Sunday, 19 January 2025

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

 तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

                                                                                                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी जागतिक परिषद

            मुंबईदि. 18: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचे मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहे.  राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह कृषीग्रामविकासात नवनवीन  तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांच्या 'इज ऑफ  लिव्हिंग'  मध्ये सुधारणा आणत आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने  क्रांतिकारक बदल घडवून निश्चितच मानवी जीवन सुसह्य करणे शक्य होणार आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबई ही जगाची फिनटेक आणि डाटा सेंटर राजधानी होत आहे. जगातील प्रत्येक भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्याची संधी मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. भारत तंत्रज्ञान व आर्थिक विकासामध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. सध्या भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचा विडा उचलला आहे.

            जिओ कन्व्हेंक्शन सेंटर येथे पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने आयोजित जागतिक परिषद 2025 मध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर दुबई आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हादी बद्रीकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकरशास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरपॅन आयआयटीचे अध्यक्ष देवाशिष भट्टाचार्यपॅन आयआयटीचे शरद सरफअशोक झुनझुनवाला आदी उपस्थित होते.

             पायाभूत सुविधांची मोठी कामे देशात सुरू असल्याचे सांगत  मुख्यमंत्री श्री.  फडणवीस म्हणालेमुंबईमधील सागरी किनारा रस्ताअटल सेतूने दळणवळण गतिमान केले आहे. मुंबईत आणखी बऱ्याच पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. राज्य शासन इनोव्हेटिव्ह सोसायटीसाठी प्रयत्न करीत आहे.  राज्यातील दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रती वर्ष पाच लाख रुपयांचे उपचार मोफत देत आहे.

             हवामान बदल व पर्यावरणाच्या समस्यांमुळे कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करणे शक्य आहे. राज्य शासन  शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सौरऊर्जेवर आधारित वीज पुरवठा उपलब्ध करून देत आहे. राज्यात 2026 पर्यंत 16 गिगॅवॅट वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात कृषीसाठी सौर ऊर्जा कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला द्रोण दीदी उपक्रमही तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे नेला जात आहे. राज्यात पाण्याच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात  येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 24 हजार गावांमध्ये जलसंपन्नता आली आहे. आयआय टी मुंबई ही आता केवळ एक शैक्षणिक संस्था राहिली नसून ती 'इंडियन इनोवेशन ऑफ टेक्नॉलॉजीबनली आहे.  राज्य शासन संशोधनासाठी अनेक क्षेत्रात आयआयटी सोबत काम करीत आहे. द्रोण प्रकल्पासाठी काम सुरू आहे. यामध्ये कंट्रोल अँड कमांड सेंटरद्रोण पोर्ट बनविले जात आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनात अमुलाग्र बदल घडत असून त्यामुळे निश्चितच भविष्य उज्ज्वल होणार आहे. यावेळी आयआयटीचे संशोधकप्राध्यापकविद्यार्थी उपस्थित होते.

शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली

 शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली

                                                        - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 18: सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असूनत्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा झाली. या बैठकीत मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशीमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीमध्यपश्चिम रेल्वे आणि महामुंबई मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमुंबईसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. एकत्रिक सेवा प्रणालीमुळे प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद व सुलभ होणार असूनमहसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सहजगत्या एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व वाहतूक सुविधा मिळतील. यामुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहेतसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले कीमुंबईत सध्या 3,500 लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी 300 लोकल सेवा सुरू करण्यासाठी 17,107 कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये 1.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

            महाराष्ट्र सरकार शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)च्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचे उद्दिष्ट विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट प्रक्रिया एकसंध व सुलभ करणे आहे. यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मचा तांत्रिक आधार घेतला जाणार आहे.

00000

प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतून ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणास चालना

 प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतून ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणास चालना

                                                                        - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या पथदर्शी प्रकल्पात महाराष्ट्राचा समावेश होतापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “सबका साथसबका विकाससबका विश्वास” असा दृष्टिकोन आहेग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या प्रगतीचा आधार आहेही जाणीव ठेवूनच स्वामित्व योजना आखण्यात आली आहेराज्यातील  सुमारे 60 लाख हून अधिक कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल.  ही योजना केवळ  शासकीय उपक्रमापुरती मर्यादित नसूनती ग्रामीण भारताच्या सामाजिकआर्थिक आणि प्रशासकीय प्रणालीत आमूलाग्र बदल घडविणारी  आहेग्रामीण भागातील जमिनीच्या मालकीबाबतची अनिश्चितता आणि वाद कमी होणार आहेतअनेकांना जमिनींचा कायदेशीर हक्क सिद्ध करणे कठीण जातेयामुळे केवळ न्यायालयीन प्रकरणे वाढतातअनेकदा विकास प्रक्रियादेखील थांबतेया समस्येचे स्वामित्व योजनेमुळे निराकरण होईलया योजनेद्वारे गावांतील जमिनींची मोजणी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मालकीच्या जमिनीचे कायदेशीर प्रमाणपत्र दिले जाते.  हे प्रमाणपत्र केवळ मालकीचा पुरावा नसूनत्यामागे आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी ठरेलअसे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

            स्वामित्व योजनेंतर्गत राज्यपाल श्री.राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील विनोद आत्माराम पिंपळेमाया विकास पिंपळेसदानंद वामन पिंपळेदिलीप यशवंत सपाटेप्रकाश शांताराम रावतेअलिबाग जिल्ह्यातील रोहण कृष्णा पाटेशैलेश यशवंत ठाकूरमिलिंद पांडुरंग पडतेप्रभाकर शांताराम नाईकअंकुश सिताराम धाके आणि ठाणे जिल्ह्यातील विष्णू चुरू आंबेकरयमुनाबाई रामचंद्र पाटीलमधुकर तुकाराम पाटील आणि चेतन गजानन पाटील यांना सनद वाटप करण्यात आले.

स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ --- महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वि

 स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ

---

महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वितरण

            मुंबईदि 18 : स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांशा पुर्ण करत आहेस्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईलअसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

            केंद्रीय ग्रामविकास  पंचायत राज मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे स्वामित्व योजनेंतर्गत सनद वितरणाचा शुभारंभ करण्यात आलेया कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृह येथून ऑनलाईन उपस्थित होते.  मुख्य सचिव सुजाता सौनिकग्रामविकास  पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेभूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त  संचालक डॉ.सुहास दिवसेविभागीय आयुक्त राजेश देशमुख तसेच पालघररायगडठाणे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.

            देशातील गरीबी कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकांजवळ मालमत्तेचे अधिकार असणे गरजेचे आहे  असे सांगून प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले कीदेशातील लाखभर लोकांकडे संपत्ती असूनही त्यास किंमत मिळत नव्हतीस्वत:चे घर असूनही काही लोक त्यावर कब्जा करत होते2014 पासून आम्ही देशातील नागरिकांचे ड्रोन द्वारे सर्व्हेक्षण करून त्यांना प्रापर्टी कार्ड वितरित करत आहोयामुळे लोकांचे जीवन बदलणार असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितलेस्वामित्तव योजनेंतर्गत या प्रॉपर्टी कार्डमुळे देशातील भ्रष्टचार कमी होणार आहेआज 98 टक्के भूमी अभिलेखाचे संगणकीकरण करण्यात आले आहेआज गावोगावी शौचालयेउज्ज्वला गॅसजलपुरवठाआयुष्यमानसडकेइंटरनेटब्रॉडबँड सोबत कॉमन सर्व्हीस सेंटर या सुविधा पुरविण्यात आल्या आहेतशहरामध्ये मिळणाऱ्या सुविधा आता गावात मिळत आहेदेशातील गरीब सशक्त झाला तरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले

Saturday, 18 January 2025

आर्टीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 आर्टीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

            मुंबईदि.18 : मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षणस्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षणविविध योजना राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षाकौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी  केले आहे.

            ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. युवकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी आर्टीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणीसाठी नवीन अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. उमेदवारांनी याठिकाणी नोंदणी केल्यानंतर कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंयरोजगारासाठी इच्छुक आहेतत्यांच्या व्यवसायाकरीता आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु असल्याची माहिती श्री. वारे यांनी दिली.

असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस

            स्पर्धा परीक्षा: एमपीएससीयुपीएससीबॅंक (आयबीपीएस)रेल्वेजेईई- नीटयुजीसी- नेट/ सेटपोलीस/मिलीटरी. कौशल्य विकास: परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य प्रशिक्षण व परदेशी उच्च शिक्षणाची संधीशेतीपुरक विविध व्यवसाय प्रशिक्षणहार्डवेअर व सॉफ्टवेअरतसेच कॉम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भातील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजना: पीएच. डी, पोस्ट पीएच. डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)

नोंदणी कशी करावी

            इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा पुढील लिंकवर क्लिक करुन https://arti.org.in/arti-job उमेदवार ऑनलाईन अर्ज करावा.

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे

 केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे

                                                                                                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व

राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

            मुंबईदि. 18: केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे.  एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून संस्थेचे हे वर्ष समाज उपयोगी ठरावेअशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.

            सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केईएम रुग्णालयात  करण्यात आले. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढापरिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यसभा खासदार मिलिंद देवराआमदार सर्वश्री अजय चौधरीकालिदास कोळंबकर राजहंस सिंहमहानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त बिपिन शर्माअधिष्ठाता संगीता रावत आदी उपस्थित होते.

            संस्थेच्या या 100 वर्षांच्या काळात संस्थेसाठी समर्पणवृत्तीने काम करणाऱ्या लोकांना धन्यवाद देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे. राज्य शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बद्दल करीत  आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे धोरण राज्याने स्वीकारले आहे. त्यानुसार मागील एक वर्षात दहा नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय राज्यात सुरू करण्यात आली आहे.

            कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी  खूप चांगले काम केले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले.  कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयाचे काम निश्चितच कौतुकास्पद होते. केईएम हे कुटुंब आहे,  यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. हे संस्थेला अभिमानास्पद आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी 21 मजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

            प्रास्ताविक अधिष्ठाता संगीता रावत यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर्सप्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

 तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

                                                                                                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी जागतिक परिषद

            मुंबईदि. 18: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचे मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहे.  राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह कृषीग्रामविकासात नवनवीन  तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांच्या 'इज ऑफ  लिव्हिंग'  मध्ये सुधारणा आणत आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने  क्रांतिकारक बदल घडवून निश्चितच मानवी जीवन सुसह्य करणे शक्य होणार आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबई ही जगाची फिनटेक आणि डाटा सेंटर राजधानी होत आहे. जगातील प्रत्येक भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्याची संधी मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. भारत तंत्रज्ञान व आर्थिक विकासामध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. सध्या भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचा विडा उचलला आहे.

            जिओ कन्व्हेंक्शन सेंटर येथे पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने आयोजित जागतिक परिषद 2025 मध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर दुबई आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हादी बद्रीकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकरशास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरपॅन आयआयटीचे अध्यक्ष देवाशिष भट्टाचार्यपॅन आयआयटीचे शरद सरफअशोक झुनझुनवाला आदी उपस्थित होते.

             पायाभूत सुविधांची मोठी कामे देशात सुरू असल्याचे सांगत  मुख्यमंत्री श्री.  फडणवीस म्हणालेमुंबईमधील सागरी किनारा रस्ताअटल सेतूने दळणवळण गतिमान केले आहे. मुंबईत आणखी बऱ्याच पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. राज्य शासन इनोव्हेटिव्ह सोसायटीसाठी प्रयत्न करीत आहे.  राज्यातील दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रती वर्ष पाच लाख रुपयांचे उपचार मोफत देत आहे.

             हवामान बदल व पर्यावरणाच्या समस्यांमुळे कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करणे शक्य आहे. राज्य शासन  शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सौरऊर्जेवर आधारित वीज पुरवठा उपलब्ध करून देत आहे. राज्यात 2026 पर्यंत 16 गिगॅवॅट वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात कृषीसाठी सौर ऊर्जा कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला द्रोण दीदी उपक्रमही तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे नेला जात आहे. राज्यात पाण्याच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात  येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 24 हजार गावांमध्ये जलसंपन्नता आली आहे. आयआय टी मुंबई ही आता केवळ एक शैक्षणिक संस्था राहिली नसून ती 'इंडियन इनोवेशन ऑफ टेक्नॉलॉजीबनली आहे.  राज्य शासन संशोधनासाठी अनेक क्षेत्रात आयआयटी सोबत काम करीत आहे. द्रोण प्रकल्पासाठी काम सुरू आहे. यामध्ये कंट्रोल अँड कमांड सेंटरद्रोण पोर्ट बनविले जात आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनात अमुलाग्र बदल घडत असून त्यामुळे निश्चितच भविष्य उज्ज्वल होणार आहे. यावेळी आयआयटीचे संशोधकप्राध्यापकविद्यार्थी उपस्थित होते.

00000

Featured post

Lakshvedhi