🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*२/२*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*'बालभारती'*
*स्थापना दिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌹⚜️🌹🤹♂️📚🤹♀️🌹⚜🌹
*बालभारती. महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेले बालजीवन समृद्ध करुन शिक्षणासाठी प्रवृत्त करणारे नाव.*
*बालभारतीच्या मुखपृष्टावरील मोठ्या औत्सुक्याने पुस्तक वाचणारी ती दोन मुलं बघून आजही सर्वांच्या मनात निरागस शाळकरी मुलांची आठवण जागी होते. त्या बालवयात रंगांचं, गंधाचं.. अक्षराचं, चित्रांचं सगळंच अप्रुप असतं. हे बालभारतीला चांगलच ज्ञात होते. बालकांना शिक्षणाची गोडी लावून ज्ञानाची जिज्ञासा निर्माण करण्याचे कार्य बालभारती एवढी वर्षे अव्याहत करतेय* .
*एक काळ होता जेव्हा वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळी पुस्तके अभ्यासक्रमात होती. त्याच्या किमतीवरही बंधने नव्हती. यात एकसुत्रता आणण्याची शिफारस कोठारी आयोगाने केली. त्याप्रमाणे २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र शासनाने 'पाठ्य पुस्तक निर्मिती' आणि 'अभ्यासक्रम संशोधन मंडळ' अंतर्गत 'बालभारती' स्वायत्त मंडळ निर्माण केले.*
*बालभारती चे इयत्ता पहिलीचे पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाले. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम बालभारतीच्या विद्या विभागात चालते. विद्या विभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण १४ विभाग आहेत. तर किशोर मासिक पण प्रकाशित होत आहे.*
*शिक्षणाचा श्रीगणेशा आईकडून होतो. बालभारतीने जणू जगातला सगळा खजिनाच हळुवार पणे बालबुद्धीला झेपेल अशा पद्धतीने बहाल केला. १४ विद्या ६४ कलांची किमान ओळख होते ती बालभारती मुळे. बालभारतीच पाठ्य पुस्तक हाती पडताच जो आनंद होतो नां.. तो कशातही नाही. समाजात जाती, धर्म, भेद दूर करण्यात बालभारतीचे मोठे योगदान आहे.*
*छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, समर्थ रामदास, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, क्रांतिकारक इ. यांच्या बद्दल बालभारतीने जे काही शिकवले त्यानेच आज महाराष्ट्र महान आहे.*
*जीवनात ज्याला सकारात्मक दृष्टी लाभली तो भाग्यवानच. मग त्याला हे जग किती सुंदर आहे हे जाणवते. बालकांचे मन तर अतिशय पापभीरु.. मुलायम.. निर्मळ. या संस्कारक्षम वयातच काय रुजवायचे हे ठरवावे लागते.*
*जेव्हा चांगले साहित्य वाचनात येते तेंव्हा नकळत निसर्गाविषयी कृतज्ञता भाव निर्माण होतो. मुख्य म्हणजे हे वसुंधरेचे वैभव ही परमेश्वर कृपा हा आमचा कृतज्ञता भाव. हेच संस्कृती संस्कार बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील या बालगीतातही व्यक्त होतात.*
*बालभारतीची यशस्वी वाटचाल अशीच पुढे जात राहो हीच शुभेच्छा !!*
🌹⚜️🌹👩🎓📖👩🎓🌹⚜️🌹
*देवा तुझे किती, सुंदर आकाश*
*सुंदर प्रकाश, सूर्य देतो*
*सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर*
*चांदणे सुंदर, पडे त्याचे*
*सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे*
*किती गोड बरे, गाणे गाती*
*सुंदर वेलींची, सुंदर ही फुले*
*तशी आम्ही मुले, देवा तुझी*
*इतुके सुंदर, जग तुझे जर*
*किती तू सुंदर, असशील*
🌹📚🌸🤹♂️📖🤹♀️🌸📚🌹
*गीत : ग. ह. पाटील* ✍
*बालभारती पाठ्यपुस्तक*
*स्वर : महेश हिरेमठ आणि*
*शुभांगी जोशी*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-२७.०१.२०२५-*
⚜🌸⚜🌺🌻🌺⚜🌸⚜
No comments:
Post a Comment