Monday, 13 January 2025

स्वामी विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या 'विवेक कार्यशाळेचे उद्घाटन' यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी

 स्वामी विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस

राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या 'विवेक कार्यशाळेचे उदघाटन'

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थीयुवकांनी स्वयंशिस्त पाळावी




- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई, दि.१३ : जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रती उत्तर दायित्वाची भावना ठेवावी असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थी व युवकांना संबोधित करताना केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळेचा शुभारंभ राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३) रामकृष्ण मिशन सभागृहखार येथे संपन्न झाला.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन ही संस्था शिस्तभक्तीउत्तरदायित्व व सर्वधर्मसमभावासाठी प्रसिद्ध आहे.  आपल्या सर्व उपक्रमात रामकृष्ण मिशन सर्व धर्मजाती व पंथाच्या विद्यार्थ्यांना सहभागी  करून घेते हे सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. समाजाकडून घेतलेल्या दानाचा मिशन कसा विनियोग करतेहे पारदर्शीपणे समाजापुढे मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी रामकृष्ण मिशनचे कौतुक केले.

अगोदर बिझनेस क्लास आता इकॉनॉमी क्लासने प्रवास

पूर्वी आपण गारमेंट निर्यातदार असताना बिझनेस क्लासने प्रवास करीत असायचो. त्यावेळी पैसा स्वतःचा असायचा.  परंतु राज्यपाल झाल्यानंतर आपण इकोनॉमी क्लासने प्रवास करतो कारण आपल्यासाठी खर्च होत असलेला पैसा जनसामान्यांचा आहे ही जाणीव आपण नेहमी बाळगतो असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी स्वागतपर  भाषण केले तर मिशनच्या धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद यांनी हॉस्पिटल तसेच युवकांसंबंधी उपक्रमाबद्दल अहवाल सादर केला. मिशनचे व्यवस्थापक स्वामी तन्नमानंद यांनी मिशनच्या बेलूर मठ येथे झालेल्या वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन केले. 

रामकृष्ण मिशन मुंबईचे सहाय्यक सचिव स्वामी देवकांत्यानंद यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजक शंतनू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य डॉ हार्दिक गुप्ता  व आराधना धार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मिशनचे वरिष्ठ साधू तसेच विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 

शक्तीपीठ महामार्गाचे काम

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आगामी १०० दिवस कामांच्या आराखड्याचा आढावा मुंबई, दि. १३ : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी राज्यातील महामार्गाची उभारणी आणि रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करण्याचे सूचित करुन सांगितले की, राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतीमानतेने करावयची असून सर्वांना विश्वासात घेऊन त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ कि.मी. काम तत्परतेने पूर्ण करुन फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्जरोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे काम ही तातडीने पूर्ण करावे. मंत्रालय परिसरात नविन सात मजली इमारतीची उभारणी कामाची सुरुवात करण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून योग्यरित्या पार पाडली जाणे आवश्यक असून त्याचे नियंत्रण करणारी यंत्रणा विभागाने कार्यान्वित करावी. विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारुप तयार करावे. रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने करुन रस्त्याचे काम बीओटी तत्वावर करण्याचे धोरण स्वीकारावे. विविध विभागांच्या बांधकामांसंदर्भात केंद्रीय कार्यपद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम विभागातच संबंधित विभागांच्या बांधकामासाठीचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येईल. रस्त्यांच्या दुर्तफा वृक्ष लागवड करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतीमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असण्यावर, प्राधान्याने महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबत माहिती देताना कार्यक्षमता, गुणवत्ता, पारदर्शकता याला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविधांगी महत्व पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार असून विभागाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणा-या कामांची सविस्तर माहिती दिली. 0000

विलास भूमरे यांनी घेतली विधानसभा सदस्यपदाची शपथ

 विलास भूमरे यांनी घेतली विधानसभा सदस्यपदाची शपथ

 

मुंबई, दि. 13 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये पैठण येथून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार विलास संदिपानराव भूमरे यांनी विधानसभा सदस्यपदाची विधानभवन येथे शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी खासदार संदीपान भुमरेसचिव जितेंद्र भोळेअध्यक्षांचे सचिव सुनील वाणीयांच्यासह विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

000

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार

 महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने

करावयाच्या कामाचा घेतला आढावा

 

 मुंबईदि. १३  : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीपसारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती संस्थेमार्फत पुणेअमरावतीनागपूरछत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र (Excellence Centres) स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

 या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीविभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘विजाभज’ प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमाती करिता सीड अंतर्गत (Scheme for Economic Empowerment of DNT'S) घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरिता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्धेसाठी मुख्य सचिव यांच्याकडे  संबंधित जिल्ह्यातील  जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिवअपर मुख्य सचिवसचिव उपस्थित होते.

००


शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन*म

 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन*

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले कीउच्च शिक्षणामध्ये मराठी शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. शालेय जीवनात शाळांमध्ये उत्कृष्ट भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी कोणकोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीचा योग्य वापर करता येईलत्याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना आदर्श बनवून त्यांच्या प्राविण्याला प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले. दीर्घकालीन उपाययोजनांबाबत असे म्हणालेवीटभट्ट्यांवर जाणारेऊसतोड कामगार तसेच शेतीकाम करणाऱ्यांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात येईल. संस्थाचालक आणि शिक्षक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असून त्यातून निघालेले सकारात्मक निष्कर्ष स्वीकारुन काम करणार असल्याचेही श्री.भुसे यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेतअभ्यासक्रमाव्यतिरिक्त कलाक्रीडा आदी विषयांकरिता किमान केंद्रस्तरावर शिक्षक असावेतमुले मराठी शाळांमध्ये शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न करावेत आदी सूचना केल्या. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याची कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच शाळांच्या विकासासाठी समग्र शिक्षाच्या निधीचा वापर करावीअशी सूचना यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.

*अन्य ठळक मुद्दे :*

•          राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार.

•          राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा/ अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार.

•          राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025-26 पासून लागू करणार.

•          पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास करणार.

•          सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार.

•          शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण करणार.

•          शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबविणार.

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहीलm

 शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण

 

मुंबईदि. 13 : राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये नक्कीच आघाडीवर राहीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावाअसे निर्देशही त्यांनी दिले.

येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेपर्यटन मंत्री शंभूराज देसाईपणन मंत्री जयकुमार रावलसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेराज्यमंत्री इंद्रनील नाईकमेघना साकोरे बोर्डीकरमुख्य सचिव सुजाता सौनिकशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव आदी उपस्थित होते. प्रधान सचिव श्री.देओल यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या आराखड्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीशासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहेत्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळाशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्यापालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावीअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ही योजना सुरू राहावीअसे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीविद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा. यासाठी सर्व मंत्रीसचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापिकमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगाअसे निर्देश त्यांनी

राज्यातील पर्यटन पोहचणार आंतरराष्ट्रीय पातळीवर

 राज्यातील पर्यटन पोहचणार आंतरराष्ट्रीय पातळीवर

आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच ‘रोड शो’ आयोजनाबाबत महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा फितुर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअरनाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवलदिल्ली येथे  होणारा भारत पर्वपुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सवबर्लिन येथे आयटीबी अंतर्गतमहाबळेश्वर येथे होणारे टुरिझम कॉन्क्लेवमध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. याबाबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

पर्यटन विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करणेपर्यटन धोरण 2025 अंतर्गत पात्र पर्यटन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे ही कामे प्राधान्याने करावी.

पर्यटन विभागाच्या कामकाजाकरिता ई ऑफिसचा वापर करावा.पर्यटन विभागाची वेबसाईट अद्यावत करावी.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पर्यटन विभागातील उपक्रम यांना प्रसिद्धी देणेचॅट बॉटऑनलाइन भाषांतरप्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे या बाबींना प्राधान्य देणार

पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी वने,नगरविकास,ग्रामविकास, महसूल, गृह आणि ऊर्जा  यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे व अधिसूचना जाहीर करणार.

मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यातील ज्या स्मारकाकडे पर्यटक आकर्षित होतात ती स्मारके अधिसूचित करण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  पर्यटन सल्लागार समिती स्थापन करा.

            पर्यटन विकासासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये  संचलनालय विभागाकडून जलद मंजुरी आणि सुविधा  मिळवण्यासाठी प्रयत्न करणार.

प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळेविमानतळ विकसित करा. पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव येथे काम सुरू करणार.

पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा काही भाग पर्यटनाव्दारे विकसित करणार.

गोराई आणि मनोरी येथे थीम पार्क विकसित करणे, विंटेज कार संग्रहालये विकसित करणे, मार्कंडा, लोणार येथे टेंट सिटी विकसित करणार.

मार्कंडा, लोणार व कळसूबाई  येथे फिरते तंबू  शहर विकसित करणेकोकण  किनारपट्टीवरील तारकर्ली आणि काशिद बिचवर ब्ल्यूबीच मोहीम. समुद्रकिनाऱ्यावर वाळू कला प्रशिक्षण आणि पाहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी नामवंत कलाकार सुदर्शन पटनायक सारख्या कलाकारांचे सहकार्य घेणार.

००००

Featured post

Lakshvedhi