Tuesday, 28 January 2025

'बालभारती'* *स्थापना दिनाची* देवा तुझे किती सुंदर आ का श

 🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                        *२/२*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                  *'बालभारती'* 

              *स्थापना दिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

         

🌹⚜️🌹🤹‍♂️📚🤹‍♀️🌹⚜🌹


        *बालभारती. महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेले बालजीवन समृद्ध करुन शिक्षणासाठी प्रवृत्त करणारे नाव.*

        *बालभारतीच्या मुखपृष्टावरील मोठ्या औत्सुक्याने पुस्तक वाचणारी ती दोन मुलं बघून आजही सर्वांच्या मनात निरागस शाळकरी मुलांची आठवण जागी होते. त्या बालवयात रंगांचं, गंधाचं.. अक्षराचं, चित्रांचं सगळंच अप्रुप असतं. हे बालभारतीला चांगलच ज्ञात होते. बालकांना शिक्षणाची गोडी लावून ज्ञानाची जिज्ञासा निर्माण करण्याचे कार्य बालभारती एवढी वर्षे अव्याहत करतेय* .

        *एक काळ होता जेव्हा वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळी पुस्तके अभ्यासक्रमात होती. त्याच्या किमतीवरही बंधने नव्हती. यात एकसुत्रता आणण्याची शिफारस कोठारी आयोगाने केली. त्याप्रमाणे २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र शासनाने 'पाठ्य पुस्तक निर्मिती' आणि 'अभ्यासक्रम संशोधन मंडळ' अंतर्गत 'बालभारती' स्वायत्त मंडळ निर्माण केले.*

        *बालभारती चे इयत्ता पहिलीचे पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाले. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम बालभारतीच्या विद्या विभागात चालते. विद्या विभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण १४ विभाग आहेत. तर किशोर मासिक पण प्रकाशित होत आहे.*

        *शिक्षणाचा श्रीगणेशा आईकडून होतो. बालभारतीने जणू जगातला सगळा खजिनाच हळुवार पणे बालबुद्धीला झेपेल अशा पद्धतीने बहाल केला. १४ विद्या ६४ कलांची किमान ओळख होते ती बालभारती मुळे. बालभारतीच पाठ्य पुस्तक हाती पडताच जो आनंद होतो नां.. तो कशातही नाही. समाजात जाती, धर्म, भेद दूर करण्यात बालभारतीचे मोठे योगदान आहे.*

        *छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, समर्थ रामदास, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, क्रांतिकारक इ. यांच्या बद्दल बालभारतीने जे काही शिकवले त्यानेच आज महाराष्ट्र महान आहे.*

        *जीवनात ज्याला सकारात्मक दृष्टी लाभली तो भाग्यवानच. मग त्याला हे जग किती सुंदर आहे हे जाणवते. बालकांचे मन तर अतिशय पापभीरु.. मुलायम.. निर्मळ. या संस्कारक्षम वयातच काय रुजवायचे हे ठरवावे लागते.*

        *जेव्हा चांगले साहित्य वाचनात येते तेंव्हा नकळत निसर्गाविषयी कृतज्ञता भाव निर्माण होतो. मुख्य म्हणजे हे वसुंधरेचे वैभव ही परमेश्वर कृपा हा आमचा कृतज्ञता भाव. हेच संस्कृती संस्कार बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील या बालगीतातही व्यक्त होतात.*

        *बालभारतीची यशस्वी वाटचाल अशीच पुढे जात राहो हीच शुभेच्छा !!*

       

🌹⚜️🌹👩‍🎓📖👩‍🎓🌹⚜️🌹


  *देवा तुझे किती, सुंदर आकाश*

  *सुंदर प्रकाश, सूर्य देतो*


  *सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर*

  *चांदणे सुंदर, पडे त्याचे*


  *सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे*

  *किती गोड बरे, गाणे गाती*


  *सुंदर वेलींची, सुंदर ही फुले*

  *तशी आम्ही मुले, देवा तुझी*


  *इतुके सुंदर, जग तुझे जर*

  *किती तू सुंदर, असशील*


🌹📚🌸🤹‍♂️📖🤹‍♀️🌸📚🌹


  *गीत : ग. ह. पाटील*  ✍

  *बालभारती पाठ्यपुस्तक*

  *स्वर : महेश हिरेमठ आणि*

  *शुभांगी जोशी*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२७.०१.२०२५-*


⚜🌸⚜🌺🌻🌺⚜🌸⚜

10 IITians जे *IIT ते आंतरिक शांती* पर्यंत भिक्षु बनले

 10 IITians जे *IIT ते आंतरिक शांती* पर्यंत भिक्षु बनले


सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य

 🚗 *सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य: न बसवल्यास होईल 10 हजारांचा दंड! जाणून घ्या किती खर्च येईल आणि कसे बसवायचे?*

महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्व जुन्या वाहनांना (1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे आवश्यक करण्यात आले आहे. 🛡️  


*🚦 नियम व अंतिम तारीख:*  

🔹 *HSRP बसविण्याची अंतिम तारीख:* 31 मार्च 2025  

🔹 नियम न पाळल्यास होऊ शकतो *₹10,000 चा दंड!* 💸  

🔹 *फिटमेंट सेंटरच्या सुविधेसाठी:* राज्यभर विविध तालुका व जिल्हा पातळीवर अधिकृत HSRP सेंटर उपलब्ध करण्यात आले आहेत.  


*💰 HSRP नंबर प्लेटचे शुल्क:* 

- 🏍️ *दुचाकी व ट्रॅक्टर्ससाठी:* ₹531  

- 🚜 *तिपहिया वाहनांसाठी:* ₹590  

- 🚗 *लाइट मोटार वाहनं, पॅसेंजर कार, मध्यम व जड व्यावसायिक वाहनांसाठी:* ₹879  

(या शुल्कात 18% GST व स्नॅप लॉक समाविष्ट आहे.)  


🤷🏻‍♀️ *शुल्क नुसार मिळणाऱ्या सुविधा:*  

- युनिक होलोग्राम स्टिकर  

- लेसर ब्रँडेड आयडी  

- छेडछाड न होणारे स्नॅप लॉक  


*📌 HSRP नंबर प्लेटचे मुख्य फायदे:*  

✔️ *चोरी रोखण्यास मदत:** चोरी झालेल्या वाहनांची ओळख पटवणे सोपे.  

✔️ *सुरक्षितता:* छेडछाड-प्रतिरोधक तंत्रज्ञानामुळे वाहन संरक्षित राहते.  

✔️ *राष्ट्रीय सुरक्षा मजबूत:* डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होणे कठीण.  

✔️ *वाहन ओळख पद्धती सुधारली जाते:* डिजिटल रेकॉर्डमुळे गाडीचा मागोवा घेता येतो.  


*💻 अर्ज प्रक्रिया (ऑनलाइन आणि ऑफलाइन):* 


🤳🏻 *ऑनलाइन अर्ज कसा कराल?* 

1️⃣ *महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या:*  https://transport.maharashtra.gov.in

2️⃣ *वाहनाचा तपशील द्या:* 

- वाहन नोंदणी क्रमांक  

- वाहन मालकाचे नाव  

- वाहन प्रकार  

3️⃣ *शुल्क भरा:* ऑनलाइन पेमेंटद्वारे फीस भरा.  

4️⃣ *अपॉइंटमेंट बुक करा:* तुमच्या जवळच्या अधिकृत HSRP फिटमेंट सेंटरची निवड करा.  


📝 *ऑफलाइन प्रक्रिया:*  

- जवळच्या फिटमेंट सेंटरवर थेट जाऊन अर्ज करा.

- आवश्यक कागदपत्रे सोबत घ्या (वाहनाची आरसी, आधार वगैरे).  

- तिथेच शुल्क भरून नंबर प्लेट बसवा.  


*⏳ उशीर करू नका!*  


जर तुम्ही नियमानुसार HSRP बसवले नाही, तर:    

- ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाईल. 

- वाहन चोरीच्या वेळी ओळख करणे कठीण होईल.  


*🔑 HSRP नंबर प्लेट का अनिवार्य आहे?*  

- *राष्ट्रीय सुरक्षा:* देशभरातील वाहनांची ओळख एकसंध पद्धतीने करणे सोपे.  

- *डिजिटल रेकॉर्ड:* वाहनाच्या रजिस्ट्रेशनचा डेटाबेस तयार होतो.  

- *चोरी रोखणे:* चोरी झालेल्या वाहनांचे पुनर्प्राप्ती दर सुधारतो.  

- *वाहतूक नियंत्रण सुधारणा:* नियमांचे पालन सुलभ होते.  


🚘 _तुमचे वाहन सुरक्षित करा व दंड टाळा._  


🙏🏻 राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान द्या आणि आजच HSRP नंबर प्लेट बसवा! 🇮🇳

➖➖➖➖➖➖

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या

 क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना

अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 27 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्याअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला. 

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूस आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक व फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे

नदी प्रदुषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारावी

 नदी प्रदुषण कमी करण्यासाठी

अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २७ : राज्यातील नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात यावी. छोट्या छोट्या स्त्रोतांचे प्रदुषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडेक्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलमत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्यातील १०० पाणथळ जागांचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे व ब्रीफ डॉक्युमेंटशन करण्यात यावे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत २५ नवीन तलाव संवर्धन प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदावरीनमानी चंद्रभागा  अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात तसेच नमामी पंचगंगा कार्यक्रम राबविण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावा.

