Wednesday, 15 January 2025

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना

 वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना

वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. 14 :- वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाहीअशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली.

वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री श्री.नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जंगलांच्या कोर क्षेत्रात विविध प्रकारची फळ झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील खाद्याची सोय होईलअसे मंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.  

नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात 20 डिसेंबर तसेच 23 डिसेंबर 2024 रोजी 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचे मांस खायला दिल्यामुळे झाले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कोंबडीच्या मांसामध्ये बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निलंबीत किंवा बडतर्फ करण्यात येईलअसे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

मंत्री श्री.नाईक म्हणाले कीब्रम्हपुरी वन विभागाच्या शिंदेवाडी वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या वाघाच्या शरिराचे सर्व अवयव सुस्थितीत होते. पांढरकवडा वन विभागाच्या वणी वनपरिक्षेत्रात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा शिकारीमुळे मृत्यू झाला. या वाघाचे शरीर पूर्णत: कुजलेले असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजले नाही. तथापिवाघाच्या शरीरातील दात तसेच नखे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणावर वन विभाग नजर ठेऊन तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जंगलामध्ये लागणारी आग विझविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यांचा अभ्यासही करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा शासन विचार करत आहे. तथापिबफरझोनमध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नयेअसेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणेवनसफारी करतांना काही पर्यटक वन्य प्राण्यांची वाट रोखून त्यांना पाहत असल्याने दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वनमंत्री श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.

000

पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

 पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार

पुतळा उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

 

नवी दिल्लीदि. 14 : मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली.

पानिपत युध्दाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवकेंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसेराज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावलमाजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेखासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारीस्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीया युध्द मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले.  छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळयांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठ्यांनी एकेकाळी राखले. ही एकीची  शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया असेही ते म्हणाले.

या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेलअसे नमूद करुन या परिसरात  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईलअशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतीलअसेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी. समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवारमराठा सेवा संघहरियाणा समस्त धानक मराठा समाजधनुष्यधारी धानक समाजमराठा उत्थान समितीमुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघपानिपत सार्वजानिक मराठा गणेश मंडळयांनी प्रयत्न केले.

 कार्यक्रमाची क्षणचित्रे

·         कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली.

·        शिंदेशाही पगडीशौर्य स्मारकाची  प्रतिमा आणि शाल देऊन मुख्यमंत्री यांचे स्वागत.

·         विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध पथकाकडूनमर्दानी खेळांचे प्रदर्शन

·   महाराष्ट्रदिल्लीआणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित. खासकरून ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक आवर्जून उपस्थित.

000

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी किंवा कुरवपूर या सारख्या ठिकाणी जाणे म्हणजे काही तरी पूर्वपुण्य

 श्रीक्षेत्र नृसिंहवाडी किंवा कुरवपूर या सारख्या ठिकाणी जाणे म्हणजे काही तरी पूर्वपुण्य पदरी असणे निश्चित आहे अन्यथा कृष्णामाईचे दर्शन घडणे शक्य नाही . थोरले महाराज कृष्णा लहरीत म्हणतात ,


पुरेष्टं दत्तं वा विहितमपि पूर्वं च सुकृतं l

स्वधीतं वा जप्तं श्रुतमपि यशो S जस्य हि तदा ll

भवददृष्टिः कृष्णे भवति भवभीहृत्खलु नृणां l

नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते ll १९ ll


हे कृष्णे !! पूर्वजन्मी जर काही याग केले असतील किंवा दाने दिली असतील अथवा वाटसरूंना विश्रांती घेण्यासाठी बगीचे ,पाणी पिण्यासाठी विहिरी वगैरे खणल्या असतील व यथाविधी क्षौत्रस्मार्त कर्मे केली असतील अथवा वेदाध्ययन केले असेल ,किंवा पुरश्चरणादि जप विधिपूर्वक केला असेल ,अथवा श्रीविष्णू किंवा श्रीमहादेव यांची लीला भक्तीने श्रवण केली असेल तरच संसारातून मुक्त करणारे तुझे दर्शन त्या मनुष्याला घडेल अन्यथा घडणार नाही . हे श्रीकृष्णे ! तुला माझा नमस्कार असो . हे दत्तमान्ये शमिततृष्णे ! तुझा जयजयकार असो ll १९ ll


