Wednesday, 29 January 2025

सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीच्या

आदेशाची अंमलबजावणी करावी


- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

             मुंबई, दि. 28 : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 8 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या आदेशान्वये सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्तीवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत.


लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीबाबत दि. 24 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये सुधारीत तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. या निर्णयान्वये सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. तथापि, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल विविध याचिकांच्या अनुषंगाने पुढील आदेश होईपर्यंत वाल्मिकी, मेहतर, भंगी, अनुसूचित जाती व नवबौद्ध या समुदायातील व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली.


            उच्च न्यायालयाचे 8 जानेवारी 2025 चे आदेश विचारात घेऊन 24 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये तसेच त्यानुषंगाने वेळोवेळी विहीत केलेल्या शासन निर्णय व सुधारणा, शुध्दीपत्रकातील तरतुदीस अनुसरुन तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी सर्व विभागांना तसेच राज्यातील सर्व आयुक्त, महानगरपालिका, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय आणि आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना निर्देश दिले आहेत. कोणत्याही सफाई कामगारांवर वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना श्री. शिरसाट यांनी दिल्या आहेत.

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना

 राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना

- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

 कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश

 

मुंबईदि. 28 : विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

 मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमाहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवबी वेणूगोपाल रेड्डीमाहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीयाउपसचिव अशोक मांडेतंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर  राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेत सक्षम ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणालेआर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळविल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना होईल.

यासंदर्भात एक विशेष कृतीदल (टास्क फोर्स)  स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवबी वेणूगोपाल रेड्डीमाहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीयातंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,  राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईकपरेश पागे यांचा समवेश आहे.

काळी पिवळी मीटर टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडे दरात वाढ करण्यास मान्यता

 काळी पिवळी मीटर टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडे दरात वाढ करण्यास मान्यता

 भाडेदर १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू

 

मुंबईतदि. २८: मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत काळी पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमतग्राहक निर्देशांकवाहन कर्जाचा व्याजदर आदी मध्ये वाढ झाल्यामुळे प्राधिकरणाने काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदरवाढ करण्यास राज्य परिवहन प्रकरणाच्या 23 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्यता  दिली आहे.

भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील.  भाडेदर  सुधारणा १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल.

जे टॅक्सी व ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेतील. त्या ऑटोरिक्षाटॅक्सीना  ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक १ फेब्रुवारी २०२५ पासून दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत करून घेणे आवश्यक राहील. (भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारीत अधिकृत टॅरिफ कार्ड दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंतच अनुज्ञेय राहील.)  मोटार वाहन अधिनियमनुसार बृहन्मुंबई विदयुत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) १८५० बसेसचे ६ टप्पा प्रवासी वाहतूक परवान्याचे नुतनीकरण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी व "लास्ट माईल कनेक्ट‍िविटी" अनुषंगाने नवीन ०२ काळी-पिवळी मीटर टॅक्सी स्टॅण्ड६८ ऑटोरिक्षा स्टॅण्ड व ०९ शेअर-ए ऑटोरिक्षा स्टँड उभारण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने खटुआ समितीची स्थापना केली होती. समितीने सादर केलेल्या  अहवालास शासनाने ०९ मार्च २०२० रोजीच्या निर्णयाव्दारे मान्य केले आहे. त्यानुसार काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडे निश्चितीच्या सुत्रानुसार व वाहनाची सरासरी किंमतग्राहक निर्देशांकवाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी विचारात घेऊन भाड्याची परिगणना केली जाते. मोटार वाहन कायदा१९८८ कलम ६८ अन्वयेराज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे.

असे आहेत सुधारित दर :-

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. १८.६६  रुपये वरून २०.६६ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे.  आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रूपये २८ रुपये वरून  ३१ रुपये  भाडेदर असणार आहे.

कुलकॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये २६.७१ वरून  ३७.२ रुपये (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रुपये ४०  वरून  ४८ रुपये  (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर असणार आहे.

ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये १५.३३  रुपये वरून १७.१४ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी भाडे रूपये २३ वरून  २६ रुपये भाडेदर असणार आहे.

वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे

 वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे

वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

•          राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली

•          एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

 

मुंबईदि. २८ : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहेअसेही श्री. नाईक यांनी सांगितले.

            ३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्यानेआजारपणामुळे  इत्यादी  नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी  लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला आहे. तीन प्रकरणांमध्ये  वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे समोर आले आहे. या तीनही प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वन विभागाने अटक केली आहे. 

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ

राज्यात २००६ मध्ये १०३ वाघांची संख्या होती. २०१० मध्ये ही संख्या वाढून १६९ झाली. २०१४ मध्ये  यामध्ये आणखी वाढ होऊन वाघांची संख्या १९० वर पोहोचली. २०१८ मध्ये वाघांची संख्या ३१२ होती. तर २०२२ मध्ये  झालेल्या वाघांच्या  गणनेमध्ये  वाघांची संख्या ४४४  नोंदली गेली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येते. या पुढील गणना २०२६ मध्ये होणार आहेअसेही वनमंत्री श्री नाईक यांनी सांगितले.

वन क्षेत्रात वाढीसाठी प्रयत्न करणार

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार  राज्याचे वनक्षेत्र किमान ३० टक्के असायला हवे. या अनुषंगाने  महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्यावरून ३०% पर्यंत नेण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार आहेत. जंगलांच्या गाभा क्षेत्रामध्ये रानफळांची रायवळ आंबेबोरजांभूळ इत्यादी झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणीच  अन्नाची सोय होईल आणि मांसाहारी प्राण्यांच्या अन्नाची सोय देखील होईल. त्यामुळे भक्षाच्या शोधार्थ वाघ मानवी वस्तीपर्यंत येणार नाहीतअसे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.

पालघर मधील बहाडोई येथे जांभळाची प्रगत जात उत्पादित केली जाते. वनखात्याच्या नर्सरीमधून जागतिक दर्जाची जांभूळ रोपे तयार करून वन खात्याच्या विविध विभागांमध्ये लावण्याची सूचना देण्यात आल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

खासगी वनीकरणाला प्रोत्साहन

खासगी वनीकरणाला  प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्री. नाईक यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केल्याप्रमाणे  प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी  अद्ययावत  नर्सरी उभारण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून  या जिल्ह्यामध्ये लवकरच  विविध तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी सांगितले. 

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना

- जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत वाघबिबट इतर वन्य प्राण्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे.

- विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी वनविभाग व महावितरण कंपनी मिळून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे.

- अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्याकरिता परिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

- व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करण्यात येते. तसेच डॉग स्कॉड अंतर्गत सुध्दा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येते.

M - Stripes प्रणाली असलेल्या मोबाईलचा पुरवठा क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे.  त्याद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते.

- अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

- राज्यातील वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्यावत माहिती ठेवण्याकरिता वन्यजीव गुन्हे कक्ष Wildlife Crime Cell प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयनागपूर येथे तयार करण्यात आला आहे.

- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यात येतो.

- अतिसंवेदशील क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.

- परिक्षेत्र स्तरावर वाघ व बिबट या वन्यप्राण्यांचे मागोव्याचा निश्चित कार्यक्रम राबवून त्यांच्या अस्तित्वाबाबतची माहिती घेण्यात येते.

- वाघाचे भ्रमणमार्गपाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवण्यात येते. तसेच पाण्यामध्ये विष प्रयोग होऊ नये याकरिता पाणवठ्याची नियमीत तपासणी केली जाते.

- मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने पाणवठ्याकडे जाणाऱ्या मार्गावर शिकारी लोकांद्वारे लोखंडी ट्रॅप लावले नसल्याची खातरजमा करण्यात येणार.

००००

Tuesday, 28 January 2025

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार

 मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत

करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 28 : महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादनेपर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेलअसे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्य दूतावासातील मो.स्यारकावी यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

मंत्री श्री.रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.युसूफ यांना माहिती दिली. नाशिकचा कांदा आणि द्राक्षेकोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबामहाबळेश्वरची स्ट्रॉबेरीसह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळताजी फळेभाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. मलेशियाला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून मलेशियाने यांची आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावामहाराष्ट्राच्यावतीने त्यांचे स्वागत आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. पर्यटनाच्या माध्यमातून संस्कृतीचा विस्तार होतो. मलेशियाच्या पर्यटकांनी राज्यात पर्यटनासाठी यावेअसे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी केले. महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिकआणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी मलेशियाच्या कृषी आणि पर्यटन विषयक सदस्यांनी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले.

मलेशियाच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी मलेशिया करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

 राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

• साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

• तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

 

मुंबई दि. २७ : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडलीत्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेलया निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्यापाँडिचेरीसनीधर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे४ ब्लाईंड मेनसमायरागाभह्या गोष्टीला नावच नाहीग्लोबल आडगावहर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड)उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र)उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही)उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव)उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा)उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा)यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोलेविवेक लागूबाबासाहेब सौदागरविजय भोपेश्रीरंग आरसराजा फडतरेशरद सावंतमेधा घाडगेचैत्राली डोंगरेविनोद गणात्राप्रकाश जाधवशर्वरी पिल्लेईजफर सुलतानदेवदत्त राऊतविद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे

• सर्वोत्कृष्ट कथा :

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

• उत्कृष्ट पटकथा :

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक - सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

• उत्कृष्ट संवाद :

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

• उत्कृष्ट गीते :

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे - यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

• उत्कृष्ट संगीत :

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

• उत्कृष्ट पार्श्वसंगीत :

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

• उत्कृष्ट पार्श्वगायक :

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत - भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत - का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत - घे तुझ्यात सावलीत)

• उत्कृष्ट पार्श्वगायिका :

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत - सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत - बाई ग कस करमत नाही)

३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत - तुला काय सांगु कैना)

• उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :

१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत - कोल्ड्रीक वाटते गारवाघाची डरकाळी )

२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)

३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत - मी नाचणार भाई)

• उत्कृष्ट अभिनेता :

१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)

३. ललीत प्रभाकर (सनी)

• उत्कष्ट अभिनेत्री :

१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)

२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

• उत्कृष्ट विनोदी अभिनेता :

१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)

२. संजय नार्वेकर (टाईमपास)

३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

• सहाय्यक अभिनेता :

१. योगेश सोमण (अनन्या)

२. किशोर कदम (टेरीटरी)

३. सुबोध भावे (हर हर महादेव)

• सहाय्यक अभिनेत्री :

१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. क्षिती जोग (सनी)

३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :

१. अकुंर राठी (समायरा)

२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :

१. ऋता दुर्गुळे (अनन्या)

२. सायली बांदकर (गाभ)

३. मानसी भवालकर (सोयरिक)

• प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :

१. आतुर

२. गुल्हर

३. ह्या गोष्टीला नावच नाही

• प्रथम पदार्पण दिग्दर्शन :

१. 4 ब्लाइंड मेन

२. गाभ

३. अनन्या

0000

संजय ओरके/विसंअ/


 

वृत्त क्र.374


महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करा

 महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करा

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

 मुंबईदि. 28 :  महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ विकसित करणे तसेच डॉ. साबणे रोड लगतचा सर्व परिसर विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावेअसे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

 मंत्रालयात पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील)विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे,महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीपर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटीलदूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले कीमहाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी महाबळेश्वर परिसरातील विकासकामे गतीने पूर्ण करावी. किल्ले प्रतापगड येथील कामे सर्व कार्यान्वय यंत्रणांनी समन्वयाने पूर्ण करावीत. प्रतापगड किल्ल्याचे सुशोभीकरण करताना किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी. गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा. पर्यटन महोत्सवाच्या अगोदर ही कामे पूर्ण करावीत. कोयनानगर पर्यटन प्रकल्पासाठी लवकरात लवकर सल्लागार नियुक्त करावा तसेच या प्रकल्पासाठी येणारा खर्च आणि करावयाच्या सर्व कामांचा आराखडा सादर करावा. कोयनानगर परिसरामध्ये असलेले एमटीडीसीचे पर्यटक निवास संकुल अद्ययावत करावेअशा सूचनाही पर्यटन मंत्री श्री देसाई यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi