Tuesday, 14 January 2025

ह्या दुकानाचे अस्तित्व मला देखिल......

 ह्या दुकानाचे अस्तित्व मला देखिल माहित नव्हते . आता पुढील ट्रिपला भेट देऊ ! पण एक गोष्ट मात्र नक्कीच की ह्याची प्रसिध्दी झाली पाहिजे .


Monday, 13 January 2025

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार

 आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद

उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार

- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

 

मुंबईदि. १३ : मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता आर्टीकडून कौशल्य प्रशिक्षणस्पर्धा पूर्व प्रशिक्षणविविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षाकौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला तरूणाईने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुगल लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे मातंग समाजातील हजारो तरुणांनी एकाच वेळी फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म लोड घेऊन हँग होत असल्याच्या अडचणी नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत. भविष्यात अनेक उमेदवारांनी एकाचवेळी ऑनलाईन नोंदणी केली तरी अडचण येऊ नये यासाठी नोंदणी फॉर्मवर तांत्रिक विभागाचे काम सुरु आहे. लवकरच उमेदवारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईल असे आर्टी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृहया निर्णयाची

प्रभावी अंमलबजावणी करावी

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. 13 : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीयआंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुनापर्यंतच्या घटना घडतात.  ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावीअसे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

आज लातूरसंभाजीनगरकोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनाबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनांचा आढावा घेण्यात आला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल दि. 30 जानेवारी 2025 पर्यंत  सादर करावा. ऑनर किलिंग च्या घटनेमधील पीडित मुलींचे समुपदेशन व्हावे तसेच मनोधैर्य योजनेतून पीडित महिलेला काही मदत म्हणून लाभ देता येईल का पहावेत्यामुळे अशा मुलींना मदत होईल. तसेचया पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सामाजिक मानहानीकौटुंबिक त्रास आणि ऑनर किलिंगपासून संरक्षण कण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह कायद्याची निर्मिती  करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीचे पुनर्गठन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाइन आणि विविध समित्यांची राज्यस्तरीय प्रचार प्रसिद्धी करावीज्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि कायदेशीर मदत वेळेत उपलब्ध होईल आणि या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळेल," असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबरआंतरजातीयआंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या काही तक्रार प्राप्त झाल्यास अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याने त्याचा तपास करून अहवाल सादर करावा. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करावी आणि अशा जोडप्यांच्या संरक्षणाकरिता विशेष कक्ष आरक्षित करावेत किंवा वसतीगृह द्यावेअशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

यावेळीबैठकीला सामाजिक न्याय आयुक्त ओमप्रकाश बकोरियामहिला व बालविकास आयुक्त राहुल मोरेसंभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडेसंभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर, लातूर निवासी जिल्हाधिकारी संगीता टकलेसोमय मुंडेपोलीस आयुक्त, आयुक्तालय पुणे संबंधित अधिकारी  ऑनलाइन उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या 'विवेक कार्यशाळेचे उद्घाटन' यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी

 स्वामी विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस

राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या 'विवेक कार्यशाळेचे उदघाटन'

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थीयुवकांनी स्वयंशिस्त पाळावी




- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई, दि.१३ : जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रती उत्तर दायित्वाची भावना ठेवावी असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थी व युवकांना संबोधित करताना केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळेचा शुभारंभ राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३) रामकृष्ण मिशन सभागृहखार येथे संपन्न झाला.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन ही संस्था शिस्तभक्तीउत्तरदायित्व व सर्वधर्मसमभावासाठी प्रसिद्ध आहे.  आपल्या सर्व उपक्रमात रामकृष्ण मिशन सर्व धर्मजाती व पंथाच्या विद्यार्थ्यांना सहभागी  करून घेते हे सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. समाजाकडून घेतलेल्या दानाचा मिशन कसा विनियोग करतेहे पारदर्शीपणे समाजापुढे मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी रामकृष्ण मिशनचे कौतुक केले.

अगोदर बिझनेस क्लास आता इकॉनॉमी क्लासने प्रवास

पूर्वी आपण गारमेंट निर्यातदार असताना बिझनेस क्लासने प्रवास करीत असायचो. त्यावेळी पैसा स्वतःचा असायचा.  परंतु राज्यपाल झाल्यानंतर आपण इकोनॉमी क्लासने प्रवास करतो कारण आपल्यासाठी खर्च होत असलेला पैसा जनसामान्यांचा आहे ही जाणीव आपण नेहमी बाळगतो असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी स्वागतपर  भाषण केले तर मिशनच्या धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद यांनी हॉस्पिटल तसेच युवकांसंबंधी उपक्रमाबद्दल अहवाल सादर केला. मिशनचे व्यवस्थापक स्वामी तन्नमानंद यांनी मिशनच्या बेलूर मठ येथे झालेल्या वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन केले. 

रामकृष्ण मिशन मुंबईचे सहाय्यक सचिव स्वामी देवकांत्यानंद यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजक शंतनू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य डॉ हार्दिक गुप्ता  व आराधना धार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मिशनचे वरिष्ठ साधू तसेच विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 

शक्तीपीठ महामार्गाचे काम

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आगामी १०० दिवस कामांच्या आराखड्याचा आढावा मुंबई, दि. १३ : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी राज्यातील महामार्गाची उभारणी आणि रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करण्याचे सूचित करुन सांगितले की, राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतीमानतेने करावयची असून सर्वांना विश्वासात घेऊन त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ कि.मी. काम तत्परतेने पूर्ण करुन फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्जरोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे काम ही तातडीने पूर्ण करावे. मंत्रालय परिसरात नविन सात मजली इमारतीची उभारणी कामाची सुरुवात करण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून योग्यरित्या पार पाडली जाणे आवश्यक असून त्याचे नियंत्रण करणारी यंत्रणा विभागाने कार्यान्वित करावी. विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारुप तयार करावे. रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने करुन रस्त्याचे काम बीओटी तत्वावर करण्याचे धोरण स्वीकारावे. विविध विभागांच्या बांधकामांसंदर्भात केंद्रीय कार्यपद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम विभागातच संबंधित विभागांच्या बांधकामासाठीचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येईल. रस्त्यांच्या दुर्तफा वृक्ष लागवड करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतीमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असण्यावर, प्राधान्याने महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबत माहिती देताना कार्यक्षमता, गुणवत्ता, पारदर्शकता याला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविधांगी महत्व पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार असून विभागाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणा-या कामांची सविस्तर माहिती दिली. 0000

विलास भूमरे यांनी घेतली विधानसभा सदस्यपदाची शपथ

 विलास भूमरे यांनी घेतली विधानसभा सदस्यपदाची शपथ

 

मुंबई, दि. 13 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये पैठण येथून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार विलास संदिपानराव भूमरे यांनी विधानसभा सदस्यपदाची विधानभवन येथे शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी खासदार संदीपान भुमरेसचिव जितेंद्र भोळेअध्यक्षांचे सचिव सुनील वाणीयांच्यासह विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

000

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार

 महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने

करावयाच्या कामाचा घेतला आढावा

 

 मुंबईदि. १३  : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीपसारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती संस्थेमार्फत पुणेअमरावतीनागपूरछत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र (Excellence Centres) स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

 या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीविभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘विजाभज’ प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमाती करिता सीड अंतर्गत (Scheme for Economic Empowerment of DNT'S) घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरिता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्धेसाठी मुख्य सचिव यांच्याकडे  संबंधित जिल्ह्यातील  जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिवअपर मुख्य सचिवसचिव उपस्थित होते.

००


Featured post

Lakshvedhi