Monday, 20 January 2025

देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिचमध्ये उत्स्फूर्त स्वागत

  देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिचमध्ये उत्स्फूर्त स्वागत

दावोसदि. 20 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॅानॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी झ्युरिचस्वित्झर्लंड येथे नुकतेच आगमन झाले. हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्यावतीने त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करतस्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगीझ्युरिचमधील लहान मुलांनी मराठी गौरवगीत सादर करत 'पुन्हा येण्या'ची भावना अधोरेखित केली. वेदांतहृषिकेशरश्मी आणि अद्विका या चिमुकल्या दोस्तांनी आपल्या निरागस शुभेच्छा देऊन उपस्थितांचे मन जिंकले.  या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विविध भागांतून मराठी बांधव आवर्जून उपस्थित राहिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले कीया स्वागताने मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या उर्जेची आणि 'वसुधैव कुटुंबकम'ची भावना येथे अनुभवली.मुख्यमंत्री फडणवीस दावोस समिट 2025’ साठी झ्युरिचमध्ये दाखल झाले  आहेत.


मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे!

 मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे!


-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. 20 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे नुकतेच स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.


बृह्न महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


याप्रसंगी बृह्न महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Sunday, 19 January 2025

सुंदर ठाणे

 टी. चंद्रशेखर ठाणे महापालिका आयुक्त असताना त्यांनी तलावपाळी, स्टेशनवरच्या फेरीवाल्यांना हटवणे, अनधिकृत बांधकामे पाडणे वगैरे करत ठाणे सुंदर बनवायचा प्रयत्न सुरू केला होता. त्या काळात मी ‘आज दिनांक’ची ठाणे प्रतिनिधी म्हणून फोटोग्राफीचं काम बघत होते. त्या अनुषंगाने रोजच त्यांची भेट व्हायची. एकदा त्यांच्या दालनात बसुन गप्पा मारत असताना मी तळ्यावरच्या पाणीपुरीवाल्यांना हाकलल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. सोपान बोंगाणे, श्रीकांत नेर्लेकर वगैरे जेष्ठ पत्रकार पण होते. 


चंद्रशेखर यांनी हसत हसत सांगितल की उद्या संध्याकाळी माझ्या घरी ये आणी तुझी फेवरेट पाणीपुरी कुठे मिळते, तिकडे माझ्या पत्नीला पण घेऊन जा. पण माझ्यासाठी एक स्टोरी कर. सकाळी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मधे जा आणि त्यांच्या OPD मधल्या त्वचा रोगाच्या पेशंट ना भेट, त्यांच्या समस्या जाणून फोटो काढ, लिहा त्यावर मग संध्याकाळी पाणीपुरी ची पार्टी माझ्या कडुन. 


दुसऱ्या दिवशी मी आणि आमचा वार्ताहर अरुण मुरकर तिथे गेलो. मुख्य चिकित्सा अधिकार्यांना भेटलो आणि त्यांच्याच बरोबर ओपीडी मधे आलो. त्या तीन तासात मी जे काही बघीतलं ते आयुष्य भर विसरणार नाही. ९९% हाताचे त्वचा रोगी हे पाणीपुरी वाले होते. जे केमिकल पाण्याची चव वाढवण्यासाठी टाकतात त्यामुळे त्यांची त्वचा जळते आणी गळायला लागते. हातात किडे पडतात. पण पापी पेट का सवाल म्हणत ते काम करत रहातात. त्यांच्या हातानी ते इंफेक्शन पाण्यात जातं. त्या वेळी त्या रोग्यां कडून मी जे काही ऐकलं, त्यांच्या हातांची जी अवस्था बघीतली, त्या नंतर माझी रस्त्यावर पाणीपुरी खाण्याची हिम्मत झाली नाही. तीच परिस्थिती रस्त्यावरच्या लिंबू सरबत, गोळा वगैरे वाल्यांची होती, पाणी कुठलंही वापरायचं कारण स्विटनरनी चव बदलते. गोडवा आणायला हॉस्पिटल मधुन एक्सपायर  झालेले सलाईन वापरायचे. ते स्वस्त म्हणून. 


आता कायदे कडक झाल्यावर हे कमी झालं असेल पण बंद होणं शक्य नाही. माझी मोठी नणंद सरकारी डॉक्टर आहे. तिने सांगितलं होतं की पुर्वी युपी मधल्या सरकारी हॉस्पिटल मधे mortuary मधे AC तेवढे चांगले नसायचे. तेव्हा प्रेते ठेवायला बर्फाच्या लाद्या वापरल्या जायच्या. दररोज रात्री काही लोक त्या वापरलेल्या लाद्या घेऊन जायला ठेले / हातगाड्या घेऊन यायचे, आणी नंतर नेऊन विकायचे. तो बर्फ हे गोळा वाले, लिंबू सरबत वाले विकत घेऊन जायचे.


म्हणूनच रस्त्यावरचे खाद्य पदार्थ खाताना दहावेळा विचार करा आपण काय खातोय ह्याचा. 


As received from a fellow ठाणेकर  

Cpf 

श्रीमती सुखदा प्रधान सिंग

Ex Photojournalist 

Currently Sr Vice President 

at a Petroleum MNC

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ गीतकार गुलजार यांचा स्पर्धेत सहभाग

 राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ

गीतकार गुलजार यांचा स्पर्धेत सहभाग

 

मुंबई, दि. 19: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरून टाटा मुंबई मॅरेथॉन 'एलिटस्पर्धेला स्पोर्ट्स गनने बार करुन रवाना केले. यावेळी 'चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीज' - दिव्यांग व्यक्तींची स्पर्धा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेला देखील राज्यपालांच्या उपस्थितीत आरंभ झाला.

 

गीतकार गुलजार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत सहभाग घेतला.

राज्याचे  क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसकार्यक्रमाचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंग आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ६० हजार स्पर्धक सहभागी होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

०००

 

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

 भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ

जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

मुंबईदि. १९भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नयेअसे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

ठाणे - उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदेपुणे - उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवारनागपूर - मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळेअहिल्यानगर - राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटीलवाशिम - हसन सकीना मियालाल मुश्रीफसांगली - चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटीलनाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजनपालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईकजळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटीलयवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोडमुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढामुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलाररत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंतधुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावलजालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडेनांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावेचंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईकेसातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाईबीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणेरायगड- आदिती वरदा सुनील तटकरेलातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसलेनंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटेसोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरेहिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळभंडारा- संजय सुशीला वामन सावकारेछत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाटधाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईकबुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणेअकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकरगोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटीलकोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकरगडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वालवर्धा- पंकज कांचन राजेश भोयरपरभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे - बोर्डीकर आणि अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

 

 

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवरकिल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेतअसेही कळविण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधीस्वातंत्र्यसैनिकशहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावाअशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

०००

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा स्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्र्यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा

 टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय  मॅरेथॉन स्पर्धा स्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्र्यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थिती मॅरेथॉनची सुरुवात

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय  मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत

-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई,दि.१४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा स्थळी  उपस्थित राहून  क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा वाढविणारीबंधुभाव वाढविणारीमाणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन  उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. ही मॅरेथॉन ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आयोजकविविध क्षेत्रातील मान्यवरस्पर्धक उपस्थित होते. श्री. भरणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.

मंत्री श्री. भरणे म्हणाले,टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या प्रत्येकाला वर्षभर सकारात्मक उर्जा मिळते. इथं  मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणीएनर्जी ड्रिंक्सरिलिफ स्प्रेफळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते. आपल्या शरीराची आणि मनाची सलग धावण्याची क्षमता आहेयाची प्रचिती आल्याने अभिमान वाटतो. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या या उत्सवात  सहभागी होऊन प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे.

००००००००००००

मुलींसाठी नर्सिंग कोर्स


Featured post

Lakshvedhi