Tuesday, 21 January 2025

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे

 क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे

                                     -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईदि. 20 एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी  क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावेअसे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी " महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज " ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.

            मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की ,  एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरीनिम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे.  बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानकेआगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत.  त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100  खाटांचे अद्ययावत रुग्णालयइलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनरेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.

यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी  सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेतअसे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष  डॉमनिक रोमेल  व इतर पदाधिकारीविकासकवास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

 


देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व विशेष कौतुक मुंबई, दि. 20 :- नवी

 देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या

पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व विशेष कौतुक

 

मुंबईदि. 20 :- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड तरप्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्याकडे असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला.  विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटेअनिकेत पोटेआदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदेकु. रेश्मा राठोडवैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोलेमहिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००००

Aadhaar Face Authentication transactions crosses 100 crore landmark, doubles in five months

 UIDAI conducts stakeholders meet with BFSI, Fintech and Telcos to further enhance smooth service delivery

Aadhaar Face Authentication transactions crosses 100 crore

 landmark, doubles in five months

Nearly 500 industry representatives came together for Aadhaar Samvaad, co-hosted by Govt of Maharashtra

 

Mumbai 20: The Unique Identification Authority of India concluded a day-long stakeholders meet with industry leaders from sectors like BFSI, Fintech and Telecom to deliberate and further enhance service delivery by using Aadhaar.

Nearly 500 senior policy makers, industry leaders, experts, technocrats, from banks, insurance companies, NPCI, market intermediaries, telecom service providers, Fintech  players etc came together for the ‘Aadhaar Samvaad’ co-hosted by Govt of Maharashtra.

 

100-crore Aadhaar’s Face Authentication transactions

 

The event also marked a milestone – Aadhaar’s Face Authentication transaction numbers have crossed the 100-crore mark since it was first introduced in October 2021. The AI/ML based face authentication solution, developed in house by UIDAI, has been witnessing a massive growth in the past year. The cumulative face authentication transactions doubled from 50 crore to 100 crore in around 5 months.

 

Addressing the stakeholders meet, S Krishnan, Secretary, Ministry of Electronics and Information Technology (MeitY) underlined the population scale usage of Aadhaar and how Aadhaar is the foundational layer of India’s digital public infrastructures (DPIs). He encouraged UIDAI to continue working with all the stakeholders for empowering more and more people, and further enhancing Ease of Living.

Bhuvnesh Kumar, CEO, UIDAI emphasized the transformative role of Aadhaar in fostering trust in digital transactions. He said UIDAI has always stayed aligned with the growth path of the country and aspirations of its people.

 

Chairman, UIDAI Neelkanth Mishra and CEO, UIDAI underlined the population scale use of Aadhaar and its immense potential.

 

The achievement of 100 crore face authentication transactions reaffirmed Aadhaar’s position as the backbone of India’s digital identity ecosystem. As a resident centric organisation, our vision is to make life easier for Aadhaar number holders by facilitating smooth delivery of services, Kumar stated. He thanked the Government of Maharashtra for co-hosting the event at Mumbai.

 

This stakeholders’ meet encompassing four focused panel discussions brainstormed ideas, building frameworks and improving user journey. Led by industry leaders, these panel discussions revolved around integrating Aadhaar face authentication for better banking services, enhancing ease of service delivery by NBFCs and Fintechs and further improving Aadhaar authentication experience at telecom service providers The panel also brainstormed ideas around a safer digital future.  The actionable inputs will be considered for service improvement.

 

This is the second episode of the Aadhaar Samvaad series; the first one was conducted in Bengaluru in November.

 

Face Authentication Landmark:

This landmark achievement of 100 crore face authentication transactions underscores the trust and adoption of this new biometric authentication modality across diverse sectors including fintech, finance, and telecommunications. Scores of government services offered by both the centre and states are using it for smooth delivery of benefits to targeted beneficiaries.

Face authentication is also working as a robust alternative and helping senior citizens and all those who have issues with the quality of their fingerprints due to several reasons including manual work or health issues.

As of now, 92 entities both in government and private sector are using Aadhaar face authentication. This AI based modality works both on Android and iOS platforms. It is safe against any video replay attacks and static photo authentication attempts by anti-social elements and a contactless, anytime- anywhere modality.

This authentication modality enables users to verify their identity with just a face scan, ensuring convenience while upholding stringent security standards.

 

*****

UIDAI और महाराष्ट्र सरकार ने संयुक्त रूप से 'आधार संवाद' कार्यक्रम आयोजित किया, फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स ने 100 करोड़ का आंकड़ा पार किया, पांच महीनों में दोगुनी वृद्धि

 UIDAI और महाराष्ट्र सरकार ने संयुक्त रूप से 'आधार संवादकार्यक्रम आयोजित किया,

फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स ने 100 करोड़ का आंकड़ा पार किया,

पांच महीनों में दोगुनी वृद्धि

 

मुंबई, 20 जनवरी 2025 – UIDAI (यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) और महाराष्ट्र सरकार ने संयुक्त रूप से 'आधार संवादकार्यक्रम का आयोजन कियाजिसमें BFSI, फिनटेक और टेलिकॉम क्षेत्रों से 500 हितधारकों ने भाग लिया। इस कार्यक्रम में आधार के विभिन्न अनुप्रयोगों पर चर्चा की गई और सेवाओं की आपूर्ति को बेहतर बनाने के उपायों पर विचार-विमर्श किया गया।

 

फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स का ऐतिहासिक उच्चांक

आधार के फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स ने 100 करोड़ का आंकड़ा पार कियाजो केवल पांच महीनों में 50 करोड़ से दोगुना हो गया। 2021 में शुरू हुई यह AI/ML आधारित प्रणाली विभिन्न क्षेत्रों में सुरक्षित और सुविधाजनक पहचान सत्यापन के लिए बड़े पैमाने पर उपयोग की जा रही है।

 

हितधारकों की भागीदारी

बैंकिंगएनबीएफसीफिनटेक और टेलिकॉम क्षेत्रों के विशेषज्ञों ने चार पैनल चर्चाओं में भाग लियाजिसमें आधार के माध्यम से सेवा सुधारने के उपायों और नीतियों पर विचार किया गया।

 

डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर में आधार की भूमिका

इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय के सचिव एस. कृष्णन ने आधार के जनसंख्या-आधारित उपयोग के बारे में बताया और यह रेखांकित किया कि आधार ने डिजिटल लेन-देन में विश्वास बढ़ाने में महत्वपूर्ण योगदान दिया है।

 

फेस ऑथेंटिकेशन का उपयोग

वर्तमान में 92 सरकारी और निजी संस्थाएं आधार के फेस ऑथेंटिकेशन प्रणाली का उपयोग कर रही हैंजो सुरक्षितसंपर्क रहित और कभी भीकहीं भी इस्तेमाल करने में आसान है।

 

भविष्य के लक्ष्य

UIDAI के CEO भूवनेश कुमार ने आधार के माध्यम से सेवा वितरण को और अधिक सुविधाजनक बनाने की UIDAI की प्रतिबद्धता को दोहराया। इस कार्यक्रम का उद्देश्य वित्तदूरसंचारफिनटेक और सार्वजनिक सेवाओं में आधार के उपयोग को बढ़ाना है।

 

आधार संवाद कार्यक्रम का दूसरा चरण मुंबई में सफलतापूर्वक आयोजित हुआजबकि पहला चरण नवंबर में बेंगलुरु में आयोजित किया गया था।

000


जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी

 जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई,दि.20 : जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतातील परस्पर संबध अधिक वृध्दींगत होतील, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

           जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने पावनगड येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेजपानचे वाकायामा प्रातांचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशीओ यामास्ताचेजपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजीवाकायामाचे सोनोबे सॅनमहिरा हेदुयेकीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सुर्यवंशीमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वालअधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसेयावेळी उपस्थित होते.

 यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून जाणून घेतली. एप्रिल महिन्यात महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवास जरुर यावे.असे आग्रहाचे निमंत्रणही पर्यटन मंत्री श्री.देसाई यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/स.सं

महसूल विभागाने शंभर दिवसांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा

 महसूल विभागाने शंभर दिवसांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 20 :-  महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या प्रत्येक कामाशी निगडीत विभाग आहे. महसूल विभागाची सर्वसमवेशक कामेसुविधायोजनांच्या परिणामकारक अंमलबजाणीमुळे जनसामन्यात शासनाची प्रतिमा उंचावली जाते. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात राबविण्यात येत असलेला शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलदगतीने उपलब्ध करून द्याव्यातअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

महसूल विभाग अंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रमयोजनांचा आढावा महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारउपसचिव अजित देशमुखधनंजय निकमसत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेनागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा on line देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा.  यामध्ये जमीन पोर्टलमहाखनिज पोर्टलआपली चावडीई चावडी  यासारख्या प्रणालींचा वापर करावा.

महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती  करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात. नोंदणी व मुद्रांक विभागातील कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजनाउपक्रमांचा आढावा घ्यावाअशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.


भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिकस्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख

 भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिकस्तरावर

शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख

- सभापती प्रा.राम शिंदे

पाटणा पीठासीन अधिकारी परिषदेत विचारमंथन

मुंबई, दि. 21 : जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे, सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे  वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे, कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. पाटणा येथे लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली येथे आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते बोलत होते. "भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान" या विषयावर या परिषदेमध्ये विचारमंथन होत आहे.

विचार व्यक्त करतांना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, आपली राज्यघटना पुरेशी लवचिक असून ती आणखी सामर्थ्य प्राप्त करीत आहे. आपल्या संसदीय लोकशाहीने राज्यघटनेच्या या शक्तिमुळेच संकटांचा यशस्वी सामना केला. घटना दुरुस्तीच्या संदर्भात काहींनी हेतूता गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले, मात्र अलीकडच्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना नाकारून योग्य जनादेश दिला आहे.

"लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे. एकाला सोडून  दुसऱ्याचा विचार देखील करता येणार नाही. तसे झाल्यास लोकशाही  संदर्भातील मूळ संकल्पनेलाच बाधा पोहोचेल" या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेसमोर दिलेल्या भाषणातील सावधानतेकडे सभापती प्रा. शिंदे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

सर्वसमावेशिता आणि सर्वांना समान संधीची उपलब्धता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कोणतीही राजकीय, आर्थिक अशी कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाच्या आधारावर तिसऱ्यांदा योगदान देत देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेत आहेत. हे स्वयंस्पष्ट उदाहरणच यासंदर्भात पुरेसे आहे, असेही सभापती प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकीर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाद्वारे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.

0000

Featured post

Lakshvedhi