राज्यातील पर्यटन पोहचणार आंतरराष्ट्रीय पातळीवर
आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच ‘रोड शो’ आयोजनाबाबत महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा फितुर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर, नाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवल, दिल्ली येथे होणारा भारत पर्व, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सव, बर्लिन येथे आयटीबी अंतर्गत, महाबळेश्वर येथे होणारे टुरिझम कॉन्क्लेवमध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. याबाबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
पर्यटन विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करणे, पर्यटन धोरण 2025 अंतर्गत पात्र पर्यटन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे ही कामे प्राधान्याने करावी.
पर्यटन विभागाच्या कामकाजाकरिता ई ऑफिसचा वापर करावा.पर्यटन विभागाची वेबसाईट अद्यावत करावी.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पर्यटन विभागातील उपक्रम यांना प्रसिद्धी देणे, चॅट बॉट, ऑनलाइन भाषांतर, प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे या बाबींना प्राधान्य देणार
पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी वने,नगरविकास,ग्रामविकास, महसूल, गृह आणि ऊर्जा यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे व अधिसूचना जाहीर करणार.
मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यातील ज्या स्मारकाकडे पर्यटक आकर्षित होतात ती स्मारके अधिसूचित करण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन सल्लागार समिती स्थापन करा.
पर्यटन विकासासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचलनालय विभागाकडून जलद मंजुरी आणि सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार.
प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळे, विमानतळ विकसित करा. पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव येथे काम सुरू करणार.
पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा काही भाग पर्यटनाव्दारे विकसित करणार.
गोराई आणि मनोरी येथे थीम पार्क विकसित करणे, विंटेज कार संग्रहालये विकसित करणे, मार्कंडा, लोणार येथे टेंट सिटी विकसित करणार.
मार्कंडा, लोणार व कळसूबाई येथे फिरते तंबू शहर विकसित करणे, कोकण किनारपट्टीवरील तारकर्ली आणि काशिद बिचवर ब्ल्यूबीच मोहीम. समुद्रकिनाऱ्यावर वाळू कला प्रशिक्षण आणि पाहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी नामवंत कलाकार सुदर्शन पटनायक सारख्या कलाकारांचे सहकार्य घेणार.
००००
No comments:
Post a Comment