Wednesday, 22 January 2025

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण’

 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त

ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण

 

मुंबई, दि. 22 : मराठी भाषा विभागाच्यावतीने 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्तमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार विष्णू नारायण भातखंडे या पुस्तकावर ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण’ हा कार्यक्रम गुरुवारदिनांक 23 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, न्यू मिनी थिएटर, 5 वा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक रामदास भटकळसारंगी आंबेकरनिसर्ग देहूक्करज्ञानेश्वर सोनावणे व जयंत नायडू यांचा सहभाग असणार आहे. तसेच  अभिजात मराठी अभिमान मराठी’ लेखकगायक डॉ.आशुतोष जावडेकर यांचा भावसंवाद कवितागाणीअभिवाचन आणि मनसोक्त गप्पा… हा कार्यक्रम शुक्रवारदिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 05.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम डॉ.आशुतोष जावडेकर सादर करणार आहेत.  मंडळाने आयोजित केलेले वरील दोन्ही कार्यक्रम सर्वांकरिता मोफत खुले असून सर्वांनी सदर कार्यक्रमांचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी  केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi