Tuesday, 14 January 2025

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 

 मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य लॉटरीमहाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडत दि. ३ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय सभागृह या ठिकाणी काढण्यात आली. पहिले सामायिक २५ लाख रुपयांचे एक बक्षीस चिराग एन्टरप्रायजेस,नाशिक  येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

या सोडतीमधून जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रीद वाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला. रक्कम १० हजार च्या आतील रकमेची ७० बक्षिसे व रु.१०,००० वरील रकमेची २ हजार ५८२ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम ४९ लाख ४ हजार इतकी होती.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम 10 हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. 10 हजार रुपयांच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

0000

समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे

 समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 14 :- समग्र शिक्षा अभियानातील सर्वच उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावेत. या अभियानात राज्याची उल्लेखनीय कामगिरी व्हावीया दृष्टीने विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण सुधारणातंत्रशिक्षणाचा प्रसारडिजीटल शिक्षणाचे आयोजनशिक्षकांसाठीच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण प्रभावीपणे राबवावेतअशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

मंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमलाराज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळेउपसंचालक (वित्त) शार्दुल पाटीलउपसंचालक (प्रशासन) संजय डोर्लीकरमुख्य अभियंता (प्रकल्प) हेमंतकुमार सावंत आदी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले कीशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी समग्र शिक्षा अभियानातील उपक्रमयोजनांचा लाभ प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्याला झाला पाहिजे. शाळांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जावेत. समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे संदेश ध्वनी रेकॉर्डद्वारे किंवा व्हीडिओ स्वरूपात मुलांना ऐकवावेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल.

शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा. यातून त्यांच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल. या बरोबरच काही संस्थाही उल्लेखनीय काम करीत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची दखल शिक्षण विभागाने घेऊन त्यांचाही गौरव करावा. शिक्षण क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी  दिल्या.

मंत्री श्री. भुसे म्हणाले कीशाळेत आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. यामध्ये शुद्ध पाणीशौचालयेलाइटिंगसंगणकग्रंथालय आदी बाबींचा समावेश असावा. प्रत्येक शाळेत खेळ व क्रीडासाहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी. इमारत दुरुस्तीकंपाउंड वॉल  यासारख्या कामांचे वर्गीकरण करावे. कंपाउंड वॉलचे काम एमआरईजीएस मधून घेण्याबाबतही व शाळा दुरुस्तीची काही कामे सामजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी बैठकीतून बोर्डी ता. अकोला शाळेतील मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून लर्निंग साहित्य वापराबाबत माहिती जाणून घेतली. शिक्षण विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या साहित्याचा मुलांना शिकवताना चांगला उपयोग होत असल्याचे उमेश चोरे यांनी यावेळी सांगितले. सर्व शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहात. शिक्षण विभाग शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवण्यास प्राधान्य देत आहेअसे मंत्री श्री. भुसे यांनी या संवादावेळी सांगितले.

००००

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव१९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा

 टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे

सलोखाएकतासंस्कृती आणि विविधतेचा उत्सव

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई मॅरेथॉनचा रिंगिंग बेल कार्यक्रम संपन्न

 

मुंबई, दि. १४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे सलोखाएकतासंस्कृती आणि विविधतेचा उत्सव आहे. आपण सर्वजण मिळून १९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करुया असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील व्हिविंग गॅलरी येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या  रिंगिंग बेल कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळक्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह या स्पर्धेचे आयोजक विवेक सिंगउज्ज्वल माथूर, टी नारायण, प्रायोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणालेही स्पर्धा होण्यासाठी रिगिंग बेल वाजल्यापासून ४ दिवस १० तास ५० मिनिटे राहीले आहे. म्हणजे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जगातील प्रमुख दहा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धापैकी टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक प्रमुख स्पर्धा आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असणारी आणि सर्वाधिक स्पर्धक असणारी ही मॅरेथॉन स्पर्धा असून या स्पेर्धेचा नावलौकीक आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबई आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि देश विदेशातून ६०,००० हून अधिक धावपटूंचा सहभाग हे प्रेरणादायी आहे. टाटाआयडीएफसी फर्स्ट बैंकआणि टीसीएस यांसारख्या प्रायोजकांच्या समर्पणदृढनिश्चयआणि उत्साहाने भारताला धावण्याच्या जागतिक नकाशावर स्थान दिले आहे. ब्रिटनचे मो फराहसर्वात यशस्वी ट्रॅक अॅथलीट्सपैकी एकयंदा आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर आहेतत्यांची उपस्थिती हा नामवंत धावपटू आणि हौशी धावपटूंना प्रेरणा देणारा ठरेल असे मंत्री श्री भरणे सांगितले.

यावेळी माजी मंत्री आणि आमदार श्री. भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.

जगभरामध्ये बेल वाजवून कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या उत्सवाला आज प्रारंभ झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

 महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला

सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

 

मुंबईदि. 14 : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्रऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र व ओपन ऍक्सेस (एसएलडीसी) या दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अभिनंदन केले आहे.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.

याप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे अध्यक्ष घनश्याम प्रसादमहाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. राजाकेंद्रीय विद्युत प्राधिकरणचे माजी अध्यक्ष राकेशनाथग्रीड इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एस के. सोनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्रऐरोलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद देवळेउमेश भगतउपमहाव्यवस्थापक नितीन पौनीकरसहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आनंद दळवीकार्यकारी अभियंता दिनेश पाटीलव्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश अघोरसहाय्यक अभियंता विजय कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकरमुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांचे मार्गदर्शन लाभले.

आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी

 आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

3 कोटी 8 लाखांचा निधी

 

मुंबईदि. 14 :- चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तरआनंद अंधमुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी  1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन केलेल्या या कार्यवाहीमुळे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी 75 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली आहे. संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. डॉ. विकास आमटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेस 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत हा निधी संस्थेस वितरीत करण्यात आला.

थोर समाजसेवक बाबा आमटे आणि  साधनाताई यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 75 वर्षे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कुष्ठरुग्णांचे उपचारपुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत आहे. संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित दीड हजार कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार ,वृद्धअनाथपरित्यक्तामानसिकदृष्ट्या अपंग बांधवांची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेतली जाते. विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात निवासी तीनशे दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थींना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनिवासी विज्ञानकलावाणिज्य शाखेच्या साडेतीन हजार  विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोयही संस्थेमार्फत केली जात आहे. संस्थेच्या या सामाजिक बांधलकी आणि सेवाकार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्य शासनाकडून देय  3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी संस्थेस तत्काळ वितरीत केला आहे.

-----०००००-----

दिलखुलास' कार्यक्रमात मृदा शास्त्रज्ञ डॉ संग्राम काळे यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात मृदा शास्त्रज्ञ डॉ संग्राम काळे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'मृदेचे जतन आणि संवर्धनया विषयावर सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. संग्राम काळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            जमीन हा मर्यादित स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असून जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे ही काळाची गरज आहे. मातीच्या आरोग्याचा दर्जामातीच्या संरक्षणासाठी उपयुक्त असणारी सेंद्रिय शेतीएकात्मिक शेतीसंवर्धित शेतीमाती परीक्षणआधुनिक शेतीचा मातीच्या गुणवत्तेवर होणारा परिणाममातीतील सेंद्रिय घटकांचे महत्त्व आणि ते टिकवण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने मातीची धूपकाँक्रीटीकरणमृदा संवर्धनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनमृदेचं आरोग्य टिकविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची भूमिकामातीतल्या सूक्ष्मजीवांची भूमिकाहवामान बदलाचा मृदा गुणवत्तेवर होणारा परिणामखतांचे व्यवस्थापन अशा महत्वपूर्ण विषयांवर मृदा शास्त्रज्ञ डॉ. काळे यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

दिलखुलास कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.15गुरूवार दि.16शुक्रवार दि. 17 आणि शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा

 वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा


- मंत्री मकरंद जाधव-पाटील


 


मुंबई, दि. १४ :- वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधील जलसंपदा विभागाकडील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिल्या. पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळ, कार्यालयात झालेल्या बैठकीत मदत व पूनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सूचना दिल्या.


या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह. वि. गुणाले व ह. तु. धुमाळ, उपविभागीय अधिकारी श्री. कचरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवठे-केंजळ उपसा सिंचन योजना, जांभळी बंधाऱ्याची उंची वाढविणे, जललक्ष्मी योजना-आकोशी पाणी पुरवठा योजना, देवघर उपसा सिंचन योजना, बळकवडी-देवघर योजनेतून खंडाळा तालुक्यातील वंचित १४ गावांना पाणी उपलब्ध करुन देणे आणि नागेवाडी धरणामध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला याबाबत सविस्तर आढावा घेण्यात

 आला.


Featured post

Lakshvedhi