Saturday, 25 January 2025

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार

 देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह

 

मुंबईदि. २४ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पाले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा रंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री श्री.शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय सहकार व   नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळसहकार मंत्री बाबासाहेब पाटीलसहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयरकेंद्रीय सचिव आशीष बुधानीपंकज बन्सलतसेच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच संपूर्ण देशभरातून सहकार चळवळीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटननव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ दरम्यानच्या उपक्रमाचे वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.

केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमित शाह म्हणाले कीअम्ब्रेला संगटनामुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्षेत्राला फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय आणि खागी बँकेमध्ये सेवा मिळतातअगदी त्याचप्रमाणे सहकारी बँकेद्वारे सेवा मिळतील. यासाठी सहकारी बँकेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे. आज एक हजार ४६५ सहकारी अर्बन सहकारी बँका असून त्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. आगामी काळात वित्तीय व्यवहार हा सहकारी बँकामार्फत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवीन पिढीने त्याबातचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहेप्रत्येक गावात रोजगार निर्माण करावयाचा असेल तर सहकार क्षेत्राला नवीन आयाम देणे आवश्यक आहे. भारत सरकारने साखर उद्योगासाठी १० हजार करोड रूपयांचा इन्कम टॅक्स माफ केला आहे. काही वाद राहू नये यासाठी कायद्यात सुद्धा सुधारण केली असल्याचे त्यांनी सांगितले. दहा लाख टन साखर निर्यातीमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. आगामी काळात सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प केला असल्याचेही श्री.शाह यांनी सांगितले.

महापारेषणमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

 महापारेषणमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

 

मुंबईदि. २४ : शासकीय कामकाजाबरोबरच दैनंदिन व्यवहारातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर करावा. तसेच मराठी संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे येथील ‘प्रकाशगड’ येथील सभागृहात आयोजिलेल्या अभिजात मराठीअभिमान मराठी’ या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात श्री.सुगत गमरे बोलत होते. यावेळी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाणसंचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकरमुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती अंजू गुप्तामुख्य अभियंता श्रीमती जुईली वाघश्री. सुनील सूर्यवंशीमुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसेमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाडमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. मंगेश शिंदेमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटीलमुख्य विधी सल्लागार डॉ. कीर्ती कुळकर्णीमराठी भाषा समन्वय अधिकारी श्री. नितीन कांबळेउपमहाव्यवस्थापक (मा.सं. आस्थापना) श्री.अभय रोही उपस्थित होते.

श्री. सुगत गमरे म्हणाले, ‘मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनातही मराठीचा वापर करावा. मराठी भाषे


एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

 एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

२५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

 

मुंबईदि. २४ : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहे.

            वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेलचेसीसटायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला. मागील भाडेवाढ दिनांक २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी करण्यात आली होती.

मोटार वाहन अधिनियम१९८८ च्या  तरतूदीनुसार शासनाने राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणमहाराष्ट्र राज्य यांची २७६ वी बैठक  अपर मुख्य सचिवगृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्षराज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी झाली. सदर बैठकिस राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) व  परिवहन आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीत  महामंडळाच्या पर्यावरणपूरक नविन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी  पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरी प्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे  रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास  नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आलीअसे राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी कळविले आहे.

 अशी आहे भाडेवाढ

सेवेचा प्रकार :  साधी बस - सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.७५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.२० रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.९० रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर(वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.३५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २१.२५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये,

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २५.३५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.८० रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपयेदिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.१५ रुपयेप्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

000

 


महापारेषणमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

 महापारेषणमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

 

मुंबईदि. २४ : शासकीय कामकाजाबरोबरच दैनंदिन व्यवहारातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर करावा. तसेच मराठी संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन महापारेषणचे संहखचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे येथील ‘प्रकाशगड’ येथील सभागृहात आयोजिलेल्या अभिजात मराठीअभिमान मराठी’ या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात श्री.सुगत गमरे बोलत होते. यावेळी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाणसंचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकरमुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती अंजू गुप्तामुख्य अभियंता श्रीमती जुईली वाघश्री. सुनील सूर्यवंशीमुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसेमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाडमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. मंगेश शिंदेमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटीलमुख्य विधी सल्लागार डॉ. कीर्ती कुळकर्णीमराठी भाषा समन्वय अधिकारी श्री. नितीन कांबळेउपमहाव्यवस्थापक (मा.सं. आस्थापना) श्री.अभय रोही उपस्थित होते.

श्री. सुगत गमरे म्हणाले, ‘मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनातही मराठीचा वापर करावा. मराठी भाषेच्या प्रसारासाठी महापारेषणने म्हणी स्पर्धाचरित्रवाचन स्पर्धावादविवाद स्पर्धा आयोजित केल्याहे कौतुकास्पद असून या सांस्कृतिक कलागुणांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते.

 यावेळी नाट्यअभिनेत्री श्रीमती मधुरा वेलणकर-साटम यांचा अस्सल मराठमोळा मधुरव (बोरू ते ब्लॉग) हा दर्जेदार कार्यक्रम घेण्यात झाला. 

मराठी भाषा समन्वय अधिकारी तथा उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नितीन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्री. रितेश चौधरी व श्रीमती प्राजक्ता मदाने यांनी केले. श्री.महेश आंबेकर यांनी आभार मानले.

 

महापारेषण मध्ये नावीन्यपूर्ण संकल्पनांवर भर

             महापारेषणमध्ये विविध नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यामध्ये संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे नेहमी अग्रेसर असतात. दरवर्षी मराठी भाषा दिनाला विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. विशेषतः महापारेषणच्या वर्धापनदिन अनोख्या पध्दतीने करण्यावर श्री. गमरे यांचा विशेष भर असतो. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली व संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महापारेषण’ने विविध पुरस्कार मिळविले आहेत.

 

स्पर्धांचे निकाल :

मराठी म्हणी स्पर्धा : अनिक मांढरे (प्रथम)पराग पाटील (व्दितीय)

चरित्र वाचन स्पर्धा : सीमा डुबेवार (प्रथम)रितेश चौधरी (व्दितीय)

वादविवाद स्पर्धा : माहिती व तंत्रज्ञान विभाग (प्रथम)तांत्रिक विभाग-२ (व्दितीय)

उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुतीकरिता राज्यपालांकडून मुंबई विद्यापीठाला बक्षीस; दोन महाविद्यालयांना देखील बक्षीस जाहीर राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

 उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुतीकरिता राज्यपालांकडून मुंबई विद्यापीठाला बक्षीस;

 दोन महाविद्यालयांना देखील बक्षीस जाहीर

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरानगर हवेली,

दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

उत्तर प्रदेशची भूमी संपूर्ण देशाकरिता वंदनीय

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

मुंबई, दि. २४ : उत्तर प्रदेश राज्याचे तसेच दमणदीवदादरा - नगर हवेली केंद्र शासित प्रदेश येथील लोकजीवन व  संस्कृतीचे रागताल व नृत्याच्या माध्यमातून जिवंत दर्शन घडविल्याबद्दल राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाला २५००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. यावेळी सांस्कृतिक सादरीकरणात सहभागी तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय व वाडा येथील डॉ शांतीलाल धनजी देवशी महाविद्यालय यांना देखील राज्यपालांनी प्रत्येकी २५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 

            ­‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजभवन येथे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत  शुक्रवारी (दि. २४) उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दादरानगर हवेलीदमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आलात्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी बक्षीस जाहीर केले.

उत्तर प्रदेश भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. उत्तर प्रदेश ही अयोध्येमुळे प्रभू श्री.रामाचीमथुरेमुळे भगवान श्री.कृष्णाची तर काशीमुळे भगवान शिवाची भूमी असल्याचे सांगून गंगेच्या किनारी वेदांचा उगम झाला असल्याची मान्यता असल्यामुळे उत्तर प्रदेशची भूमी संपूर्ण देशाकरिता वंदनीय आहे असे राज्यपालांनी सांगितले. उत्तर प्रदेशाचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजकीय विकासात अविस्मरणीय योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश तसेच दमण-दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील अनेक लोक आज महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक व औद्योगिक विकासात योगदान देत असल्याबद्दल राज्यपालांनी प्रशंसोद्गार काढले.

देश प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरे करीत असताना उत्तर प्रदेश आपला ७५ वा राज्यस्थापना दिवस साजरा करीत आहे तसेच 'जन गण मनहे भारताचे राष्ट्रगीत होण्याला देखील ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

            भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला उत्कृष्ट राज्यघटना लाभली. विविध कारणांमुळे इतर देशांचे विभाजन झाले तरीही भारत मात्र एकसंध आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 

'एक भारत श्रेष्ठ भारतकार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे लोकांचा इतर राज्यांप्रती व तेथील सांस्कृतिक मूल्यांप्रती आदर वाढत आहे. संबंधित राज्यांची भाषालोककलाजीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केंद्र शासित प्रदेशांचे तारपा नृत्यउत्तर प्रदेशचे राज्यगीतचारकुला नृत्यभक्तीगीत व कव्वाली सादर केले. तेजल चौधरी या विद्यार्थिनीने कथक व ठुमरी सादर केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन केल्याबद्दल राज्यपालांनी ऋषभ उपाध्याय विद्यार्थ्याला कौतुकाची थाप दिली तसेच रांगोळी कलाकार विलास राहाटे याला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

 

राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले तर अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन मानले.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे  प्रकुलगुरु अजय भामरे,  विद्यार्थी कल्याण संचालक डॉ सुनील पाटीलसंस्कृत संयोजक निलेश सावेविद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष" · वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस


मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात

"मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष"

·         वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीअर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस

 

मुंबईदि. 24 : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासननिर्णय काढण्यात आला आहे.

या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेअसे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

*कामकाज  अधिक सुलभ व पेपरलेस*

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज  अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे.

*जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू*

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत केली जाते. या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे सहज सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करुन देणे व समस्यांचे निराकरण करणेकक्षामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणेमुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणेमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणेजिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसाहाय्याची रक्कम  नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्थसाहाय्याच्या रकमेचा देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.

*अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशीलसोपी होणार*

मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) एकत्रित जोडण्यात येणार आहेत. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशीलसोपी होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईलअशी अपेक्षा व्यक्त करत असताना कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावाअसे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे

Friday, 24 January 2025

प्रभादेवी येथे ‘ माय मराठी अभिजात मराठी’ कार्यक्रम उत्साहात

 प्रभादेवी येथे ‘ माय मराठी अभिजात मराठी’ कार्यक्रम उत्साहात


मुंबई. दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त प्रभादेवी, मुंबई येथील करिष्मा सभागृहात 'माय मराठी अभिजात मराठी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


प्रास्तविकात भाषा संचालक विजया डोनीकर यांनी भाषा संचालनालयाची महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच भूमिका व भविष्यातील दिशा त्याचबरोबर यावर्षीच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय 'मराठी भाषा : रोजगाराच्या संधी' हे आशयसूत्र घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर '३६ जिल्हे ३६ मार्गदर्शन सत्रे' हा आगळा-वेगळा उपक्रम राबवीत असल्याचेही सांगितले.


 त्यानंतर डॉ.अपर्णा बेडेकर यांनी संत साहित्यातील मराठीचा भाषिक अंगाने मागोवा घेतला. संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत कलेच्या अंगाने मराठी भाषेच्या संबंधातून भाषिक विकासाचा पट प्रेक्षकांसमोर उलगडला. कवी प्रवीण दवणे यांनी अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. भावगीते व अभंग शार्दुल कवठेकर व संजना अरुण यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान यांनी केले.


कार्यक्रमाचे सादरीकरण हे उत्तरा मोने यांच्या मिती ग्रुपमार्फत करण्यात आले. सहायक भाषा संचालक संतोष गोसावी यांनी आभार मानले.


0000

Featured post

Lakshvedhi