या ठिकाणी थोरल्या महाराजांनी केवळ दर्शनाचा उल्लेख केला आहे ,केवळ दर्शनाकरिता हि पूर्वपुण्याईची पात्रता असली तर या कृष्णामाईत असलेल्या तीर्थात स्नान ,तीरावरील दत्त महाराजांच्या क्षेत्रात यजन- पूजन आणि सर्वात वरची पायरी म्हणजे तीरस्थ या नात्याने जन्माला येणे यासाठी किती पूर्वपुण्याई हवी याचा विचार करावा .


तीरस्थ म्हणजे या काठी निवास असलेल्या कुळात जन्म . आता तीरस्थांमध्ये देखील काय पात्रता आहेत ?? ,केवळ तीरावर म्हणजे कृष्णामाई काठी जन्म ,त्यानंतर या तीरावरील दत्त महाराजांच्या क्षेत्रात जन्म त्याही पुढे नृसिंहवाडीसारख्या दत्त महाराजांच्या क्षेत्रात पुजारी कुलोत्पन्न आणि त्यातही वेदविद्यासंपन्न होऊन दत्त महाराजांची विधिवत सेवा घडून येणं .


आता थोरल्या महाराजांना जर कृष्णामाईचे दर्शन जर एव्हडे दुर्लभ आणि पुण्यकारक वाटत असेल तर या पुढील सर्व पायऱ्या चढून नृसिंहवाडीसारख्या क्षेत्री पुजारी कुलोत्पन्न होऊन दत्त महाराजांची सेवा हातून घडणे म्हणजे किती पूर्व पुण्याई हवी याचा विचार करावा . 

शमिततृष्णे म्हणजे विषयरूपी तृष्णेचे शमन हा अर्थ असला तरी महाराजांना काय अर्थ अपेक्षित आहे ?? --- तृष्णा म्हणजे तहान , देहाचा विचार करता हि तहान पाणी पिऊन भागली कि काही वेळाने पुन्हा तहान लागते . इथे महाराज म्हणतात या विषयरूपी तृष्णेचे शमन कर म्हणजे कायमस्वरुपी हि विषयरूपी तहान नष्ट कर . विषयरूपी तहान कायम स्वरूपी शमली कि दत्त महाराजांच्या कृपेस पात्र होऊ .🙏🏻


 🪷श्रीगुरुदेव दत्त !!! ---🪷


 अभय आचार्य 💫🙏🏻🚩


Mirning walk ,take care

 🚨 सकाळी एकटे फिरायला जाऊ नका, जाणारच असाल तर सोबत काठी घेऊन जा.

🚨 पहाटे कुत्री भुंकत असतील तर थोडं खिडकीतून डोकावून बघा कोणाला तरी तुमच्या मदतीची गरज असेल


  🚨 घराच्या अवतीभोवती खरकटे टाकू नका त्यामुळे गल्लीत कुत्री वाढत आहेत....


🚨 प्रशासन तुम्हाला कुत्र्यांपासुन संरक्षण देईल या आशेवर बसु नका...आता तुम्हीच तुमचे रक्षणकर्ते बना.


Tuesday, 14 January 2025

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 

 मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य लॉटरीमहाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडत दि. ३ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय सभागृह या ठिकाणी काढण्यात आली. पहिले सामायिक २५ लाख रुपयांचे एक बक्षीस चिराग एन्टरप्रायजेस,नाशिक  येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

या सोडतीमधून जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रीद वाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला. रक्कम १० हजार च्या आतील रकमेची ७० बक्षिसे व रु.१०,००० वरील रकमेची २ हजार ५८२ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम ४९ लाख ४ हजार इतकी होती.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम 10 हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. 10 हजार रुपयांच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

0000

समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे

 समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 14 :- समग्र शिक्षा अभियानातील सर्वच उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावेत. या अभियानात राज्याची उल्लेखनीय कामगिरी व्हावीया दृष्टीने विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण सुधारणातंत्रशिक्षणाचा प्रसारडिजीटल शिक्षणाचे आयोजनशिक्षकांसाठीच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण प्रभावीपणे राबवावेतअशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

मंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमलाराज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळेउपसंचालक (वित्त) शार्दुल पाटीलउपसंचालक (प्रशासन) संजय डोर्लीकरमुख्य अभियंता (प्रकल्प) हेमंतकुमार सावंत आदी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले कीशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी समग्र शिक्षा अभियानातील उपक्रमयोजनांचा लाभ प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्याला झाला पाहिजे. शाळांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जावेत. समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे संदेश ध्वनी रेकॉर्डद्वारे किंवा व्हीडिओ स्वरूपात मुलांना ऐकवावेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल.

शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा. यातून त्यांच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल. या बरोबरच काही संस्थाही उल्लेखनीय काम करीत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची दखल शिक्षण विभागाने घेऊन त्यांचाही गौरव करावा. शिक्षण क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी  दिल्या.

मंत्री श्री. भुसे म्हणाले कीशाळेत आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. यामध्ये शुद्ध पाणीशौचालयेलाइटिंगसंगणकग्रंथालय आदी बाबींचा समावेश असावा. प्रत्येक शाळेत खेळ व क्रीडासाहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी. इमारत दुरुस्तीकंपाउंड वॉल  यासारख्या कामांचे वर्गीकरण करावे. कंपाउंड वॉलचे काम एमआरईजीएस मधून घेण्याबाबतही व शाळा दुरुस्तीची काही कामे सामजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी बैठकीतून बोर्डी ता. अकोला शाळेतील मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून लर्निंग साहित्य वापराबाबत माहिती जाणून घेतली. शिक्षण विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या साहित्याचा मुलांना शिकवताना चांगला उपयोग होत असल्याचे उमेश चोरे यांनी यावेळी सांगितले. सर्व शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहात. शिक्षण विभाग शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवण्यास प्राधान्य देत आहेअसे मंत्री श्री. भुसे यांनी या संवादावेळी सांगितले.

००००

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव१९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा

 टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे

सलोखाएकतासंस्कृती आणि विविधतेचा उत्सव

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई मॅरेथॉनचा रिंगिंग बेल कार्यक्रम संपन्न

 

मुंबई, दि. १४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे सलोखाएकतासंस्कृती आणि विविधतेचा उत्सव आहे. आपण सर्वजण मिळून १९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करुया असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील व्हिविंग गॅलरी येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या  रिंगिंग बेल कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळक्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह या स्पर्धेचे आयोजक विवेक सिंगउज्ज्वल माथूर, टी नारायण, प्रायोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणालेही स्पर्धा होण्यासाठी रिगिंग बेल वाजल्यापासून ४ दिवस १० तास ५० मिनिटे राहीले आहे. म्हणजे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जगातील प्रमुख दहा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धापैकी टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक प्रमुख स्पर्धा आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असणारी आणि सर्वाधिक स्पर्धक असणारी ही मॅरेथॉन स्पर्धा असून या स्पेर्धेचा नावलौकीक आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबई आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि देश विदेशातून ६०,००० हून अधिक धावपटूंचा सहभाग हे प्रेरणादायी आहे. टाटाआयडीएफसी फर्स्ट बैंकआणि टीसीएस यांसारख्या प्रायोजकांच्या समर्पणदृढनिश्चयआणि उत्साहाने भारताला धावण्याच्या जागतिक नकाशावर स्थान दिले आहे. ब्रिटनचे मो फराहसर्वात यशस्वी ट्रॅक अॅथलीट्सपैकी एकयंदा आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर आहेतत्यांची उपस्थिती हा नामवंत धावपटू आणि हौशी धावपटूंना प्रेरणा देणारा ठरेल असे मंत्री श्री भरणे सांगितले.

यावेळी माजी मंत्री आणि आमदार श्री. भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.

जगभरामध्ये बेल वाजवून कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या उत्सवाला आज प्रारंभ झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi