Monday, 20 January 2025

देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिचमध्ये उत्स्फूर्त स्वागत

  देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिचमध्ये उत्स्फूर्त स्वागत

दावोसदि. 20 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॅानॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी झ्युरिचस्वित्झर्लंड येथे नुकतेच आगमन झाले. हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्यावतीने त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करतस्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगीझ्युरिचमधील लहान मुलांनी मराठी गौरवगीत सादर करत 'पुन्हा येण्या'ची भावना अधोरेखित केली. वेदांतहृषिकेशरश्मी आणि अद्विका या चिमुकल्या दोस्तांनी आपल्या निरागस शुभेच्छा देऊन उपस्थितांचे मन जिंकले.  या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विविध भागांतून मराठी बांधव आवर्जून उपस्थित राहिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले कीया स्वागताने मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या उर्जेची आणि 'वसुधैव कुटुंबकम'ची भावना येथे अनुभवली.मुख्यमंत्री फडणवीस दावोस समिट 2025’ साठी झ्युरिचमध्ये दाखल झाले  आहेत.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi