं,*

*Which language is this?*


*'मम्मी' खूप सजग होती,*

*मुलाचं हित जाणत होती,* 

*सगळं ज्ञान पुरवत होती.*

*पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,* 

*"अरे, खूप पूर्वी म्हणजे* 

*तुझ्या आजोबांच्या वेळेस*

*"मराठी भाषा" प्रचलित होती;*

*आता कोणी नाही ती बोलत.*


*पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,*

*पानांपानांतून अश्रू ठिबकले;*

*पण*

*हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं.*

*कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं*

*काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!*


*महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!*

*मला एकाने विचारले* 

*तू मराठीत का 'पोस्ट' टाकतोस?*

*आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं,* 

*आमच्या घरात "तुळस"आहे,*

 *'Money plant'नाही.*

*आमच्या स्त्रिया "मंदिरात" जातात,*

*'PUB' मध्ये नाही.*

*आम्ही मोठ्यांच्या  पायाच पडतो,* 

*त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.*

*आम्ही "मराठी" आहोत,*

*आणि मराठीच राहणार!*

*तुम्ही English मध्ये मेसेज केलात*

*तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,*

*याचा अर्थ असा नाही की,* 

*मला English येत नाही.*

*अरे गर्व बाळगा तुम्ही* 

*मराठी असल्याचा.*

*"काकी" ची जागा* 

*आता 'Aunti' घेते*

*'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत.* 

*"भाऊ" 'Bro' झाला...!!*

*आणि "बहीण " 'Sis'...!!!*

*दुध पाजणारी "आई"* 

*जिवंतपणीच 'Mummy' झाली.*

*घरची "भाकर" आता* 

*कशी आवडणार हो*

*५ रु. ची 'Maggi' आता* 

*किती "Yummy" झाली.*

*मराठी माणूसच "मराठी" ला* 

*विसरू लागलाय....*

*आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी* 

*ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा.*

**आजपासूनच* *शक्‍यतोवर मराठी*

*लिहिण्याचा प्रयत्न करूया.*


 *२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जाऊंदे.*

महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी जागतिक बँका सकारात्मक एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, कोरियन एक्झिम व एएफडी बँक यांच्यासमवेत

 महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी जागतिक बँका सकारात्मक

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकोरियन एक्झिम व एएफडी बँक यांच्यासमवेत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

 

नागपूर,दि.07 : महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्पमराठवाडा वॉटरग्रीड योजनासमृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्पदमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँककोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बैठकीत नारपार सिंचन प्रकल्पमराठवाडा वॉटरग्रीड योजनासमृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्पदमणगंगा-एकदारे-गोदावरी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी सहाय्य करुअसे सांगितले.

 या बैठकीस कोरियन एक्झिम बँकेचे वरिष्ठ अधिकारी जंग वॅन रीव्यू‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशीमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदालगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर. तिरमनवारतापी सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक जे.डी.बोरकरकोरियन एक्झिम बँकेचे प्रकल्प विकास तज्ज्ञ रागेश्री बोस व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

तापी रिचार्ज योजनाबाबत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती सिंचन विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिली. दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी बैठकीत सहभाग घेतला.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथे अभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

 राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC)येथे

अभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

 

मुंबईदि.8:- राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्रातील संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता अभिरूप मुलाखतींचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले असूनयु. पी. एस. सी. परीक्षेतील महाराष्ट्रातील उमेदवारांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढावा हा यामागील उद्देश असल्याचे,  राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थाच्यासंचालक डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.

या अभिरूप मुलाखतीसाठी पॅनल सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर,              अतिरिक्त पोलिस महानिदेशक विश्वास नांगरे पाटीललोहमार्ग पोलीस आयुक्तमुंबई डॉ. रवीद्र शिसवेमुख्य आयकर आयुक्तजयंत जव्हेरीझोनल विकास आयुक्तसेझ महाराष्ट्र गोवा दीव दमणदादरा नगर हवेली ज्ञानेश्वर पाटीलसंचालकअणुविभाग नितीन जावळेअक्षय पाटील (आयकर विभाग)माजी आय.आर.एस. व आय.पी.एस. अधिकारी विकास अहलावतभारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा तसेच ए.आर.ओ.सी मध्ये कार्यरत रुजूता बनकर तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ प्रा. भूषण देशमुख आदि उपस्थित होते.

या मुलाखतीचा लाभ 22 विद्यार्थ्यांनी घेतला असून या यूपीएससी अभिरूप मुलाखतीचा पुढील टप्पा ऑनलाईन स्वरूपात होणार असल्याचे संचालक डॉ. पाटोळे यांनी सांगितले.


महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे विविध सोडतीची बक्षिसे जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे विविध सोडतीची बक्षिसे जाहीर

मुंबई दि.8:- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात 5 मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे जानेवारी- 2025 मध्ये 3 जानेवारी 2025  रोजी महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष              (भव्यतम)7 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र सह्याद्री11 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गौरव18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व 25 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी 4.00 वाजता काढण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष भव्यतम सोडत तिकीट क्रमांक NY-07/3054 या चिराग एन्टरप्राइजेसनाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रुपये 25 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे.  तसेच महा.सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी  या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रुपये 7 लाखाचे प्रथम क्रमांकाची एकूण 8 बक्षिसे जाहीर झाली आहेत. जानेवारी 2025 मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून 16227 तिकिटांना रुपये  81,51,050/- व साप्ताहिक सोडतीतून 57501 तिकिटांना रुपये 2,20,10,900/- बक्षिसे जाहीर झाली आहेत.

 सर्व खरेदीदारांना महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रु.10,000/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी या कार्यालयाकडे तसेच रक्कम रुपये 10,000/- या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्याबाबत आवाहन उपसंचालकमहाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी केले आहे.

 

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन,pl share

 माजी सैनिकमाजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन

 

मुंबई दि.8:-. मुंबई शहर जिल्ह्यातील माजी सैनिकमाजी सैनिक विधवा या सर्वांनी यापूर्वी महापोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in व www.ksb.gov.in या दोन्ही संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. तसेच रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ओळखपत्रपाल्यांच्या स्कॉलरशिप अथवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची प्रकरणे स्वीकारले जाणार नाहीमुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

1. ओळखपत्र,2. डिस्चार्ज बुक3. आधार कार्ड4. पी.पी.ओ.  (PPO)5. पॅन कार्ड6. पासपोर्ट साईज फोटो7. पेन्शन बँक पासबुक8. ई.सी. एच. एस. कार्ड9. ई-मेल आयडी

10. दूरध्वनी क्रमांक

अधिक माहितीसाठी क्रमांक 022- 22700404 / 8591983861 या कार्यालयीन दूरध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन

 मोबाईल व्हॅनरुग्णवाहिकांचे 9 फेब्रुवारी रोजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 

आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईदि. 8 राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षमदर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे.

 

नियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालयठाणे येथे दुपारी १ वाजता या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ८ कर्करोग मोबाईल व्हॅन७ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका१०२ क्रमांकांच्या ३८४ रुग्णवाहिका२ सीटी स्कॅन मशीन८० डिजिटल हँड हेड एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच राज्यात ६ डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने राज्यातील आठ मंडळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून स्थानिक लोकप्रतिनिधीही यामध्ये सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. या सुविधांमुळे राज्यातील ग्रामीणआदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे. 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याला प्रतापराव गणपतराव जाधवकेंद्रीय आयुष मंत्रालय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यांच्यासह या कार्यक्रमाला वन मंत्री गणेश नाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदेखासदार नरेश म्हस्केखासदार बाळ्यामामा म्हात्रे विशेष निमंत्रित असून स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेआमदार रविंद्र चव्हाणआमदार दौलत दरोडाआमदार संजय केळकरआमदार कुमार आयलानीआमदार महेश चौगुलेआमदार विश्वनाथ भोईरआमदार राजेश मोरेआमदार निरंजन डावखरेआमदार डॉ. जितेंद्र आव्हाडआमदार किसन कथोरेआमदार मंदा म्हात्रेआमदार डॉ. बालाजी किणीकरआमदार शांताराम मोरेआमदार नरेंद्र मेहताआमदार रईस शेखआमदार सुलभा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायकसचिव विरेन्द्र सिंहआरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायकआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi