Saturday, 18 January 2025

आर्टीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 आर्टीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

            मुंबईदि.18 : मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षणस्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षणविविध योजना राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षाकौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी  केले आहे.

            ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. युवकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी आर्टीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणीसाठी नवीन अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. उमेदवारांनी याठिकाणी नोंदणी केल्यानंतर कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंयरोजगारासाठी इच्छुक आहेतत्यांच्या व्यवसायाकरीता आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु असल्याची माहिती श्री. वारे यांनी दिली.

असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस

            स्पर्धा परीक्षा: एमपीएससीयुपीएससीबॅंक (आयबीपीएस)रेल्वेजेईई- नीटयुजीसी- नेट/ सेटपोलीस/मिलीटरी. कौशल्य विकास: परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य प्रशिक्षण व परदेशी उच्च शिक्षणाची संधीशेतीपुरक विविध व्यवसाय प्रशिक्षणहार्डवेअर व सॉफ्टवेअरतसेच कॉम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भातील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजना: पीएच. डी, पोस्ट पीएच. डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)

नोंदणी कशी करावी

            इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा पुढील लिंकवर क्लिक करुन https://arti.org.in/arti-job उमेदवार ऑनलाईन अर्ज करावा.

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे

 केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे

                                                                                                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व

राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

 

            मुंबईदि. 18: केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे.  एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून संस्थेचे हे वर्ष समाज उपयोगी ठरावेअशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.

            सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केईएम रुग्णालयात  करण्यात आले. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढापरिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यसभा खासदार मिलिंद देवराआमदार सर्वश्री अजय चौधरीकालिदास कोळंबकर राजहंस सिंहमहानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त बिपिन शर्माअधिष्ठाता संगीता रावत आदी उपस्थित होते.

            संस्थेच्या या 100 वर्षांच्या काळात संस्थेसाठी समर्पणवृत्तीने काम करणाऱ्या लोकांना धन्यवाद देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे. राज्य शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बद्दल करीत  आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे धोरण राज्याने स्वीकारले आहे. त्यानुसार मागील एक वर्षात दहा नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय राज्यात सुरू करण्यात आली आहे.

            कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी  खूप चांगले काम केले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले.  कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयाचे काम निश्चितच कौतुकास्पद होते. केईएम हे कुटुंब आहे,  यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. हे संस्थेला अभिमानास्पद आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी 21 मजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

            प्रास्ताविक अधिष्ठाता संगीता रावत यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर्सप्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

 तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

                                                                                                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी जागतिक परिषद

 

            मुंबईदि. 18: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचे मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहे.  राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह कृषीग्रामविकासात नवनवीन  तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांच्या 'इज ऑफ  लिव्हिंग'  मध्ये सुधारणा आणत आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने  क्रांतिकारक बदल घडवून निश्चितच मानवी जीवन सुसह्य करणे शक्य होणार आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबई ही जगाची फिनटेक आणि डाटा सेंटर राजधानी होत आहे. जगातील प्रत्येक भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्याची संधी मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. भारत तंत्रज्ञान व आर्थिक विकासामध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. सध्या भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचा विडा उचलला आहे.

            जिओ कन्व्हेंक्शन सेंटर येथे पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने आयोजित जागतिक परिषद 2025 मध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर दुबई आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हादी बद्रीकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकरशास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरपॅन आयआयटीचे अध्यक्ष देवाशिष भट्टाचार्यपॅन आयआयटीचे शरद सरफअशोक झुनझुनवाला आदी उपस्थित होते.

             पायाभूत सुविधांची मोठी कामे देशात सुरू असल्याचे सांगत  मुख्यमंत्री श्री.  फडणवीस म्हणालेमुंबईमधील सागरी किनारा रस्ताअटल सेतूने दळणवळण गतिमान केले आहे. मुंबईत आणखी बऱ्याच पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. राज्य शासन इनोव्हेटिव्ह सोसायटीसाठी प्रयत्न करीत आहे.  राज्यातील दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रती वर्ष पाच लाख रुपयांचे उपचार मोफत देत आहे.

             हवामान बदल व पर्यावरणाच्या समस्यांमुळे कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करणे शक्य आहे. राज्य शासन  शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सौरऊर्जेवर आधारित वीज पुरवठा उपलब्ध करून देत आहे. राज्यात 2026 पर्यंत 16 गिगॅवॅट वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात कृषीसाठी सौर ऊर्जा कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला द्रोण दीदी उपक्रमही तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे नेला जात आहे. राज्यात पाण्याच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात  येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 24 हजार गावांमध्ये जलसंपन्नता आली आहे. आयआय टी मुंबई ही आता केवळ एक शैक्षणिक संस्था राहिली नसून ती 'इंडियन इनोवेशन ऑफ टेक्नॉलॉजीबनली आहे.  राज्य शासन संशोधनासाठी अनेक क्षेत्रात आयआयटी सोबत काम करीत आहे. द्रोण प्रकल्पासाठी काम सुरू आहे. यामध्ये कंट्रोल अँड कमांड सेंटरद्रोण पोर्ट बनविले जात आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनात अमुलाग्र बदल घडत असून त्यामुळे निश्चितच भविष्य उज्ज्वल होणार आहे. यावेळी आयआयटीचे संशोधकप्राध्यापकविद्यार्थी उपस्थित होते.

00000

राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण : दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान"

 राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण : दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कारस्वप्निल कुसळेसचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान"

 

नवी दिल्ली 17 : राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्नअर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडूप्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला.

यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी शूटर मनु भाकरशतरंज विश्व चॅम्पियन डी गुकेशहॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा एथलीट प्रवीण कुमार यांना सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांत महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. रेल्वे कर्मचारी असलेल्या स्वप्निलने नेमबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्याचबरोबर स्वप्निलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅरालिम्पिक 2024 मध्ये गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सचिन सर्जेराव खिलारी यालाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 40 वर्षांनी शॉटपुट प्रकारात पदक जिंकणारा सचिन हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेचमहाराष्ट्राचे पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई दि. १७ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार" प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शकखेळाडूसाहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. १४ ते २६ जानेवारी२०२५ या कालावधीत व दि. २६ जानेवारी२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावेत.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कारक्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शकखेळाडुदिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा दि. १५ जानेवारी ते २६ जानेवारी२०२५ ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

००००

नेमकं - जगावं - कसं ?*

 *नेमकं - जगावं - कसं ?*

*तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं...!*

 

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही....!


आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत... आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!


चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं....!


"पुढे चला... पुढे सरका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....!


खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...!

पण कुणावर विशेष लोभ नाही..., कोणावर राग तर मुळीच नाही..., कुणाचा द्वेष नाही..., कुणाचा तिरस्कार नाही..!

आपला संबंध फक्त तिकिटापुरता... !


कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही...

कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही...

दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं..., येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...!


मूळ ठिकाणी पोहचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते...., प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं...

आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....पण त्या गावात अडकायचं नाही...!


"आपण इथले नव्हेत" हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या "ठेसनावर" जायचं....!


"शिंगल" बेल मारली की थांबायचं... "डबल" मारली की निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....

आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!


हा शेवटचा स्टॉप आहे.... समद्यानी उतरून घ्या... असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की, "आपल्या घरी"  निघून जायचं.... !


उद्या कुठे जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल.... ? हे ठरवणारा वेगळा असतो..!


उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही... ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही...!


शाश्वत एकच आहे... तो म्हणजे प्रवास...!


आपण असू तरी आणि आपण नसू तरीही... प्रवास  कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!


*आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... प्रवास  सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!*

 

 **शुभ प्रभात* 💐🙏

दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार

 दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एस टी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार

परिवहन मंत्र्यांनी घेतला एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि. 17 : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे.  यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहेतसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.

परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री श्री.  सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणालेनवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग (प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या)होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा.  याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी.  एस. टी. महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात यावे. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात.  कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी. पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये. शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणालेएसटी महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणावे. नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी.  जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून यामधून मिळणारे उत्पन्न १०० कोटीपर्यंत आणण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात यावे. महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. तसेच डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा.

एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे. या पंपाचा व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरु करून  उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा. याबाबत इंधन कंपन्यांची करार करावाअशा सूचनाही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi