Tuesday, 28 January 2025

महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करा

 महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करा

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

 मुंबईदि. 28 :  महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ विकसित करणे तसेच डॉ. साबणे रोड लगतचा सर्व परिसर विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावेअसे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

 मंत्रालयात पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील)विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे,महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीपर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटीलदूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले कीमहाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी महाबळेश्वर परिसरातील विकासकामे गतीने पूर्ण करावी. किल्ले प्रतापगड येथील कामे सर्व कार्यान्वय यंत्रणांनी समन्वयाने पूर्ण करावीत. प्रतापगड किल्ल्याचे सुशोभीकरण करताना किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी. गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा. पर्यटन महोत्सवाच्या अगोदर ही कामे पूर्ण करावीत. कोयनानगर पर्यटन प्रकल्पासाठी लवकरात लवकर सल्लागार नियुक्त करावा तसेच या प्रकल्पासाठी येणारा खर्च आणि करावयाच्या सर्व कामांचा आराखडा सादर करावा. कोयनानगर परिसरामध्ये असलेले एमटीडीसीचे पर्यटक निवास संकुल अद्ययावत करावेअशा सूचनाही पर्यटन मंत्री श्री देसाई यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi