Wednesday, 22 January 2025

राज्यातील फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरावी

 राज्यातील फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी

जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरावी

पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 22 : राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

 आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीस आशियाई विकास बँकेचे संचालक टाकेशी उएडा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदममॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरेअतिरिक्त प्रकल्प संचालक अमोल यादवपणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पणनमंत्री श्री. रावल म्हणाले, प्रमुख 14 फळपिके आणि सर्व प्रकारची फुल पिकांचे उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण होण्यासाठी समाजमाध्यमांच्या वापराबरोबरच स्थानिक भाषेचा उपयोग करून प्रसिद्धी करावी. तसेच याकामी कृषी स्नातक महाविद्यालयाबरोबरच विद्यार्थ्यांचा मार्केटिंगसाठी सहभाग करून घेण्यात यावा. तसेच निर्यात करताना प्लास्टिकचा वापर न करता जैव विघटनशील साहित्याचा वापर करावाअसे निर्देशही श्री.रावल यांनी दिले.

फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मूल्य साखळीत खासगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजेअसे सांगून श्री.रावल म्हणाले कीफळे आणि भाजीपाल्यांचे नुकसान कमी होणे आणि साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मॅग्नेट प्रकल्पाचे उद्देश साध्य करण्यासाठी उत्पादक तसेच उद्योजकांना संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्यपायाभूत सुविधा उभारणीसाठी सहाय्यमध्यम मुदत कर्ज आणि खेळते भांडवल पुरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पणन मंत्री श्री.रावल म्हणाले कीउत्तम कृषी पद्धतीत पीक उत्पादन क्षेत्रामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्यात यावे. केळीच्या खोडापासून ऍक्टिव्हेटेड कार्बन आणि बायोचार संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. राज्यातील प्रमुख फळपिकांच्या निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा शोधण्यासाठी तज्ञांचे सहकार्य घ्यावेअशाही सूचना यावेळी श्री.रावल यांनी केल्या.

मॅग्नेट प्रकल्पाबाबत श्री.रावल म्हणाले कीया प्रकल्पासाठी 1100 कोटी रुपयाची तरतूद असून हा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 6 वर्षासाठी सन 2021- 22 ते 2027- 28 पर्यंत राबविला जाईल. याबाबत आशियाई विकास बँककेंद्र व राज्य शासन यांच्यामध्ये करार झाला असून यामुळे पिकांची गुणवत्ता व अन्न सुरक्षितता मानकाच्या अवलंबामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना 10 टक्के वाढीव किंमत मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

000

प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर सामाजिक न्याय विभागाचा "घर घर संविधान" उपक्रम

 प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर

सामाजिक न्याय विभागाचा "घर घर संविधान" उपक्रम

 

मुंबईदि. 22 : भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन 2024-25 पासून "घर घर संविधान" उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत  प्रजाकसत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दि. 26 जानेवारी 2025 रोजी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व आस्थापनांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.

 भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये शालेयमहाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक,माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिकबिगर व्यावसायिक महाविद्यालयशैक्षणिक संकुलेशासकीय वसतीगृहनिवासी शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानितविनाअनुदानितस्वयं अर्थ सहाय्यित शाळा, आश्रमशाळाशासकीय वसतीगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थामहाराष्ट्र विधान परिषदविधानसभा अशा सर्व ठिकाणी ‘घर घर संविधान’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दि. 26 नोव्हेंबर 2024 ( संविधान दिवस) पासून हा उपक्रम राबविण्यात येत  आहे. या उपक्रमांतर्गत विविध शाळामहाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचेव्याख्यानरॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन  राज्यभरात करण्यात आले  आहेअशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

****

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण’

 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त

ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण

 

मुंबई, दि. 22 : मराठी भाषा विभागाच्यावतीने 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्तमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार विष्णू नारायण भातखंडे या पुस्तकावर ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण’ हा कार्यक्रम गुरुवारदिनांक 23 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, न्यू मिनी थिएटर, 5 वा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक रामदास भटकळसारंगी आंबेकरनिसर्ग देहूक्करज्ञानेश्वर सोनावणे व जयंत नायडू यांचा सहभाग असणार आहे. तसेच  अभिजात मराठी अभिमान मराठी’ लेखकगायक डॉ.आशुतोष जावडेकर यांचा भावसंवाद कवितागाणीअभिवाचन आणि मनसोक्त गप्पा… हा कार्यक्रम शुक्रवारदिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 05.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम डॉ.आशुतोष जावडेकर सादर करणार आहेत.  मंडळाने आयोजित केलेले वरील दोन्ही कार्यक्रम सर्वांकरिता मोफत खुले असून सर्वांनी सदर कार्यक्रमांचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी  केले आहे.


संत्रावर्गीय फळ पिकाच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाखाची मदत देण्यास राज्य शासनाची मंजुरी -

 संत्रावर्गीय फळ पिकाच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस

विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाखाची मदत देण्यास राज्य शासनाची मंजुरी

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

 

मुंबईदि. २२ :- वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ऑगस्ट २०२४ मध्ये  ढगाळ वातावरण आणि जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अमरावतीअकोला व बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यास विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजाराची मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खचला जातो. या नुकसानग्रस्त  शेतकऱ्याला आधार व दिलासा  देण्यासाठी  शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे ऑगस्ट २०२४ कालावधीत ५ हजार ९३३ शेतकऱ्यांचे ३०१३.८५ हेक्टर  क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब  म्हणून १०८४.९८ लाख रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे. 

तसेच, जुलै ते ऑगस्ट २०२४ कालावधीत अमरावती जिल्ह्यातील  ४१ हजार ९११ शेतकऱ्यांचे ३७३९३.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १३४६१.८३ लाख रुपयेअकोला जिल्ह्यातील  ३ हजार ४३३ शेतकऱ्यांचे ३०२९.५० हेक्टर  क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०९०.६२ लाख रुपयेबुलढाणा जिल्ह्यातील ३ हजार ८५२ शेतकऱ्यांचे २६२६.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून ९४५.६५ लाख रुपयांची मदतीस विशेष बाब  म्हणून मंजुरी दिली आहे.

एसटी बसस्थानकांवर " हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान " राबविणार..!

 एसटी बसस्थानकांवर " हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,

सुंदर बसस्थानक अभियान " राबविणार..!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

३ कोटी रुपयांची बक्षिसेराज्यात प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस

 

मुंबईदि. २२ : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून " हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छसुंदर बसस्थानक अभियान " राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात अ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहेअशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या अभियानाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी मंत्री श्री. सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर सकाळी ११ वाजता होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थीसामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

 मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विषद करतानासर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले होते.

तसेच " आपलं गावआपलं बसस्थानक " या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य " गाभा " राहणार आहे. हे देखील आवर्जून सांगितले होते. अर्थातकोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्याअर्थाने बसस्थानक हे त्या गावची " शान " असल्यामुळे गावातील तरुण मंडळेमहिला बचत गटविविध सामाजिक संस्थाउद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यींकरणासाठी मदत करावीअसे आवाहन मंत्री श्री. सरनाईक यांनी केले आहे.

वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर ३ महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बसस्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बसस्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी अ वर्गनिमशहरी ब वर्ग व ग्रामीण क वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिलादुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर अ 'वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये ब वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर क वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

केईएम रुग्णालय मुंबईकरांचे आधारवड रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश




 केईएम रुग्णालय मुंबईकरांचे आधारवड

रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे

झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 22 : रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतोअशी भावना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात व्यक्त केली.

            सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरआमदार कालिदास कोळंबकरसुनील शिंदेमुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त विपिन शर्माकेईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीकेईएमने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचेनर्सेसचेकर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहातम्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहेअसे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

सेवाभाव हा परमभाव आहेअसे आपली संस्कृती सांगते. डॉक्टर देखील वैद्यकीय क्षेत्रात येताना सेवाधर्माची शपथ घेतात. ही शपथ घेऊनच ९९ वर्षांपूर्वी हे हॉस्पिटल उभे राहिले. आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांना आधार देत उभे आहेअसेही श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेघरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो. आपुलकी असतेतशीच भावना केईएम बद्दल आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेनं सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. आज केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. सांस्कृतिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएमने धरलीये. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

केईएम सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत.  अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली.जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे असे उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येते ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचे कितीतरी नामवंतदिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी काढले.

भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात १९६८ मध्ये झाली. त्यानंतर २०२४ रोजी यशस्वी हार्ट ट्रान्सप्लाण्ट येथे करण्यात आले. अवयवदानामध्ये वाखाणण्यासारखे कार्य केल्याबद्दल केईएम रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबीही केईएम रुग्णालयात १९८७ साली डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया करण्यात येतात. वैद्यकीय क्षेत्रात केईएमने केलेली ही क्रांती ऐतिहासिक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केईएमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्याहस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनीकचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत.त्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे शासनाच्यावतीने आभार मानतो. केईएमचे शताब्दी महोत्सव वर्षे पुढील पिढीसाठी खुप काही देण्यासाठी पायाभरणीचे ठरेलयात तीळमात्र शंका नाहीअसेही ते म्हणाले.

रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी त्याचबरोबर रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करतानाच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात 

स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जॅान डी रॅाकफेलरएक_सत्य_घटना....

 एक_सत्य_घटना....

कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल.... 


स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जॅान डी रॅाकफेलर…


जगात आज अनेक अरबपती असतील, पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला तो रॅाकफेलर मुळे..! प्रचंड श्रीमंत माणूस... जगातील पहिला अरबपती...! रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मित्र, सगेसोयरे फक्त पैसा...


घटना अशी घडली 1893 साली वयाच्या 53 व्या वर्षी हा माणूस आजारी पडला. डोक्यावरचे सारे केस झडून गेले. शरीर गळायला लागलं. अन्न गिळता येईना, थोडसं सुप पिऊन जगण्याची वेळ आली. त्याला झोपही लागत नव्हती,इतकच नाही तर त्याला हसता रडता देखील येईना. अमेरीकेतील सर्व नामवंत डॅाक्टरना दाखवून झाले पण उपयोग शुन्य.. डॅाक्टरनी शेवटी सांगितले आपण फक्त एक वर्षाचे पाहुणे आहात.


त्याचवेळी स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये होते. 


आणि रॅाकफेलरच्या एका मित्राने सहजच एक सल्ला दिला की, हिंदुस्थानांतील एक संन्यासी इथे आलाय, आपण एकदा त्यांची भेट घ्यावी..! रॅाकफेलर सुरवातीला भडकला "असल्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही, तो संन्यासी काय करणार आहे " म्हणून त्याने टाळले. पण काय कुणास ठाऊक दोन दिवसांनी तो भेटीला निघाला. 


स्वामी विवेकानंद हॅाटेलच्या रुममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते. रॅाकफेलर जाऊन थांबले. रॅाकफेलरला अपेक्षा होती मी एवढा मोठा माणूस माझ्यासाठी मोठं आदरातिथ्य होईल पण विवेकानंदानी ढुंकूनही पाहिलं नाही. शेवटी रॅाकफेलर म्हणाला मी उद्योजक रॅाकफेलर …

स्वामी म्हणाले, "बरं...मग"

"मला पाहून इथला राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभा राहतो"- इति रॅाकफेलर

" असं आपलं काम सांगा" स्वामी विवेकानंद

शेवटी स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. 

"तुम्ही मनाने फार बैचैन आहात" आणि मग त्याच्या जीवनातील अशा काही घटना सांगितल्या की, ज्या त्याच्याशिवाय कुणाला माहिती नव्हत्या. तो ही हैराण झाला. एक तासांच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदानी त्याना सांगितलं की यावर एकच पर्याय आहे, तुम्ही दानधर्म केला पाहिजे. 


रॅाकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पडला, की त्याने एक फाउंडेशन काढलं, त्यातुनच पुढे मलेरिया, टीबी, यासारख्या अनेक रोगांवर औषध बनवून मोफत उपचार  झाले, तो जगातील सर्वात मोठा दानशूर माणूस झाला.


पुढे??? आश्चर्य हे झाले ज्याला एक वर्षाची मुदत डॉक्टरांनी  दिली होती तो रॅाकफेलर 98 वर्षे जगला तोही आनंदात... 


आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे, बील गेट्स तो त्याच्या पुस्तकात लिहीतो, मला डोनेशनची प्रेरणा रॅाकफेलर फाउंडेशन मुळे मिळाली.


मित्रानो ही आहे एका हिंदू संन्याशाची व हिंदू तत्त्वज्ञानाची किमया, आणि आम्ही मात्र आज त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतो, आपली ताकद ओळखा आणि भौतिक सुखाच्या मागे लागून पैसा हे सर्वस्व आहे हे समजु नका, वेळ आली ना कि तोहीं कामाचा नाही.


आणि मुख्य म्हणजे द्यायला शिका...

*द्याल तरच मिळत जाईल,*

*साठवाल तर सडायला सुरवात होईल..!*

Featured post

Lakshvedhi