पर्यावरणविषयक तक्रारीत्यावरील कार्यवाहीसंदर्भात महापर्यावरण अॅप तयार करण्यात यावे. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदुषण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाकामेपरवाने यासंदर्भात डाटाबेस तयार करण्यात यावेअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

केंद्र शासनाने परिचित समुद्र किनाऱ्यांच्या निल ध्वज (ब्लू फ्लॅग) प्रमाणीकरणाचा महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. ब्ल्यू फ्लॅग हे जागतिक इको लेबल प्रमाणन मानांकन आहे. त्यामुळे या योजनेत राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात यावे. यामध्ये सिंधुदुर्ग येथील मेढा-निवतीरायगडमधील काशिदपालघरमधील डहाणूरत्नागिरीतील गुहागर आदींचा समावेश करून त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करावीअशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

            माझी वसुंधरा अभियानातील कामांचे मूल्यांकन व परिक्षण करणेसीआरझेड अधिसूचनेअंतर्गत नवीन किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा नकाशे अंतिम करणेपर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विभागीय स्तरावर स्थानिक तज्ञांचा समावेश असलेली पर्यावरण रिसोर्स सेल तयार करणे हरित कार्यक्रमास मंजुरी घेणे आदी विषयी शंभर दिवस आराखड्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीमदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठीवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयमत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

०००० be

फेब्रुवारीत दोन दिवसीय 'मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे' आयोजन

 फेब्रुवारीत दोन दिवसीय 'मुंबई शहर ग्रंथोत्सवाचेआयोजन

 

मुंबई दि.२७ : राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत  प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्याचा 'मुंबई शहर ग्रंथोत्सव' ५ व ६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयदादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात झाली.

या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकडग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील,  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडेकार्यवाह उमा नाबरकार्याध्यक्ष शीतल करदेकर, शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी विजय सावंतबृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सुनील कुबलव‌ अध्यक्ष दिलीप कोरेअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळेमुंबई साहित्य संघाच्या प्रतिनिधी प्रतिभा बिश्वासमनपा शिक्षक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल व शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधी साधना कुदळेपी. पी गायकवाड,सुनिल आग्रेभगवान परब आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ दिंडीचर्चासत्रपरिसंवाद,व्याख्यानलेखक आपल्या भेटीला असे दर्जेदारप्रबोधनात्मकमनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य जगतातील लेखकसाहित्यिकांच्या ग्रंथसंपदेसाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. यावेळी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहेअशी माहिती बैठकीत देण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाचनसंस्कृती जोपासण्याची गरज आहे. विशेषत: लहान शाळकरी मुलामुलींमध्ये वाचनसंस्कृती रूजवण्याची आवश्यकता आहे. ई-बुक सुविधाही आता उपलब्ध झाली आहे. काळानुरूप बदलले पाहिजे. प्रत्येकाचे वाचन वाढले पाहिजे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेवून लोकसहभाग वाढवावा. तरुण पिढीसाठी ज्ञानाचा संगम आणि वाचनाची उर्जा मिळावी यासाठी ग्रंथोत्सव हा 'लोकोत्सव व्हावा', अशा सूचना मान्यवरांनी मांडल्या.

000

योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य महत्वाचे

 योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे

विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य महत्वाचे

- न्यायमूर्ती एन. जे जमादार

विधी सेवा शासकीय योजनांचे महा शिबिर

 

मुंबईदि. २७ : विधी सेवा ही केवळ न्यायालयात वकील देण्यापुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती संविधानातील कक्षेप्रमाणे सामाजिकआर्थिक व राजकीय न्याय देणे अशी व्यापक आहे. केवळ योजनांची माहिती देऊन विधी सेवा प्राधिकरणांचे कार्य संपणार नसून या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचवणे हे देखील महत्त्वाचे कार्य आहे,असे प्रतिपादन न्यायमूर्ती एन .जे. जमादार यांनी केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणसर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा विधि सेवा प्राधिकरण तसेच मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई व मुंबई विद्यापीठ पदवीदान सभागृह येथे विधी सेवा व शासकीय योजनांचे महा शिबिर झाले. यावेळी न्यायमूर्ती एन. जे. जमादार आणि न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

न्यायमूर्ती ए. एस. गडकरी म्हणाले की, " जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी अधिकार मित्रामार्फत विविध शासकीय योजनांचे लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवावेत.

न्यायालय नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. त्याचप्रमाणे प्राधिकरणाने देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

न्यायाधीश व विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात केली.  रॅलीला न्यायमूर्ती श्री.  गडकरी व न्यायमूर्ती श्री. जमादार यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर महा शिबिरातील विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. या महाशिबिरामध्ये मुंबई शहर व उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नगर दिवाणी व सत्र न्यायालय वकील संघमुंबई जिल्हा शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील समाज कल्याणमहिला व बालविकास तसेच विविध विभागामार्फत लोककल्याणकारी योजनांची स्टॉल लावून माहिती देण्यात आली.

 यावेळी विविध संस्थांनी देखील शिबिरात सहभाग घेत त्यांच्या कामाची माहिती दिली. शिबिराच्या उद्घाटनानंतर न्यायमूर्ती श्री. जमादार व श्री. गडकरी यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले.

यावेळी मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नगरदिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यममुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रधान न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय मंगला ठाकरेमुंबई शहर व उपनगरचे सचिव अनंत देशमुखसतीश हिवाळेनगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीशमुंबई येथील न्यायाधीन न्यायाल मुंबई येथील न्यायदंडाधिकारी नगर दिवाणी व सत्र न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रवी जाधव व शासकीय विभागातील कर्मचारीलाभार्थी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी (सामान्य प्रशासन) उप जिल्हाधिकारी गणेश सांगळेसहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनारमहिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलारजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व नगर दिवाणी व सत्र न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

000

Featured post

Lakshvedhi