Friday, 17 January 2025

कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा

 कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी

महाकुंभाची निर्मिती करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 17 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावेयासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरेतीर्थक्षेत्रेसांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईलअसे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावेअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्या.

सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्थागर्दीचे नियोजनसाधुग्रामनदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरणपायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगीक विकास कामे आदींबाबतचा आढावा घेतला.

नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रॅण्डींग करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीनाशिक – त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरीडॉरची निर्मिती करून नाशिक ‘रीलिजिअस हब’ म्हणून विकसित करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. नाशिक येथे साधुग्रामकरिता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमिन संपादित करण्यात यावी. येथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे  हस्तांतरीत करावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेतअशा ठिकाणची अतिक्रमण तत्काळ हटवावीतअशाही सूचना त्यांनी केल्या.

या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून पर्यटक दर्शनसाठी येत असतात. पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे 8 ते 10 हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसमृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे क्राँक्रीटीकीकरण तसेच रूंदीकरण करण्यात यावे. जे मार्ग 2027 पर्यंत बांधणे शक्‌य आहेअसेच बांधकाम हाती घेण्यात यावे. इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्यात यावा. वाढवणमुंबईशिर्डी, छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे येणारे रस्ते तसेच रिंग रोड आदी रस्ते अद्ययावत करण्यात यावे. नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी राम काल पथ बरोबरच त्र्यंबकेश्वर येथे रीलिजिअस कॉरीडॉर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.

या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलीसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्हीबॅरिकेंटींग, सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ज्या अडचणी येत असतीलत्या सोडविण्यात याव्यात. साधुग्रामकरिता संपादित केलेल्या जागेवर वृक्षतोड न करता साधुंच्या निवासाची व्यवस्था करावी. कुंभ परिसरात पाणी स्वच्छ राहीलयाची विशेष दक्षता घ्यावी. मुबलक प्रमाणात प्रसाधन गृहे तयार करण्यात यावीत. जलपर्णीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करा. तसेच कुंभमेळ्यादरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केल्या.

या बैठकीस जलसंपदाआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहलनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तानगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराजसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सविव मनीषा म्हैसकरमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच अधिकारी उपस्थित होते.

दृष्टिकोन किती महत्वाचा पहा. गणित तर समजून घ्या. "मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.

 दृष्टिकोन किती महत्वाचा पहा. गणित तर समजून घ्या. "मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.

आपण असे मानू या की.

A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

म्हणजेच A=1, B=2, C=3 असे

मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.

आपण असे म्हणतो की, आयुष्यात "कठोर मेहनत / HARDWORK" केले तरच आयुष्य यशस्वी होते.

आपण "HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =

8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.


दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे "ज्ञान" किंवा 'Knowledge'. याचे मार्क्स पाहु या

K+N+O+W+L+E+D+G+E =

11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी.


काही लोक म्हणतात "नशिब"/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.

L+U+C+K = 12+21+3+11 = 47%, "नशिब" तर एकदमच काठावर पास.


काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी "पैसा /MONEY" सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता "M+O+N+E+Y=किती मार्क्स ?

 13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.


बराच मोठा समुदाय असे मानतो की, "नेतृत्वगुण / LEADERSHIP" करणारा यशस्वी आयुष्य जगतो.  नेतृत्वाचे मार्क्स =

12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.


मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो ? 

काही कल्पना करू शकता ?

नाही जमत ?

.

.

.

.

मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा "दृष्टिकोन / ATTITUDE" 

आता एटिट्यूड" चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू... 

A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%. पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, 'आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन'. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य  १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.


*"दृष्टिकोन बदला, आयुष्य बदलेल.”*

कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

 कृत्रिम बुद्धिमत्ताबायोटेकक्रिप्टोड्रोन आणि अँटी ड्रोनइलेक्ट्रिक एनर्जी

गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

 

मुंबईदि. 16 : कृत्रिम बुद्धिमत्ताबायोटेकक्रिप्टोड्रोन आणि अँटी ड्रोनइलेक्ट्रिक एनर्जी ही  गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे आहेत, असे मत नवीन कल्पनातंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूक या विषयी द्वितीय चर्चा सत्रात जिओ जेन नेक्स्टचे प्रमुख अमेय माशेलकर, जीतो इनक्युबेशनचे अध्यक्ष जिनेंद्र भंडारीव्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्न, सह-संस्थापकअपूर्व रंजन शर्मासह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष अवेंडसचे राणू वोहरा, सह संस्थापक  ई व्हि कॅम्प आशिष वाढवणी यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशनएलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांनी केले. 

या चर्चासत्रात नवीन कल्पनातंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूकशैक्षणिक संस्थांची भूमिका, सर्जनशीलता इत्यादींविषयी सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात स्टार्टअप्सना पूरक असे अनेक घटक आहेत. स्टार्टअप्सची सुरुवात करताना तुम्ही निर्भय असणे आवश्यक आहे

उद्योजकतेतील धोरणात्मक परिणाम उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षेवर अवलंबून असते असे मत आशिष यांनी व्यक्त केले. स्टार्टअप्स शैक्षणिक संस्थांची भूमिका देखील तितकीच महत्त्वपूर्ण असते . आज हे तंत्रज्ञानाचे जग असून नाविन्यता ही केंद्रस्थानी आहे.

             तृतीय चर्चा सत्रात स्टार्टअप्समध्ये महिलांचे सक्षमीकरणया चर्चासत्रात ओपन सिक्रेटच्या संस्थापिका अहाना गौतमसुपर बॉटमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उत्तगीउद्योजिका श्रेया घोडावतरिचीवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विभा कागाजी यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. सूत्रसंचालन सर्जन सलोनी पटवर्धन यांनी केले.

             आहाना गौतम या स्वतःचा अनुभव सांगताना म्हणाल्या की‘लहानपणापासूनच मी माझ्या आईला माझ्यासाठी काम करताना पाहून तिच्यातून प्रेरणा घेतली. त्यामुळेच मला देखील उद्योग क्षेत्रात यावसं वाटलं. महिलांना काम करताना नेहमी पुरुषांची साथ असते त्यामुळेच महिला देखील पुढे जाऊ शकतात’ असे मत व्यक्त केले. वैयक्तिक आलेले अनुभव आणि समाजातील अनुभव यातून महिला उद्योजक देखील स्टार्टअप्समध्ये येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महिला ही जबाबदारीने काम करत आहेत. कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करता येऊ शकते  हे महिलांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटून सिद्ध केले आहे, असे मत महिला उद्योजकांनी यावेळी व्यक्त केले.

****

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल' उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली

 झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसलउपक्रमातून

उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका

विभागातील ४ हजार ४७० प्रकरणे निकाली

मुंबई, दि. १६ : प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान व्हावेयासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल (Zero pendancy and daly caposal) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे  विभागातील प्रलंबित फायली निकाली निघण्याचा धडाका सुरू आहे. या उपक्रमात ४ हजार ४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

विभागात प्रलंबित फाईल  राहू नयेयासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन  ३१ जानेवारीपर्यंत उच्च शिक्षण विभागात झिरो पेंडन्सी उपक्रम  राबवावा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी १ फेब्रुवारीपासून अचानक शिक्षण सहसंचालक कार्यालयांना भेट देऊन कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचा निर्णयही घेतला आहे.  तसेच  विद्यापीठमहाविद्यालयांना भेट देण्याबरोबरच प्राचार्यप्राध्यापककर्मचारी यांच्याशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

प्रलंबित प्रकरणाबाबत संचालनालयाकडे प्राप्त तपशीलाच्या आधारे संचालनालय व अधिनस्त कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत संचालनालय स्तरावर विचारविनिमय करुन कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

यामध्ये सर्वप्रथम प्रलंबित प्रकरणे,  टपालाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. अनुकंपावैद्यकीय देयकेभविष्य निर्वाह निधी प्रकरणेअर्जित रजा रोखीकरण प्रकरणेवेतननिश्चिती प्रकरणेसेवानिवृत्ती प्रकरणे यांचा यामध्ये प्रकर्षाने समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणांचे वर्गीकरण करुन आवश्यकतेनुसार शासकीय आस्थापनांवरील किंवा विद्यापीठांमधील काही कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात उसनवारी तत्वाने उपलब्ध करुन घेऊन दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची राज्यव्यापी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये प्रत्येक दिवशी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील  कार्यालये सुरु ठेवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

यामध्ये तंत्र शिक्षण संचालनालयातील १ हजार ४९० पैकी १हजार ३५३ प्रकरणांचा आणि उच्च शिक्षण संचालनालयातील ४ हजार १८३ पैकी ३ हजार ११७ प्रकरणांचा समावेश आहे. अशाप्रकारे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एकूण ४ हजार ४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.  उर्वरित प्रकरणे ३१ जानेवारीपर्यत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

0000

लाडकी बहीण योजनेचा 26 जानेवारीपर्यंत लाभ मिळणार

 लाडकी बहीण योजनेचा 26 जानेवारीपर्यंत लाभ मिळणार

- महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

 

मुंबई, दि. 16 : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीराज्य  शासनाने ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना  हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रिन्सटन टाऊनबाबत झेरॉक्सच्या आधारे मुद्रांक शुल्क करावेm

 प्रिन्सटन टाऊनबाबत झेरॉक्सच्या आधारे मुद्रांक शुल्क करावे

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईता. 16 : पुण्यातील येरवडा परिसरातील कल्याणीनगरमधील प्रिन्सटन टाऊन को-ऑप हौसिंग सोसायटीसंदर्भात सह जिल्हा निबंधक वर्ग - 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारीपुणे शहर यांच्याकडे  दाखल तक्रारीबाबत  सोसायटी आणि विकासक यांच्यातील वादामध्ये समजुतीच्या करारनाम्याचा (Memorandum of Understanding) दस्त सात दिवसांत तक्रारीसोबत सहजिल्हा निबंधक वर्ग - 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारीपुणे यांच्याकडे प्राप्त न झाल्यास उपलब्ध छायांकित प्रतीच्या सत्यतेबाबत विकासकास काही म्हणायचे नाहीअसे समजून छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्क निश्चिती व आवश्यकतेनुसार वसुलीची कार्यवाही सुरू करण्याच्या  सूचना  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  दिल्या.

या संदर्भात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली.  बैठकीस आमदार दीपक केसरकरउपसचिव  सत्यनारायण बजाज उपस्थित होते.

दाखल तक्रारीची  दखल घेऊन समजुतीचा करारनामामधील पक्षकार (सोसायटी व निष्पादक) यांना तक्रारीतील समजुतीचा करारनामाचे निष्पादन व त्यास मुद्रांक शुल्क न भरण्याविषयी खुलासा सादर करण्यास नोटिसीद्वारे कळविण्यात आले होते. परंतुत्यास प्रतिसाद न मिळाल्याने  सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तथा प्रशासकीय अधिकारीपुणे शहर यांना बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालयास समक्ष भेट देऊन मूळ समजुतीचा करारनामा ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे व तो सह जिल्हा निबंधक वर्ग - १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारीपुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहेअशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

0000

अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई

 अपघातग्रस्त नौका मालकाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई

 

मुंबई, दि. १६ : मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला प्रदान करण्यात आला.

मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला धनादेश देण्यात आला. या वेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला २८ डिसेंबर २०२४ रोजी मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक परवाना अधिकारी, सागरी पोलीस, बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला होता. त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.

 बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते.

००००

Featured post

Lakshvedhi